IND vs NZ ODI : वनडे मालिकेआधी न्‍यूझीलंड संघाला आणखी मोठा धक्‍का, 'हा' स्‍टार फलंदाज संघाबाहेर

भारत आणि न्यूझीलंडममधील पहिली वनडे बुधवारी ऑकलंडमध्ये खेळवला जाणार
Devon Conway injury update IND vs NZ
Published on: 
Updated on: 
Summary

भारत आणि न्यूझीलंड यांच्यातील पहिला एकदिवसीय सामना ४ नोव्हेंबर रोजी ऑकलंडमध्ये खेळवला जाणार आहे.

Devon Conway injury update IND vs NZ : भारताविरुद्धच्या पाच सामन्यांच्या एकदिवसीय मालिकेपूर्वी न्यूझीलंडला आणखी एक मोठा धक्का बसला आहे. सलामीवीर डेव्हॉन कॉनवे ऑकलंडमधील पहिल्या एकदिवसीय सामन्यातून बाहेर पडला आहे.

सराव सत्रादरम्‍यान मॅट हेन्रीशी धडक

मंगळवारी (३ नोव्हेंबर) ईडन पार्कवर न्यूझीलंडच्या सराव सत्रादरम्यान, कॉनवेची धडक वेगवान गोलंदाज मॅट हेन्रीशी झाली, ज्यामध्ये त्याला डोक्याला दुखापत झाली.

Devon Conway injury update IND vs NZ
Kapil Dev : "तो विनोद कांबळीसारखा गायब न व्हावा..." : वैभव सूर्यवंशीबाबत माजी क्रिकेटपटू कपिल देव नेमकं काय म्हणाले?

तत्‍काळ तपासणी

न्यूझीलंडचा कर्णधार मिचेल सँटनरने सांगितले की, सरावा दरम्‍यान मॅट हेन्रीशी झालेल्‍या धडकेत कॉनवेच जखमी झाला. त्‍याला रुग्‍णालयात दाखल करण्‍यात आले. येथे त्‍याची 'कन्कशन टेस्ट' (मेंदूला झालेल्या दुखापतीची चाचणी) घेण्‍यात आली. यामध्‍ये मॅट हेन्रीची प्रकृती ठीक असल्याचे आढळले.

'कन्‍कशन'मुळे कॉनवे पहिल्‍या वनडेला मुकणार

न्यूझीलंड क्रिकेटच्या (NZC) प्रसिद्धीपत्रकानुसार, कॉनवेला पुढील तपासणीसाठी रुग्णालयाच्या आपत्कालीन विभागात (A&E) नेण्यात आले, जिथे त्याला 'कन्कशन' (मेंदूला झालेली दुखापत) झाल्याचे स्पष्ट झाले. परिणामी, तो ऑकलंडमधील एकदिवसीय सामन्यातून बाहेर झाला आहे.

Devon Conway injury update IND vs NZ
Sunil Gavaskar : "टीम इंडियाने त्‍याचा पर्याय शोधणे...." : हार्दिक पांड्याबाबत सुनील गावस्‍कर नेमकं काय म्‍हणाले?

खेळाडूंच्या दुखापतींमुळे न्यूझीलंड अडचणीत

डेव्हॉन कॉनवे हा न्यूझीलंड क्रिकेट संघात प्रामुख्याने सलामीवीर आहेतच त्‍याचबरोबर तो यष्टीरक्षक म्हणून भूमिका बजावतो. आता न्यूझीलंडच्या दुखापतग्रस्त खेळाडूंच्या यादीत आता कॉनवेचेही भर पडली आहे. याआधी, फलंदाज मार्क चॅपमन आणि रचिन रवींद्र हे अनुक्रमे हॅमस्ट्रिंग (मांडीच्या स्नायूंची दुखापत) आणि खांद्याच्या दुखापतीमुळे एकदिवसीय मालिकेतून बाहेर झाले होते.

कॉनवेच्‍या जागी टिम सायफर्टला मिळणार संधी

टिम सायफर्ट, ज्याचा सुरुवातीला केवळ पहिल्या दोन एकदिवसीय सामन्यांसाठी संघात समावेश करण्यात आला होता, त्याला सोमवारी (२ नोव्हेंबर) संपूर्ण मालिकेसाठी संघात समाविष्ट करण्यात आले. सँटनरने संकेत दिले आहेत की, जर कॉनवे उपलब्ध नसेल, तर त्याच्या जागी टिम सायफर्ट खेळण्याची शक्यता आहे.