Eng vs France FIFA World Cup : एम्‍बापेचा विश्वविक्रम; पण बुकायोच्या हॅट्ट्रिकच्या जोरावर इंग्लंडने मारली बाजी

फिफा विश्‍वचषकातील तिसऱ्या स्थानासाठीचा सामना ठरला ऐतिहासिक आणि हाय-स्कोरिंग
Eng vs France FIFA World Cup
Eng vs France FIFA World Cup : 'हार्ड रॉक स्टेडियम'वर झालेल्या थरारक सामन्यात इंग्लंडने फ्रान्सवर ६-४ असा दणदणीत विजय मिळवत कांस्यपदक पटकावले. फ्रान्सचा कर्णधार किलियन एम्बापे(Kylian Mbappé) विश्वचषकाच्या इतिहासात सर्वाधिक २२ गोल करण्याचा विश्वविक्रम रचला,Pudhari
Published on
Updated on

Eng vs France FIFA World Cup : जगभरातील फुटबॉल चाहत्‍यांचे लक्ष वेधलेल्‍या फिफा विश्वचषक फुटबॉल स्पर्धेतील तिसऱ्या स्थानासाठी झालेल्या सामन्यात एका ऐतिहासिक आणि हाय-स्कोरिंग सामन्याची नोंद झाली. शनिवारी रात्री मियामी येथील 'हार्ड रॉक स्टेडियम'वर झालेल्या थरारक सामन्यात इंग्लंडने फ्रान्सवर ६-४ असा दणदणीत विजय मिळवत कांस्यपदक पटकावले. फ्रान्सचा कर्णधार किलियन एम्बापे(Kylian Mbappé) विश्वचषकाच्या इतिहासात सर्वाधिक २२ गोल करण्याचा विश्वविक्रम रचला, मात्र बुकायो साकाची धडाकेबाज हॅट्ट्रिक आणि ज्युड बेलिंगहॅमच्या झुंझार खेळापुढे एमबापेचा हा ऐतिहासिक पराक्रम फिका पडला.

इंग्लंडची धडाकेबाज सुरुवात; फ्रान्स बॅकफूटवर

सामन्याच्या सुरुवातीला इंग्लंडचे स्टार खेळाडू हॅरी केन आणि ज्युड बेलिंगहॅम बेंचवर (राखीव खेळाडू म्हणून) बसलेले असतानाही, इंग्लंडच्या संघाने आक्रमक खेळ केला. त्यांनी फ्रान्सच्या बचावफळीला खिंडार पाडत सुरुवातीलाच ४-० अशी भक्कम आणि एकतर्फी आघाडी घेतली होती. स्पेनविरुद्धच्या उपांत्य फेरीतील पराभवातून फ्रान्सचा संघ अजून सावरलेला दिसत नव्हता. फ्रान्सचा पराभव निश्चित मानला जात असतानाच, कर्णधार एमबापेने एकहाती झुंज देत संघाचे पुनरागमन करून दिले.

Eng vs France FIFA World Cup
Argentina Comeback King : ‘कमबॅक किंग’ अर्जेंटिना! ०.६% आशेचा किरण ते थेट विश्वचषक फायनल; मेस्सी अँड कंपनीचा थरारक प्रवास

एम्‍बापेचा ऐतिहासिक 'महा-विक्रम'

सामन्याच्या ४८ व्या मिनिटाला एमबापेने इंग्लंडचा गोलकीपर डीन हेंडरसनला चकवत फ्रान्ससाठी पहिला गोल केला. यानंतर २७ वर्षीय एमबापेने सामन्याच्या ६६ व्या मिनिटाला फुटबॉल जगतात इतिहास रचला. बॉक्सच्या आत मिळालेल्या बॉलवर डाव्या पायाने १४ यार्डांवरून एक जोरदार शॉट मारत त्याने चेंडू गोलपोस्टमध्ये धाडला. या गोलसह चालू स्पर्धेत त्याचे एकूण १० गोल झाले आणि गोल्डन बूटच्या शर्यतीत त्याने लिओनेल मेस्सीला (८ गोल) मागे टाकले.

Eng vs France FIFA World Cup
FIFA World Cup 2026 : "फुटबॉल आमच्या चारित्र्याची.." : सामन्यानंतर 'फेअर प्ले' मेसेजमध्ये इराणने नेमकं काय म्हटलं?

मेस्‍सीचा विक्रम मोडला

हा गोल एमबापेच्या जागतिक कारकिर्दीतील २२ वा विश्वचषक गोल ठरला. यासह त्याने लिओनेल मेस्सीचा विश्वचषकातील सर्वाधिक २१ गोल्सचा जुना विक्रम अधिकृतपणे मोडीत काढला आणि तो विश्वचषक इतिहासातील 'ऑल-टाइम टॉप स्कोअरर' बनला आहे.

Eng vs France FIFA World Cup
FIFA World Cup 2026: मेस्सीचा महाविक्रम, तरीही अर्जेंटिना हरता हरता वाचला; 'या' छोट्याशा देशाने अक्षरशः रडवले!

साकाची हॅट्ट्रिक आणि बेलिंगहॅमचा 'मास्टरक्लास'

एमबापेच्या दुसऱ्या गोलमुळे फ्रान्सने सामन्यात ४-३ अशी जोरदार मुसंडी मारली होती. मात्र, इंग्लंडने पुन्हा एकदा आपले वर्चस्व सिद्ध केले. इंग्लंडच्या बुकायो साकाने मैदानावर अप्रतिम खेळ करत आपली शानदार हॅट्ट्रिक पूर्ण केली आणि दुसऱ्या हाफमधील कमालीच्या गोंधळातही इंग्लंडला आघाडीवर ठेवले.

Eng vs France FIFA World Cup
Argentina vs England Semi Final : अर्जेंटिना संघ 'नेव्ही ब्लू' जर्सी घालून मैदानात उतरणार! काय आहे यामागील 'मानसिक' कारण?

ज्युड बेलिंगहॅमने फेरलेफ्रान्सच्या आशेवर पाणी

सामना संपायला काही वेळ शिल्लक असताना फ्रान्सच्या उस्माने डेम्बेलेने गोल करून स्कोअर ५-४ असा केला आणि सामना बरोबरीत आणण्याच्या आशा जिवंत ठेवल्या. परंतु, सामन्याच्या शेवटच्या मिनिटांत राखीव खेळाडू म्हणून मैदानात उतरलेल्या ज्युड बेलिंगहॅमने फ्रान्सच्या आशेवर पाणी फेरले. रियाल माद्रिदच्या या मिडफिल्डरने फ्रान्सच्या अनेक डिफेंडर्सना चकवून एक प्रेक्षणीय 'सोलो रन' (एकल चढाई) केला आणि गोल करत इंग्लंडच्या ६-४ अशा थरारक विजयावर शिक्कामोर्तब केले. इंग्लंडने या थरारक विजयासह आपल्या मोहिमेचा शेवट गोड केला, तर दुसरीकडे एमबापेला मात्र एका ऐतिहासिक विक्रमानंतरही पराभवाचे दुःख घेवूनच फ्रान्‍स गाठावे लागणार आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news