

Hikaru Nakamura threw D Gukeshs king :
भारत विरूद्ध अमेरिका हा टॅरिफच्या पटलावरील वाद आता बुद्धीबळाच्या ६४ घरांवर देखील आलाय की काय अशी शंका येणारी घटना घडली आहे. टेक्सास येथे बुद्धीबळाचा भारत विरूद्ध अमेरिका हा सामना झाला. या सामन्यात अमेरिकेचा बुद्धीबळपटू हिकारू नाकामुरानं भारताचा अव्वल बुद्धीबळपटू डी. गुकेश याचा पराभव केला. सामना जिंकल्यानंतर आनंद व्यक्त करणं स्वाभाविक होतं.
मात्र नाकामुराचा विजयाचा आनंद उन्मादात बदलला. बुद्धीबळ हा तसा सोफेस्टिकेटेड आणि सभ्य लोकांचा खेळ समजला जातो. त्यामुळं नाकामुराच्या या कृतीचं जगभरातून निषेध होत आहे. नाकामुरानं विजयानंतर डी गुकेशचा पटलावरील राजा उचलून तो प्रेक्षकांमध्ये भिरकावला. सध्या हा व्हिडिओ सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होत आहे. अनेक जाणकारांनी बुद्धीबळाच्या स्पर्धांमध्ये या असल्या थिल्लरपणाला जागा नाही असं मत व्यक्त केलं आहे.
दरम्यान, अमेरिकेचा बुद्धीबळपटू नाकामुरा याच्या कृतीचा निषेध रशियन ग्रँडमास्टर व्लादीमीर क्रामनिकने निषेध केला. या कृतीविरोधात सोशल मीडियावर स्पष्टपणे बोलणारा तो पहिला बुद्धीबळपटू होता. मात्र आता असं कळतंय की डी गुकेशचा राजा प्रेक्षकांमध्ये भिरकावणं हा आयोजकांचाच प्लॅन होता.
दरम्यान, नाकामुरावर टीका करणाऱ्यांनी याला टेस्टलेस आणि असभ्य असं म्हटलं आहे. बुद्धीबळात राजा हा विरोधाकचं एक प्रतिक असतो. गुकेश हा वर्ल्ड चॅम्पियनशिपचं आपलं टायटल राखण्यासाठी उत्सुक आहे. त्याच्या बाबतीत असा प्रकार घडल्यानं सर्वांना धक्का बसला आहे.
दरम्यान, नाकामुरानं आपल्या विजयाची ही प्रतिक्रिया आपल्या यू ट्यूब चॅनलवर देखील शेअर केली आहे. तो म्हणतो की वैयक्तिकरित्या त्याचा सर्वात चांगला अनुभव होता. मी एका अनुभवी खेळाडूचा पराभव केला होता. आपल्याला आपला विजय आपल्यापुरता साजरा करण्याची सवय लागली आहे.