FIFA World cup 2026 : फ्रान्स-पराग्वे खेळाडू भिडले; एम्बापेने गोलरक्षकाशी हस्तांदोलन नाकारले, पाठीवर मारला चेंडू

एम्बाप्पेच्या पेनल्टी गोलमुळे फ्रान्सची उपांत्यपूर्व फेरीत धडक
FIFA World cup France vs Paraguay
FIFA World cup France vs Paraguay Pudhari
Published on
Updated on

FIFA World cup France vs Paraguay : फ्रान्स आणि पराग्वे यांच्यातील 'राऊंड ऑफ-१६' सामन्याची अंतिम शिट्टी वाजताच मैदानावर तणाव निर्माण झाला. दोन्ही संघांचे खेळाडू समोरासमोर आले. त्यांच्यात काही वेळ धक्काबुक्की पाहायला मिळाली. सामन्यादरम्यान फ्रान्सचा कर्णधार किलियन एम्बाप्पे आणि पराग्वेचा गोलकीपर ऑरलँडो गिल यांच्यातही वाद झाला. एम्बाप्पेने गिलशी हस्तांदोलन केले नाही. यावेळी संतापलेल्या गोलकीपरने एम्बाप्पे जात असताना त्यांच्या पाठीवर चेंडू फेकून मारला. फ्रेंच स्टार एम्बाप्पेने यावर कोणतीही प्रतिक्रिया न देता आपल्या संघासोबत विजयाचा जल्लोष सुरू ठेवला. आता फ्रान्सचा सामना क्वार्टर फायनलमध्ये (उपांत्यपूर्व फेरीत) मोरोक्कोविरुद्ध होईल, तर पराग्वेचा या विश्वचषकातील प्रवास इथेच संपला आहे.

एम्बाप्पे आणि गोमेझ यांच्यात जोरदार वाद

सामन्यात ७० मिनिटांपर्यंत दोन्ही संघांमध्ये चुरशीची लढत पाहायला मिळाली. यादरम्यान अनेक वेळा खेळाडूंमध्ये वाद होऊन ते एकमेकांना भिडले. एका क्षणी एम्बाप्पे आणि पराग्वेचा दिएगो गोमेझ यांच्यात जोरदार वाद झाला.यानंतर पराग्वेचे खेळाडू एम्बाप्पेला धक्का देऊ लागले. हे पाहून फ्रान्सचे खेळाडूही तिथे धावून आले आणि त्यांच्यात जोरदार धक्काबुक्की झाली. रेफरी सुरुवातीला मध्यस्थी करत एम्बाप्पेला बाजूला घेऊन जाताना दिसले, पण जेव्हा दोन्ही बाजूंचे खेळाडू एकत्र आले, तेव्हा रेफरी बाजूला झाले.

FIFA World cup France vs Paraguay
FIFA World Cup : एम्बाप्पेचा करिष्मा अन् राखीव फळीची ताकद! जगज्जेतेपदासाठी 'फ्रेंच आर्मी' सज्ज, जाणून घ्या ‘पॉवरफुल’ रणनीती

फ्रान्‍सला पेनल्‍टी आणि एम्‍बाप्‍पेने रचला विजयाचा पाया

पराग्वेने आपल्या भक्कम बचावाच्या (डिफेन्स) जोरावर फ्रान्सच्या स्टार खेळाडूंना मोकळेपणाने खेळण्याची संधी दिली नाही. अखेर ७० व्या मिनिटाला डिझायर डुए बॉक्सच्या आत फौुलचा शिकार झाला. रेफरीने आधी खेळ सुरू ठेवला, पण VAR (व्हिडिओ असिस्टंट रेफरी) समीक्षेनंतर फ्रान्सला पेनल्टी बहाल करण्यात आली.एम्बाप्पेने कोणतीही चूक न करता चेंडू गोलपोस्टमध्ये धाडला आणि हाच एकमेव गोल फ्रान्सच्या १-० अशा विजयाचा पाया ठरला. या स्पर्धेतील हा त्याचा सातवा आणि विश्वचषक कारकिर्दीतील १९ वा गोल ठरला. यासह त्याने 'गोल्डन बूट'च्या शर्यतीत लिओनेल मेस्सीची बरोबरी केली आहे.

