RR vs SRH | हैदराबादचा राजस्थानवर 5 गडी राखून विजय

इशान किशन व अभिषेक शर्माची आक्रमक खेळी; वैभवचे विक्रमी शतक वाया
RR vs SRH |
RR vs SRH | हैदराबादचा राजस्थानवर 5 गडी राखून विजय
Published on
Updated on

जयपूर; वृत्तसंस्था : येथील सवाई मानसिंग स्टेडियमवर शनिवारी झालेल्या आयपीएलच्या 36 व्या सामन्यात सनरायझर्स हैदराबादने (एसआरएच) राजस्थान रॉयल्सवर (आरआर) 5 गडी राखून विजय संपादन केला. इशान किशन (31 चेंडूंत 74) आणि अभिषेक शर्मा (29 चेंडूंत 57) यांच्या आक्रमक खेळीच्या जोरावर हैदराबादने विजयासाठी 229 धावांच्या महाकाय आव्हानाचा यशस्वी पाठलाग करत 18.3 षटकांतच विजयावर शिक्कामोर्तब केले.

या सामन्यात राजस्थान रॉयल्सच्या वैभव सूर्यवंशीने वादळी खेळी करत विक्रमी शतक साजरे केले खरे, पण त्याची ही खेळी संघाच्या पराभवामुळे व्यर्थ ठरली. वैभवने अवघ्या 37 चेंडूंत 103 धावांची स्फोटक खेळी करताना 8 चौकार आणि तब्बल 15 गगनभेदी षटकार खेचले.

प्रथम फलंदाजीसाठी उतरलेल्या राजस्थान रॉयल्सचा सलामीवीर यशस्वी जैस्वाल 8 धावा करून बाद झाला. मात्र, त्यानंतर 15 वर्षीय वैभव सूर्यवंशीने मैदानावर वादळ निर्माण केले. हैदराबादच्या सर्व गोलंदाजांची वैभवने अक्षरश: धुलाई केली. ध्रुव ज्युरेलने 51 धावा करत वैभवला मोलाची साथ दिली, त्यामुळे राजस्थानने 20 षटकांत 6 बाद 228 धावांचा डोंगर उभा केला.हैदराबादच्या इशान मलिंगाने 2 तर कर्णधार पॅट कमिन्सने 27 धावा देत 1 गडी बाद केला.

229 धावांच्या लक्षाचा पाठलाग करताना हैदराबादच्या अभिषेक शर्मा आणि इशान किशन यांनी दुसर्‍या गड्यासाठी या जोडीने अवघ्या 39 चेंडूंत 100 धावांची भागीदारी केली. अभिषेकने 29 चेंडूंत 57 तर इशानने 31 चेंडूंत 74 धावा कुटल्या. मधल्या फळीत नितीश कुमार रेड्डीने 18 चेंडूंत 36 धावांची वेगवान खेळी केली. शेवटच्या क्षणी सलील अरोरा (नाबाद 8) आणि अनिकेत वर्माने (नाबाद 1) 18.3 षटकांत संघाला विजय मिळवून दिला.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news