

CJI BR Gavai first Comment :
सर्वोच्च न्यायालयात आज एक धक्कादायक प्रकार घडला. एका वयस्कर व्यक्तीनं देशाचे चीफ जस्टिस ऑफ बी.आर. गवई यांच्या दिशेने शूज फेकण्याचा प्रयत्न केला. मात्र हा शूज CJI यांच्या बेंचपर्यंत पोहचला नाही. यानंतर या व्यक्तीला त्वरित ताब्यात घेण्यात आलं. सर्वोच्च न्यायालयात असा प्रकार घडल्यामुळं सर्वांनाच धक्का बसला. दरम्यान, या घटनेनंतर सर्वोच्च न्यायालयाचे सरन्याधीश गवई यांनी पहिली प्रतिक्रिया दिली आहे.
सरन्यायाधीश गवई यांनी यानंतर मी शेवटचा व्यक्ती असेल ज्याच्यावर अशा गोष्टींचा परिणाम होईल अशी प्रतिक्रिया दिली. त्यानंतर त्यांनी न्यायालयाची सुनावणी पुढे सुरू ठेवली.
काही प्रत्यक्षदर्शींनी दिलेल्या माहितीनुसार, 'सरन्यायाधीशांनी आज सकाळी पहिल्या केसची सुनावणी सुरू केली. त्यावेळी कोर्ट रूमध्ये उपस्थित असलेल्या एका वयस्कर व्यक्तीनं भारत सनातन धर्माचा अपमान सहन करणार नाही अशा घोषणा द्यायला सुरूवात केली. त्यानंतर त्यानं शूज बेंचच्या दिशेनं फेकला.
याचवेळी कोर्टरूमध्ये उपस्थित असलेल्या सुरक्षा रक्षकानं त्वरित हालचाल करत या शूज फेकणाऱ्या व्यक्तीला ताब्यात घेतलं. फेकलेला शूज हा सरन्याधीशांपर्यंत पोहचला नाही. मिळालेल्या माहितीनुसार ज्या व्यक्तीनं शूज फेकला त्याच्याकडे सर्वोच्च न्यायालयाचे वकील आणि कर्मचारी यांना देण्यात येतं ते कार्ड होतं. या कार्डवर किशोर राकेश असं नाव आहे. त्यानं सर्वोच्च न्यायालयाच्या सरन्यायाधीशांना का टार्गेट केलं याबाबत अजून स्पष्ट माहिती मिळालेली नाही. याबाबत पोलीस चौकशी करत आहेत.
ज्यावेळी सर्वोच्च न्यायालयात ही घटना घडली त्यावेळी उपस्थित असलेल्या वकिलांनी सांगितलं की सरन्यायाधीश हे या संपूर्ण प्रसंगात अत्यंत शांत होते. त्यांनी अशा घटनांचा परिणाम होणारा मी कदाचित शेवटचा व्यक्ती असेन असं म्हणत सुनावणी कायम ठेवण्यास सांगितलं.
या प्रकरणाबद्दल सर्वोच्च न्यायालयातील वरिष्ठ न्यायमूर्ती इंदिरा जयसिंग ट्विट करून म्हणाल्या, 'या वकिलाविरूद्ध कडक कायदेशीर कारवाई केली पाहिजे. हा स्पष्टपणे सर्वोच्च न्यायालयावरचा जातीयवादी हल्ला दिसतोय. सर्वोच्च न्यायालयाच्या सर्व न्यायमूर्तींनी या घटनेचा निषेध केला पाहिजे. यासाठी त्यांनी एकत्रित एक प्रेस रिलीज प्रसिद्ध केलं पाहिजे. न्यायालयाची गरिमा कायम राखत सरन्यायाधीशांनी आपलं न्यायदानाचं काम कोणताही व्यत्यय न आणता सुरू ठेवलं.'