Dilip Vengsarkar on Rohit Sharma : ‘रोहित शर्मासोबत असे घडणे दुर्दैवी!’; विश्वचषक निवडीच्या चर्चेवरून दिलीप वेंगसरकर भडकले

गिल तिन्ही फॉरमॅटचा कर्णधार? दिलीप वेंगसरकर यांनी उपस्थित केली मोठी शंका
Dilip Vengsarkar on Rohit Sharma : ‘रोहित शर्मासोबत असे घडणे दुर्दैवी!’; विश्वचषक निवडीच्या चर्चेवरून दिलीप वेंगसरकर भडकले
Published on
Updated on

मुंबई : भारतीय क्रिकेट संघाचा अनुभवी फलंदाज रोहित शर्मा २०२७ च्या एकदिवसीय विश्वचषकात खेळणार की नाही, याबाबत अद्याप अनिश्चितता कायम आहे. ३९ वर्षीय रोहित सध्या केवळ एकदिवसीय क्रिकेट प्रकारात भारताचे प्रतिनिधित्व करत असून, त्याने आतापर्यंत खेळलेल्या २८८ एकदिवसीय सामन्यांत ३४ शतके आणि ६२ अर्धशतकांच्या जोरावर ११,८९५ धावा रचल्या आहेत. असे असतानाही, रोहितचे एकदिवसीय क्रिकेटमधील भवितव्य आणि आगामी विश्वचषकातील त्याच्या स्थानावरून सुरू असलेल्या चर्चांवर भारताचे माजी कर्णधार व ज्येष्ठ फलंदाज दिलीप वेंगसरकर यांनी तीव्र नाराजी व्यक्त केली आहे. रोहितच्या बाबतीत असे घडणे अत्यंत दुर्दैवी असल्याचे स्पष्ट करत, अशा स्वरूपाच्या तर्कवितर्कांना पूर्णविराम मिळायला हवा, असे रोखठोक मत त्यांनी मांडले आहे.

रोहित शर्माने जुलै २०२६ मध्ये इंग्लंड दौऱ्यादरम्यान लॉर्ड्सच्या ऐतिहासिक मैदानावर शानदार शतक झळकावून आपला अखेरचा एकदिवसीय सामना खेळला होता. त्या सामन्यानंतर ‘हिटमॅन’ म्हणून प्रसिद्ध असलेला रोहित आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती स्वीकारणार असल्याच्या जोरदार चर्चा रंगल्या होत्या; तथापि, भारतीय क्रिकेट नियामक मंडळाने (बीसीसीआय) या चर्चा तत्काळ फेटाळून लावल्या होत्या. या संपूर्ण पार्श्वभूमीवर ‘रेव्हस्पोर्ट्स’शी बोलताना वेंगसरकर यांनी आपली भूमिका स्पष्ट केली.

Dilip Vengsarkar on Rohit Sharma : ‘रोहित शर्मासोबत असे घडणे दुर्दैवी!’; विश्वचषक निवडीच्या चर्चेवरून दिलीप वेंगसरकर भडकले
Asian Games : श्रेयस अय्यरच्या नेतृत्वाखाली टीम इंडिया जपानमध्ये दाखल; भारत-जपान सामन्याची वेळ, संघ अन् Live Streaming जाणून घ्या

वेंगसरकर म्हणाले की, "रोहितने महत्त्वाच्या आणि मोठ्या सामन्यांमध्ये सातत्याने धावा केल्या असून भारताला अनेक ऐतिहासिक विजय मिळवून दिले आहेत. तरीही त्याच्या गुणवत्तेवर आणि क्षमतेवर वारंवार प्रश्नचिन्ह उपस्थित केले जाणे निराशाजनक आहे. पुढील विश्वचषकात तो खेळणार की नाही हे मला ठाऊक नसले, तरी त्याच्यामध्ये अजूनही दर्जेदार क्रिकेट शिल्लक आहे. त्याचे संघातील स्थान हे पूर्णपणे त्याच्या कामगिरीवर आणि तंदुरुस्तीवर अवलंबून असेल. परंतु मला ठाम विश्वास आहे की, सलामीवीर म्हणून संघात त्याच्यासाठी निश्चितच स्थान उपलब्ध आहे."

दुसऱ्या बाजूला, २०२७ च्या एकदिवसीय विश्वचषकातील सहभागाबाबत विचारले असता खुद्द रोहित शर्माने संयमी पवित्रा घेतला होता. मुंबईतील एका कार्यक्रमादरम्यान त्याने, "ऑक्टोबर २०२७ ची स्पर्धा अद्याप खूप लांब असून, त्या वेळी परिस्थिती पाहून काय तो निर्णय घेतला जाईल," अशी प्रतिक्रिया दिली होती. दक्षिण आफ्रिका, झिम्बाब्वे आणि नामिबिया यांच्या संयुक्त यजमानपदाखाली पुढील वर्षी ऑक्टोबर महिन्यात हा बहुप्रतिक्षित एकदिवसीय विश्वचषक रंगणार आहे.

Dilip Vengsarkar on Rohit Sharma : ‘रोहित शर्मासोबत असे घडणे दुर्दैवी!’; विश्वचषक निवडीच्या चर्चेवरून दिलीप वेंगसरकर भडकले
Suchika Tariyal MMA medal Asian Games 2026: कडवी झुंज, वाद अन् अश्रू; तरी सुचिकाने इतिहास रचला! जिंकून दिलं MMA मधील पहिलं पदक

दरम्यान, रोहितचा एकदिवसीय क्रिकेटमधील सलामीचा जोडीदार शुभमन गिलच्या फलंदाजीचे वेंगसरकर यांनी भरभरून कौतुक केले, मात्र तिन्ही प्रकारांत त्याच्याकडे नेतृत्व सोपवण्याबाबत त्यांनी साशंकता व्यक्त केली. सध्या गिलकडे कसोटी व एकदिवसीय संघाची धुरा असून, श्रेयस अय्यर टी-२० संघाचे नेतृत्व सांभाळत आहे. गिल तिन्ही फॉरमॅटचा कर्णधार होऊ शकेल का, या प्रश्नावर वेंगसरकर म्हणाले की, "सर्व प्रकारांत एकाच कर्णधाराबाबत खात्रीने बोलणे कठीण आहे. संघात सर्वप्रथम अव्वल अकरा खेळाडूंची निवड करावी लागते आणि कर्णधार हा त्या प्लेइंग इलेव्हनमध्ये आपोआप स्थान मिळवणारा असायला हवा. शुभमन गिल हा नक्कीच एक उत्कृष्ट खेळाडू असून मला त्याची फलंदाजी आवडते. इंग्लंडमध्ये त्याने ज्या पद्धतीने संघाचे नेतृत्व केले ते अप्रतिम होते. कर्णधार आणि फलंदाज म्हणून त्याने छाप पाडली असून, भविष्यातही तो उत्तम कामगिरी करेल अशी मला आशा आहे."

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news