ICC Rankings : भारतीय फलंदाजांचा दबदबा; इशान किशनची मोठी झेप, अभिषेक शर्माचे अव्वल स्थान धोक्यात

Sanju Samson : सॅमसनची बहारदार कामगिरीच्या जोरावर क्रमवारीत मोठी भरारी
ICC Rankings : भारतीय फलंदाजांचा दबदबा; इशान किशनची मोठी झेप, अभिषेक शर्माचे अव्वल स्थान धोक्यात
Published on
Updated on

दुबई : टी-२० विश्वचषक स्पर्धेच्या थरारानंतर आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेने (ICC) ताजी क्रमवारी जाहीर केली आहे. या नव्या क्रमवारीत मोठे फेरबदल पाहायला मिळत असून भारतीय फलंदाजांनी आपले वर्चस्व कायम राखले आहे. विशेषतः इशान किशनने क्रमवारीत मोठी झेप घेत दुसरे स्थान पटकावले असून, यामुळे अव्वल स्थानी असलेल्या अभिषेक शर्मासमोर मोठे आव्हान उभे ठाकले आहे. दुसरीकडे, संजू सॅमसनने देखील आपल्या बहारदार कामगिरीच्या जोरावर क्रमवारीत मोठी भरारी घेतली आहे.

अभिषेक अद्यापही अव्वल, पण इशानकडून तगडी फाईट

विश्वचषकानंतर जाहीर झालेल्या या क्रमवारीत अभिषेक शर्मा अजूनही जगातील 'नंबर वन' फलंदाज आहे. मात्र, त्याचे पहिले स्थान आता धोक्यात आले आहे. अभिषेक ८७५ रेटिंगसह पहिल्या, तर इशान किशन (८७१ रेटिंग) दुसऱ्या क्रमांकावर आहे. दोन स्थानांची प्रगती करणाऱ्या इशान आणि अभिषेक यांच्यात आता केवळ ४ गुणांचे अंतर उरले आहे. त्यामुळे आगामी मालिकांमध्ये पहिल्या स्थानासाठी या दोन भारतीय फलंदाजांमध्ये चुरस पाहायला मिळेल.

कोणाचे नुकसान, कोणाचा फायदा?

पाकिस्तान व इंग्लंडला धक्का : पाकिस्तानचा सलामीवीर साहिबजादा फरहान एका स्थानाच्या घसरणीसह तिसऱ्या (८४८) क्रमांकावर आला आहे. इंग्लंडच्या फिल साल्टची देखील एका स्थानाने घसरण होऊन तो चौथ्या (७९२) क्रमांकावर फेकला गेला आहे.

निसंका आणि सायफर्टची कामगिरी : श्रीलंकेचा पथुम निसंका पाचव्या स्थानावर कायम आहे. न्यूझीलंडच्या टिम सिफर्टला या क्रमवारीत सर्वाधिक फायदा झाला असून, त्याने चार स्थानांची झेप घेत थेट सहावे स्थान (७४९) गाठले आहे.

भारतीय दिग्गज पिछाडीवर : भारताच्या तिलक वर्माची एका स्थानाने घसरण होऊन तो सातव्या क्रमांकावर आला आहे. दक्षिण आफ्रिकेचा डेवाल्ड ब्रेविस आठव्या स्थानी आहे. भारतीय कर्णधार सूर्यकुमार यादवला दोन स्थानांचा फटका बसला असून तो आता ९ व्या (७२२) क्रमांकावर घसरला आहे. इंग्लंडचा जोस बटलर १० व्या स्थानी आहे.

सॅमसनची १८ स्थानांची ऐतिहासिक झेप

या क्रमवारीत सर्वात लक्षवेधी कामगिरी संजू सॅमसनची ठरली आहे. सॅमसनने तब्बल १८ स्थानांची मोठी झेप घेत २२ व्या क्रमांकावर धडक मारली आहे. टी-२० विश्वचषक २०२६ च्या अखेरच्या तिन्ही सामन्यांत सॅमसनने ८० पेक्षा अधिक धावांची खेळी केली होती. त्याच्या या सातत्यपूर्ण आणि स्फोटक फलंदाजीचे फळ त्याला क्रमवारीत मिळाले आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news