FIFA World cup France vs Paraguay
FIFA World Cup 2026 : "फुटबॉल आमच्या चारित्र्याची.." : सामन्यानंतर 'फेअर प्ले' मेसेजमध्ये इराणने नेमकं काय म्हटलं?

सामना संपल्‍यानंतर वाद वाढला, गोलकीपरने चेंडू फेकला

सामन्याची अंतिम शिट्टी वाजल्यानंतर ऑरलँडो गिल हा एम्बाप्पेचे अभिनंदन करण्यासाठी त्याच्याजवळ गेला आणि हात मिळवण्याचा प्रयत्न केला. परंतु, एम्बाप्पेने त्याच्याकडे पूर्णपणे दुर्लक्ष करत पुढे जाणे पसंत केले. यामुळे गिल प्रचंड संतापला आणि त्याने रागाच्या भरात मॅच बॉल एम्बाप्पेच्या पाठीच्या दिशेने फेकला. चेंडू पाठीवर लागूनही एम्बाप्पेने कोणताही पलटवार केला नाही, ज्यामुळे वाद अधिक वाढला नाही. ही घटना सोशल मीडियावर वेगाने व्हायरल झाली असून सामन्यानंतर चर्चेचा मोठा विषय बनली आहे.

FIFA World cup France vs Paraguay
FIFA World Cup 2026 : फुटबॉल विश्वचषकात सर्वात जलद गोल आहे कोणाच्या नावावर...? जाणून घ्या ५ भन्नाट गोष्टी

'गरज पडल्यास आम्ही खराब फुटबॉलही खेळू' : एम्बाप्पे

सामन्यानंतर एम्बाप्पे म्हणाला की, फ्रान्सला आधीच ठाऊक होते की हा सामना सोपा असणार नाही. सामना कसा होणार आहे याची आम्हाला पूर्ण कल्पना होती. गरज पडल्यास आम्ही आमचे हातही घाण करू (कठोर खेळ करू). आम्ही खराब फुटबॉलही खेळू शकतो. त्यांना वाटले होते की आम्ही फक्त सुंदर फुटबॉल खेळायला आलो आहोत, पण आम्हाला प्रत्येक प्रकारचा खेळ खेळता येतो. ती त्यांची खेळण्याची पद्धत आहे. फुटबॉलमध्ये कोणतीही पद्धत योग्य किंवा चुकीची नसते, फक्त विजय महत्त्वाचा असतो. त्यांनी आम्हाला त्यांच्याच शैलीत हरवण्याचा प्रयत्न केला, पण आम्ही त्यांना त्यांच्याच खेळात पराभूत केले." फ्रान्सचे मुख्य प्रशिक्षक दिदिएर डेशॉं यांनीही मान्य केले की, दक्षिण अमेरिकन संघांविरुद्ध खेळणे नेहमीच कठीण असते आणि पराग्वेने संपूर्ण सामन्यात त्यांची लय बिघडवण्याचा प्रयत्न केला.

गोलकीपरने मागितली माफी

सामन्यानंतर ऑरलँडो गिलने आपल्या वर्तनाबद्दल खेद व्यक्त केला. तो म्हणाला, "मी त्याचे अभिनंदन करण्यासाठी हात पुढे केला होता, पण त्याने माझ्याकडे लक्षच दिले नाही, जणू काही मी तिथे नव्हतोच. त्या क्षणी मी राग आणि भावनांच्या भरात वाहून गेलो. याशिवाय काहीही झाले नाही. नंतर मी शांत झालो, मला फक्त त्याचे अभिनंदन करायचे होते." गिल पुढे म्हणाला की, जर फ्रान्सला ती पेनल्टी मिळाली नसती, तर कदाचित त्यांच्या संघाने सामन्याला वेगळे वळण दिले असते.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news