Jasprit Bumrah : प्रतिस्पर्ध्यापेक्षा माझे स्वतःवरच जास्त लक्ष : जसप्रीत बुमराह

प्रतिस्पर्ध्यापेक्षा माझे स्वतःवरच जास्त लक्ष : जसप्रीत बुमराह
Jasprit Bumrah
भारताचा स्टार गोलंदाज बुमराह चेन्नईतील एका महाविद्यालयाच्या कार्यक्रमात सहभागी झाला होता. यावेळी प्रश्नांची सावध उत्तर देत सर्वांची मने जिंकली. File Photo
Published on
Updated on

चेन्नई : भारताचा स्टार गोलंदाज बुमराह चेन्नईतील एका महाविद्यालयाच्या कार्यक्रमात सहभागी झाला होता. यावेळी त्याला एक कठीण प्रश्न विचारण्यात आला. बुमराहला विचारण्यात आले की, कोणत्या फलंदाजाला गोलंदाजी करणे तुला सर्वात कठीण वाटते? यावर बुमराहने मी प्रतिस्पर्ध्यापेक्षा स्वतःवर जास्त लक्ष देतो, असे सावध उत्तर देत सर्वांची मने जिंकली.

जसप्रीत बुमराह म्हणजे, भल्या-भल्या फलंदाजांसाठी कर्दनकाळ. बुमराह सध्या जगातील सर्वोत्तम गोलंदाजांपैकी एक आहे. तो क्रिकेटच्या तिन्ही फॉरमॅटमध्ये सातत्याने चांगली कामगिरी करत आला आहे. 2024 च्या टी-20 विश्वचषकात बुमराहने टीम इंडियासाठी चमकदार कामगिरी केली होती. बुमराहसमोर सर्वोत्तम फलंदाजही गुडघे टेकताना दिसले आहेत; पण घातक फलंदाजांना आपल्या तालावर नाचवणार्‍या बुमराहला कोणत्या फलंदाजाची भीती वाटते या प्रश्नावर मात्र त्याने सावध उत्तर दिले.

Jasprit Bumrah
झारखंडमध्ये पहिल्यांदाच तृतीयपंथीय व्यक्तीला सरकारी नोकरी...

मला या प्रश्नाचे एक चांगले उत्तर द्यायचे आहे. खरी गोष्ट अशी आहे की, माझ्याविरुद्ध कोणी आक्रमक व्हावे, असे मला वाटत नाही. मी सर्वांचाच आदर करतो; पण मनातल्या मनात मी स्वतःला सांगतो की, जर मी माझे काम चोख केले तर मला थांबवणारे जगात कोणीच नाही. मी प्रतिस्पर्ध्यापेक्षा स्वतःवर जास्त लक्ष देतो. माझे सर्व गोष्टींवर नियंत्रण आहे आणि जर मी स्वतःला सर्वोत्तम संधी दिली, तर बाकी सर्व काही ठीक होईल, असे जसप्रीत बुमराहने सांगितले.

Jasprit Bumrah
Weather Update : गुजरातच्या किनारपट्टीवर 'असना'ची निर्मिती!

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news