FIFA World Cup 2026: इंग्लंडचे खेळाडू घेणार वायग्राचा सहारा... फिफा वर्ल्डकपपूर्वी मोठा खुलासा; WADA च्या नियमात बसतं का?

FIFA World Cup 2026
FIFA World Cup 2026pudhari
Published on
Updated on

FIFA World Cup 2026: फिफा वर्ल्डकप २०२६ चा राऊंड ऑफ १६ सुरू होत आहे. यामध्ये इंग्लंड आणि यजमान मॅक्सिको यांचा सामना होणार आहे. इंग्लंडची यंदाच्या वर्ल्डकपमधील सुरूवात जरी अडखळती झाली असली तरी त्यांना मोक्याच्यावेळी सूर गवसला आहे. मात्र आता त्यांना यजमान मॅक्सिकोशी भिडायचं आहे. हा सामना अटीतटीचा होईल असे जाणकारांचे मत आहे. मात्र या सामन्यापूर्वी इंग्लंड संघ एका वेगळ्याच गोष्टीसाठी चर्चेत आला आहे.

FIFA World Cup 2026
FIFA World Cup 2026 : नेमार-विनिशियसवर ब्राझीलच्या विश्वविजयाची मदार! जाणून घ्या संघाची ताकद आणि कमकुवत बाजू

इंग्लंड लढवणार वेगळी शक्कल

इंग्लंडचे खेळाडूंना या सामन्यापूर्वी जर गरज लागली तर वायग्रा (Sildenafil) घेण्याची परवानगी देण्यात आली आहे. सुरूवातीला वायग्रा हे औषध एका वेगळ्या कारणासाठी वापरलं जातं. मग मैदानावर सामना खेळत असताना याची गरज काय असा प्रश्न आपल्याला पडू शकतो. मात्र यामागे पूर्णपणे वैद्यकीय कारण आहे.

इंग्लंडचे मॅनेजर थॉमस टुखेल यांचा संघ ४ जुलै रोजी मॅक्सिको सिटीच्या ऐतिहासिक एस्टाडियो एज्टेका या मैदानात उतरणार आहे. हे स्टेडियम समुद्र सपाटीपासून जवळपास ७ हजार ३५० फूट उंचीवर आहे. इतक्या उंचीवर ऑक्सिजरनचा स्तर कमी होण्याची शक्यता आहे. त्यामुळं खेळाडू लवकर थकण्याची भीती आहे. त्यांना श्वास घ्यायला अचडणी येऊ शकतात.

FIFA World Cup 2026
Mexico Free Condoms FIFA World Cup : 13 सामने.. 70 लाख कंडोमचे मोफत वाटप! मेक्सिकोची भन्नाट तयारी

हाय अल्टिट्यूडवर वायग्राचा उपाय

या आव्हानाचा सामना करण्यासाठी इंग्लंडच्या संघाने एक शक्कल लढलवली आहे. संघ व्यवस्थापनाने खेळाडूंना जर गरज लागली तर वायग्रा (Sildenafil) घेण्याचा पर्याय ठेवला आहे. हे औषध Erectile Dysfunction च्या उपचारासाठी वापरलं जातं. मात्र हे औषध रक्तवाहिन्यांमध्ये पसरून रक्तप्रवाह चांगला करण्यास मदत करतं. त्यामुळंच हाय अल्टिट्यूडवर असलेल्या या मैदानात शरिराला योग्य प्रमाणात ऑक्सिजन मिळावा यासाठी या औषधाचा वापर केला जाणार आहे.

FIFA World Cup 2026
FIFA World Cup 2026 : 'मैदानात धावणार 'हा' खास चेंडू !'

WADA चे काय आहेत नियम?

वर्ल्ड अँटी डोपिंग एजन्सी अर्थात WADA ने वायग्राला प्रतबंधित औषधांच्या यादीत टाकलेलं नाही. खेळाडू सामन्यादरम्यान किंवा सामन्यानंतर याचा वापर करू शकतात. वाडाने या औषधाचा अभ्यास केला आहे. या अभ्यासात समुद्रसपाटीपासून उंचीवर असलेल्या ठिकाणी या औषधाचा वापर करून खेळाडूच्या कामगिरीवर फार काही मोठा परिणाम किंवा मोठा फायदा होत नाही. त्यामुळं वाडाच्या दृष्टीकोणातून हे औषध पूर्णपणे वैध औषध मानलं गेलं आहे.

FIFA World Cup 2026
FIFA World Cup | यंदाचा फिफा वर्ल्ड कप ठरणार सर्वात ‘हॉट’

मॅक्सिकोचे मोठे आव्हान

मॅक्सिकोसाठी एस्टाडियो एज्टेका हा त्यांचा मजबूत गड राहिलेला आहे. यंदाच्या वर्ल्डकपमध्ये संघाने आपले चाहरी सामने जिंकले आहेत. या स्टेडियमवर मॅक्सिकोने आतापर्यंत ८९ सामन्यात फक्त दोनवेळा पराभव पाहिला आहे. त्यांची या मैदानावरील शेवटची हार ही २०१३ मध्ये झाली होती. त्यामुळं इंग्लंडला या सामन्यात एक कडवट प्रतिस्पर्धी अन् हाय अल्टिट्यूडचा देखील सामना करायचा आहे. त्यामुळं या सामन्याकडं सर्वांचे लक्ष आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news