Narender Berwal: ‘मुझे नरेंद्र नाम से नफरत हो गई’, बॉक्सरने PM मोदींना सांगितला भन्नाट किस्सा

Narender Berwal: राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धा 2026 मधील पदकविजेत्या भारतीय खेळाडूंची पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी भेट घेतली, त्यावेळी बॉक्सर नरेंदर बेरवाल यांनी पाकिस्तानच्या बॉक्सरसोबतचा भन्नाट किस्सा सांगितला.
Narender Berwal
Narender BerwalPudhari
Published on
Updated on

Narender Berwal: राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धा 2026 मध्ये पदक जिंकून देशाची मान उंचावणाऱ्या भारतीय खेळाडूंची पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी भेट घेतली. या भेटीदरम्यान भारतीय हेवीवेट बॉक्सर नरेंदर बेरवाल यांनी पंतप्रधान मोदींना आपल्या कारकिर्दीतील एक मजेशीर किस्सा सांगितला. पाकिस्तानच्या बॉक्सरसोबतच्या एका सामन्यानंतर घडलेला हा प्रसंग ऐकून पंतप्रधान मोदीही हसले.

नरेंदर बेरवाल यांनी 2026 राष्ट्रकुल स्पर्धेत पुरुषांच्या 90 किलोपेक्षा अधिक वजनी गटात रौप्यपदक पटकावले आहे. ते भारतीय लष्कराशी संबंधित असून यापूर्वीही आंतरराष्ट्रीय स्पर्धांमध्ये भारताचे प्रतिनिधित्व केले आहे.

पाकिस्तानच्या बॉक्सरसोबतची ती लढत...

पंतप्रधान मोदींसोबतच्या संवादात बेरवाल यांनी 2015 मधील वर्ल्ड मिलिटरी गेम्समधील पाकिस्तानच्या बॉक्सरसोबतच्या सामन्याची आठवण सांगितली. त्या सामन्यापूर्वी भारतीय लष्कराकडून त्यांना पाकिस्तानच्या खेळाडूविरुद्ध कोणत्याही परिस्थितीत पराभूत होऊ नका, असा विशेष मेसेज देण्यात आला होता, असे त्यांनी सांगितले.

सामना सुरू झाल्यानंतर बेरवाल यांनी पहिला राउंड 4-1 आणि दुसरा राउंड 3-2 अशा फरकाने जिंकला. मात्र, या चुरशीच्या सामन्यात दोन्ही बॉक्सर्सची डोकी एकमेकांना धडकली. त्यामुळे दोघांनाही दुखापत झाली आणि सामना संपल्यानंतर दोघांनाही उपचारासाठी रुग्णालयात जावे लागले.

‘भाईजान, एक बात बोलूं?’

मात्र, खरी मजेशीर गोष्ट सामन्यानंतर घडली. नरेंदर बेरवाल यांनी सांगितले की, त्यांच्यासोबत असलेल्या भारतीय लष्कराच्या प्रशिक्षकाचे नावही नरेंद्र राणा होते. सामना हरल्यानंतर पाकिस्तानी बॉक्सर काही वेळ विचार करत बेरवाल यांच्याजवळ आला आणि म्हणाला, ‘भाईजान, एक बात बोलूं?’ बेरवाल यांनी त्याला होकार दिल्यानंतर त्या बॉक्सरने जे सांगितले, ते ऐकून बेरवाल यांनाही हसू आवरले नाही.

पाकिस्तानी बॉक्सर म्हणाला, ‘भाईजान, आपका नाम नरेंदर है, आपके कोच का नाम नरेंद्र है, आपके प्रधानमंत्री का नाम नरेंद्र है. मुझे नरेंद्र नाम से नफरत हो गई है.’ म्हणजेच, समोरचा बॉक्सर नरेंदर बेरवाल, त्यांचे प्रशिक्षक नरेंद्र राणा आणि भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी, तिघांचेही नाव नरेंद्र असल्याचे लक्षात आल्यानंतर त्याने मजेशीर अंदाजात ‘नरेंद्र’ नावाचीच चीड आल्याचे म्हटले.

Narender Berwal
Investment planning | संपत्ती निर्मिती आणि निष्क्रिय उत्पन्नाचा ‘ब्लूप्रिंट प्लॅन’

किस्सा ऐकून PM मोदीही हसले

बेरवाल यांनी हा किस्सा पंतप्रधान मोदींसमोर सांगितल्यानंतर ते पण हसले. भारत-पाकिस्तान सामन्यांमध्ये मैदानावरील स्पर्धेला नेहमीच वेगळे महत्त्व असते. मात्र, या प्रसंगात स्पर्धा संपल्यानंतर दोन खेळाडूंमध्ये झालेल्या हलक्याफुलक्या संवादाची आठवण आज समोर आली.

राष्ट्रकुल स्पर्धेत बेरवालची दमदार कामगिरी

नरेंदर बेरवाल यांनी 2026 राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेत भारतासाठी 90 किलोपेक्षा अधिक वजनी गटात रौप्यपदक जिंकले. स्पर्धेपूर्वीच त्यांचा समावेश भारतीय बॉक्सिंग संघात करण्यात आला होता आणि त्यांनी उपांत्य फेरीपर्यंत मजल मारत भारताचे पदक निश्चित केले होते.

Narender Berwal
Chakan MIDC: चाकण MIDCला मोठा धक्का! 20 कंपन्या गाशा गुंडाळणार? 1,000 कोटींची उलाढाल आणि 4 हजार नोकऱ्या धोक्यात, कारण काय?

राष्ट्रकुल स्पर्धेतील या कामगिरीनंतर पंतप्रधान मोदींनी पदकविजेत्या भारतीय खेळाडूंची भेट घेतली. या भेटीत खेळाडूंनी आपल्या प्रवासातील अनुभव, संघर्ष आणि मैदानावरील काही आठवणीही पंतप्रधानांसोबत शेअर केल्या.

त्यापैकी नरेंदर बेरवाल यांनी सांगितलेला ‘नरेंद्र’ नावाचा किस्सा मात्र या भेटीतील खास चर्चेचा विषय ठरला. एका जुन्या भारत-पाकिस्तान बॉक्सिंग सामन्याची आठवण, त्यातील चुरस आणि सामन्यानंतरचा हा अनपेक्षित विनोदी संवाद यामुळे बेरवाल यांचा किस्सा सोशल मीडियावरही चर्चेत आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news