पुणे : गुजरात किनारपट्टीवर शुक्रवारी दुपारच्या सुमारास कमी दाबाच्या पट्ट्याचे रूपांतर 'असना' नावाच्या चक्रीवादळात झाले. हे वादळ अरवी समुद्रातून आले असले तरी भारतीय किनारपट्टीपासून लांब आहे. मात्र, याचा केंद्रबिंदू गुजरातच्या किनारपट्टीवर आहे. त्यामुळे प्रामुख्याने कच्छ किनारपट्टीला सावधानतेचा रेड अलर्ट दिला आहे.
ऑगस्टमध्ये सुमारे १३२ वर्षांनंतर हे चौथे चक्रीवादळ अरबी समुद्रात तयार होत असल्यानेही हे वादळ दुर्मीळ मानले जात आहे. याचा महाराष्ट्राला धोका नाही. परंतु पावसाचा जोर वाढणार आहे. त्यामुळे ३१ ऑगस्ट ते २ सप्टेंबरपर्यंत मुसळधार पावसाचा अंदाज वर्तवण्यात आला आहे.
गुजरात आणि पश्चिम बंगालच्या किनारपट्टीवर एकाच वेळी कमी दाबाचे पट्टे तयार झाल्याने मान्सून वारे। पुन्हा सक्रिय झाले आहे. गुजरात किनारपट्टीवर २४ तासांपासून कमी दाबाचा पट्टा कायम असून शुक्रवारी दुपारी तीव्र कमी दाबाच्या पट्ट्याचे रुपांतर चक्रीवादळात झाले. त्यामुळे त्या भागात जोरदार पाऊस सुरू झाला आहे.
हे वादळ शनिवारी दिवसभर या किनारपट्टीच्या जवळपास राहणार आहे. त्यामुळे महाराष्ट्रात याचा परिणाम एक१ सप्टेंबरपर्यंत राहणार आहे. हे वादळ एक सप्टेंबर रोजी गुजरात किनारपट्टीकडून ओमान देशाकडे जाईल, असा अंदाज आहे. या वादळाला पाकिस्तानने 'असना' हे नाव दिले आहे.
अरबी समुद्रात ऑगस्ट महिन्यात खूप कमी चक्रीवादळे तयार झाली आहेत. १८९१ ते २०२३ या १३२ वर्षांच्या कालावधीत अरबी समुद्रात फक्त तीन चक्रीवादळे तयार झाली. १९४४, १९६४ आणि १९७६ मध्ये चक्रीवादळ तयार झाले होते. त्यानंतर थेट २०२४ मध्ये हे चक्रीवादळ तयार होत आहे. त्याउलट बंगालच्या उपसागरात ऑगस्ट महिन्यात २८ चक्रीवादळे तयार झाली आहेत.
असना चक्रीवादळ वायव्य बंगालच्या उपसागरात तयार होत आहे. तेथून गुजरातची कच्छ आणि सौराष्ट्र ही किनारपट्टी जवळ आहे. त्यामुळे या भागात गुरुवारपासून अतिवृष्टी सुरू झाली आहे. शनिवार ते सोमवार खूप मोठ्या पावसाचा अंदाज आहे. हे वादळ पश्चिमेकडे सरकून कच्छपासून ईशान्य अरबी समुद्रात येण्याची शक्यता आहे. शेजारील सौराष्ट्र आणि पाकिस्तान किनारपट्टीवर मोठा पाऊस होईल.
ईशान्य अरबी समुद्रावर चक्रीवादळ आहे. ते कच्छ आणि पाकिस्तानच्या किनाऱ्यावर आहे. हे वादळ गुजरात किनारपट्टीपासून १४० तर पाकिस्तान किनारपट्टीपासून १६० कि.मी. अंतरावर आहे. समुद्र अरबी खवळलेला असून मच्छीमारांना सावधानतेचा इशारा देण्यात आला आहे.
३० ऑगस्ट रोजी दुपारी चक्रीवादळ तयार झाले. सायंकाळी ७ नंतर वादळाचा वेग ताशी ५० ते ५५ कि.मी. होता.
३१ ऑगस्ट सकाळी ताशी ७० ते ७५ कि. मी. वेग वाढणार.
३१ ऑगस्ट दुपार ते रात्रीपर्यंत वादळाचा वेग ताशी ८० ते ८५ कि.मी. होईल. VAR
१ सप्टेंबर सकाळी : वेग कमी होत ताशी ५० ये ५५ कि.मी.वर येईल. वादळ ओमानच्या दिशेने जाईल.
या चक्रीवादळाला असना हे उर्दू नाव असून ते पाकिस्तानच्या हवामान विभागाने सुचवले आहे. असना म्हणजे स्तुती किंवा प्रशंसा असा अर्थबोध होतो. हिंदी महासागरात जे कुठले वादळ येते त्याला आशियाई देश आळीपाळीने नाव सुचवत असतात. त्यानुसार त्याची नोंद जागतिक हवामान संघटना घेते.