

Gautam Gambhir Death Threat Case Engineering Student Arrest by Delhi Police
नवी दिल्ली : भारतीय क्रिकेट संघाचे मुख्य प्रशिक्षक गौतम गंभीर यांना जीवे मारण्याची धमकी देणाऱ्या एका 21 वर्षीय तरुणाला दिल्ली पोलिसांनी अटक केली आहे. हा तरुण गुजरातमधील असून तो अभियांत्रिकी विद्यार्थी आहे. जिग्नेशसिंह परमार असे त्याचे नाव आहे. त्याने 22 एप्रिल 2025 रोजी गौतम गंभीर यांना ‘I Kill You’ असा मजकूर असलेले दोन धमकीचे ईमेल पाठवले होते. या ईमेल्समध्ये ‘ISIS Kashmir’ असा उल्लेख होता.
गंभीर यांनी या धमकीबद्दल दिल्ली पोलिसांकडे तत्काळ तक्रार दाखल केली होती. पोलिसांनी तपास सुरू केला. या करवाईत परमारला अटक झाली. दरम्यान, जिग्नेशसिंह परमार हा मानसिक रुग्ण असल्याचे स्पष्टीकरण त्याच्या कुटुंबीयांनी दिले. पण पोलिसांनी अधिक तपास सुरू ठेवला आहे.
मध्य दिल्ली पोलिसांच्या पथकाने जिग्नेश सिंग परमारला ताब्यात घेतले आणि त्याची आणि त्यांच्या कुटूंबाची कसून चौकशी देखील करण्यात आली आहे. जेव्हा आरोपीची चौकशी केली तेव्हा चौकशीदरम्यान, त्याच्या कुटुंबाने सांगितले की तो मानसिक आरोग्याच्या समस्यांनी ग्रस्त होता. दिल्ली पोलिसांनी या प्रकरणावर आता बारकाईने लक्ष दिले आणि घटनेचा सखोल तपास केला जात आहे. आरोपी जिग्नेशसिंह याने हा मेल का पाठवला आणि त्यामागे इतर कोणतेही कारणे आहेत यावर तपास केला जात आहे, एवढेच नव्हे तर या मेल मागे म्हणजेच धमकीमागे किती व्यक्ती सामील आहे का याचा तपास केला जात असल्याचे अधिकाऱ्यांनी सांगितले आहे. सध्या आरोपीची अधिक चौकशी सुरू असून पोलिस संपूर्ण प्रकरणावर लक्ष ठेवून आहेत.
जम्मू-काश्मीरमधील पहलगाम येथे पर्यटकांवर झालेल्या दहशतवादी हल्ल्यावर गौतम गंभीरने तीव्र प्रतिक्रिया दिली होती. मंगळवारी सोशल मीडिया प्लॅटफॉर्म X वर त्यांनी हल्ल्याचा निषेध केला आणि लिहिले, “माझ्या प्रार्थना मृतांच्या कुटुंबियांसोबत आहेत.” या हल्ल्यातील गुन्हेगारांना त्याची मोठी किंमत मोजावी लागेल. गंभीरनेही या हल्ल्याविरुद्ध कडक कारवाईची मागणी केली होती.
गंभीर यांना यापूर्वीही 2021 मध्ये अशा प्रकारच्या धमक्या मिळाल्या होत्या, ज्यामुळे त्यांच्या सुरक्षेत वाढ करण्यात आली होती.