Umpire Injury Video: फलंदाजाच्या जोरदार फटक्याने अंपायर गंभीर जखमी; मैदानातून थेट ICU मध्ये; धक्कादायक VIDEO समोर

DPL 2026 Umpire Injury: दिल्ली प्रीमियर लीग 2026 मध्ये फलंदाज लक्ष्य थरेजाच्या जोरदार स्ट्रेट ड्राइव्हचा चेंडू थेट अंपायर धर्मेश भारद्वाज यांच्या चेहऱ्यावर लागला.
DPL 2026 Umpire Injury Video
DPL 2026 Umpire Injury Video
Published on
Updated on

DPL 2026 Umpire Injury: दिल्ली प्रीमियर लीग (DPL) 2026 मधील एका सामन्यात धक्कादायक घटना घडली आहे. ईस्ट दिल्ली राइडर्स आणि न्यू दिल्ली टायगर्स यांच्यातील सामन्यादरम्यान फलंदाजाच्या जोरदार फटक्याने मैदानावरील अंपायर धर्मेश भारद्वाज गंभीर जखमी झाले. चेंडू थेट त्यांच्या चेहऱ्याच्या उजव्या बाजूला लागल्याने त्यांना तातडीने उपचारासाठी रुग्णालयात नेण्यात आले असून, त्यांना ICU मध्ये दाखल करण्यात आले आहे.

नेमकं काय घडलं?

न्यू दिल्ली टायगर्सची टीम 193 धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करत होती. डावाच्या 18व्या षटकात फलंदाज लक्ष्य थरेजा याने डावखुरा फिरकीपटू आशीष मीणा याच्या चेंडूवर अतिशय जोरदार स्ट्रेट ड्राइव्ह खेळला.

चेंडू इतका वेगवान होता की गोलंदाजालाही तो अडवता आला नाही. चेंडू थेट मैदानावरील अंपायर धर्मेश भारद्वाज यांच्या चेहऱ्याच्या उजव्या बाजूला जाऊन आदळला. अचानक झालेल्या या प्रकारात त्यांना स्वतःचा बचाव करण्याची संधीही मिळाली नाही.

घटनेनंतर मैदानावर एकच खळबळ उडाली. सामना तात्काळ थांबवण्यात आला आणि वैद्यकीय पथकाला मैदानावर बोलावण्यात आले. अंपायर गंभीर जखमी झाल्याने त्यांना रुग्णालयात नेण्यात आले.

DPL 2026 Umpire Injury Video
Pune Job Crisis: पुण्यात पाच वर्षांत 6,433 उद्योग बंद; महाराष्ट्रात 36 हजारांहून अधिक कंपन्यांवर बंद होण्याची वेळ

DPL 2026 मध्ये दुसऱ्यांदा अंपायर जखमी

धर्मेश भारद्वाज यांच्यासोबत DPL 2026 मध्ये अशी घटना दुसऱ्यांदा घडल्याची माहिती समोर आली आहे. यापूर्वी लीगमधील एका सामन्यात फलंदाजाचा सरळ फटका त्यांच्या खांद्यावर लागला होता. मात्र, यावेळी चेंडू थेट चेहऱ्यावर लागल्याने दुखापत अधिक गंभीर झाली. हा अपघात झाल्यानंतर फलंदाज लक्ष्य थरेजा देखील खूपच चिंतेत आणि दुःखी दिसला.

DPL 2026 Umpire Injury Video
Abhijit Dipke CJP: अभिजीत दीपकेंना NDA ची ऑफर; मोदी सरकारमधील केंद्रीय मंत्र्यांचे पक्षात येण्याचे आमंत्रण

ईस्ट दिल्ली राइडर्सने केल्या 192 धावा

या सामन्यात ईस्ट दिल्ली राइडर्सने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी केली. त्यांनी 20 षटकांत 7 विकेट गमावत 192 धावा केल्या.

वंश मेहरा आणि अर्पित राणा यांनी संघाला दमदार सुरुवात करून दिली. त्यानंतर मयंक रावतने 23 चेंडूत 40 धावा, तर सूर्यांश रैनाने 21 चेंडूत 33 धावा करत संघाची धावसंख्या मजबूत केली.

न्यू दिल्ली टायगर्सकडून ऋषभ शर्माने 4 षटकांत 34 धावा देत 3 विकेट, तर लक्ष्मणने 4 षटकांत 31 धावा देत 2 विकेट घेतल्या.

36 धावांनी ईस्ट दिल्लीचा विजय

193 धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करताना न्यू दिल्ली टायगर्सची फलंदाजी अपेक्षेप्रमाणे झाली नाही. संपूर्ण संघ 156 धावांवर ऑलआउट झाला.

त्यामुळे ईस्ट दिल्ली राइडर्सने हा सामना 36 धावांनी जिंकला. मात्र, सामन्याच्या निकालापेक्षा अंपायर धर्मेश भारद्वाज यांना झालेल्या गंभीर दुखापतीचीच सर्वाधिक चर्चा होत आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news