FIFA World Cup 2026 | १३ मिनिटांत ३ गोल अन्‌ इजिप्‍तच्‍या जबड्यातून खेचून आणली विजयश्री; अटलांटात अर्जेंटिनाचे वादळ!

FIFA World Cup 2026 | १३ मिनिटांत ३ गोल अन्‌ इजिप्‍तच्‍या जबड्यातून खेचून आणली विजयश्री; अटलांटात अर्जेंटिनाचे वादळ!
FIFA World Cup 2026 | १३ मिनिटांत ३ गोल अन्‌ इजिप्‍तच्‍या जबड्यातून खेचून आणली विजयश्री; अटलांटात अर्जेंटिनाचे वादळ!
Published on
Updated on

अटलांटा : इजिप्तने फास जवळपास आवळलाच होता, विजयाची स्क्रिप्टही तयार होती...जेमतेम ११ मिनिटांचा खेळ बाकी असताना इजिप्‍तचा संघ २-० फरकाने आघाडीवर होता.... पण फुटबॉलच्या मैदानात जोपर्यंत अर्जेंटिना नावाचा वाघ जिवंत असताे, तोपर्यंत शिकार कोणाची होणार हे कोणीच ठरवू शकत नाही! २-० अशा मोठ्या फरकाने मागे पडलेल्या अर्जेंटिनाने पुढील १३ मिनिटांत सपासप ३ गोल करत असा काही पलटवार केला की, जबड्यातून विजय कधी खेचून नेला गेला, याचा इजिप्‍तला पत्ताच लागला नाही. या लढतीत अर्जेंटिनाने जी जोरदार मुसंडी मारला, त्‍याला शब्‍दश: तोड नव्‍हती!

मर्सिडीज-बेंझ स्टेडियमवर झालेल्या या सामन्यात इजिप्तने एकवेळ २-० अशी आघाडी घेत अर्जेंटिनाच्‍या गोटात अक्षरश: खळबळ उडवून दिली होती. १५ व्या मिनिटालाच यासर इब्राहिमने बुलेट हेडरद्वारे गोल करत अर्जेंटिनाला पहिला मोठा धक्का दिला. या धक्क्यातून गतविजेते सावरत असतानाच, २१ व्या मिनिटाला अर्जेंटिनाला पेनल्टी मिळाली. मात्र, इजिप्तचा गोलरक्षक मोस्तफा शोबेरने भिंत बनून लिओनेल मेस्सीची पेनल्टी अडवली आणि अर्जेंटिनाच्या चाहत्यांना स्तब्ध केले.

७९ व्‍या मिनिटाला ख्रिश्चन रोमेरोने इजिप्तचा मजबूत बचाव भेदत अर्जेंटिनासाठी पहिला गोल केला. पुढे ८३ व्‍या मिनिटाला मेस्सीने गोलजाळ्यात चेंडू धाडला आणि सामना २-२ अशा रोमांचक स्थितीत आणला. सामना एक्स्ट्रा टाईममध्ये जाणार असे वाटत असतानाच, इंज्युरी टाईमच्या दुसऱ्या मिनिटाला (९०+२') एन्झो फर्नांडेझने बॉक्सच्या बाहेरून एक सनसनाटी शॉट मारला. अर्जेंटिनाने ३-२ ने सामना जिंकून थेट उपांत्यपूर्व फेरीत धडक मारली.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news