Lionel Messi : "आपण दोघे खूप सारखे..." : मेस्सीच्‍या कौतुकावर टेनिस स्टार राफेल नदालने दिली खास प्रतिक्रिया!

कारकिर्दीतील सहाव्‍या विश्वचषकात मेस्सी नव्‍या विक्रमाच्‍या उबंरठ्यावर
messi nadal comment
messi nadal commentPudhari
Published on
Updated on

फिफा विश्वचषक २०२६ (FIFA World Cup 2026) मध्ये लिओनेल मेस्सीची जादू पाहण्यासाठी क्रीडाप्रेमींना फार काळ वाट पाहावी लागली नाही. अल्जेरियाविरुद्धच्या अर्जेंटिनाच्या सलामीच्या सामन्यात मेस्सीने शानदार हॅटट्रिक केले. यासह त्याने विश्वचषकाच्या इतिहासात सर्वाधिक गोल करण्याच्या जर्मनीच्या मिरोस्लाव क्लोसच्या (१६ गोल) विक्रमाचीही बरोबरी केली आहे. या सामन्‍यानंतर मेस्‍सीने माजी टेनिसपटू राफेल नदालशी आपली तुलना केली. मेस्सीच्या या कौतुकावर आता टेनिस स्टार राफेल नदालने प्रतिक्रिया दिली आहे.

सामन्‍यानंतर काय म्‍हणाला होता मेस्‍सी?

"मला फुटबॉल खेळायला आवडते. लहानपणापासूनच ही माझी आवड आहे. जेव्हा मी पूर्णपणे तंदुरुस्त असतो, तेव्हा मी माझे १०० टक्के देतो. सध्या आम्ही 'राफा नदाल'ची सीरिज पाहत आहोत. मी स्वतःला त्याच्याशी जोडू शकतो. मला वाटते की आपण दोघे या बाबतीत खूप सारखे आहोत. मला नेहमीच सर्वस्व पणाला लावायचे असते, नेहमीच सर्वोत्तम कामगिरी करायची असते आणि अशाच प्रकारे मी खेळाचा आनंद घेतो. जोपर्यंत मी खेळण्यासाठी पूर्णपणे सक्षम आहे, तोपर्यंत मी मैदानात असेन. माझ्या वाट्याला जे काही आले, ते सर्व अनुभवता आले याचा मला खूप आनंद आहे. सध्या मी जे जगतोय, ते माझ्यासाठी सोन्याहून पिवळं आहे. या अप्रतिम संघासोबत मी खूप आनंदी आणि कृतज्ञ आहे. मी या प्रत्येक क्षणाचा आनंद घेत आहे."

messi nadal comment
Brazil vs Morocco Analysis : ब्राझीलला रडवणारा मोरक्को ‘डार्क हॉर्स’ नव्हे 'हेवीवेट' संघ
Pudhari

मेस्‍सीच्‍या कौतुकावर राफेल नदालने दिली प्रतिक्रिया

मेस्सीच्या या कौतुकावर आता टेनिस स्टार राफेल नदालने प्रतिक्रिया दिली आहे. नदालने म्हटले, "धन्यवाद लिओनेल मेस्सी! विश्वचषकातील या धडाकेबाज सुरुवातीसाठी तुमचे खूप खूप अभिनंदन."

messi nadal comment
FIFA World Cup मध्ये भारतीय वंशाच्या खेळाडूंची गरुडझेप! परदेशी संघांमधून मैदान गाजवण्यासाठी सज्ज

मेस्सीचे ऐतिहासिक विक्रम

मेस्सीने २० वर्षांपूर्वी याच दिवशी सर्बिया आणि मॉन्टेनिग्रोविरुद्धच्या सामन्यातून विश्वचषकात पदार्पण केले होते आणि विशेष म्हणजे त्या सामन्यातही त्याने गोल केला होता. रोसारिओचा अभिमान असलेल्या मेस्सीने आता पुरुषांच्या ५ वेगवेगळ्या विश्वचषक स्पर्धांमध्ये गोल करणारा जगातील दुसरा खेळाडू बनण्याचा बहुमान मिळवला आहे.आपल्या कारकिर्दीतील विक्रमी ६ व्या विश्वचषकात खेळताना मेस्सीने आतापर्यंत एकूण १६ गोल केले आहेत, त्यामुळे आगामी काही आठवड्यांत क्लोसचा विक्रम मोडला जाणे जवळपास निश्चित मानले जात आहे. मेस्सीच्या कारकिर्दीतील ही ६१ वी हॅटट्रिक होती, तर अर्जेंटिनाच्या जर्सीमधील ११ वी आणि विश्वचषकातील पहिलीच हॅटट्रिक ठरली. तसेच, मेस्सीने सलग ५ व्या विश्वचषक सामन्यात गोल करण्याचा पराक्रम केला आहे.

messi nadal comment
VIDEO : सामना पोर्तुगालचा; घोषणा मेस्‍सीच्‍या! रोनाल्‍डोच्‍या निराशाजनक कामगिरीनंतर मैदानात नेमकं काय घडलं?

दुखापतीवर मात करत पुनरागमन

विश्वचषकापूर्वी इंटर मियामीकडून खेळताना मेस्सीला किरकोळ दुखापत झाली होती, ज्यामुळे त्याच्या तयारीचा वेग मंदावला होता. परंतु, फुटबॉल विश्वातील सर्वोत्तम खेळाडूचा मानला जाणारा 'बॅलन डी'ओर' (Ballon d'Or) पुरस्कार ८ वेळा जिंकणाऱ्या मेस्‍सीने गेल्या आठवड्यात आइसलँडविरुद्धच्या सराव सामन्यात कोणतीही अडचण आली नाही. त्या सामन्यात त्याने २० मिनिटे खेळताना पेनल्टी किकवर गोल करत आपण फॉर्मात असल्याचे दाखवून दिले आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news