

दिल्ली कॅपिटल्सने आरसीबीविरुद्ध शानदार पुनरागमन करत ६ गडी राखून सामना जिंकला. या विजयासह दिल्लीचा संघ सलग दोन पराभवांनंतर पुन्हा एकदा विजयाच्या मार्गावर परतला आहे.
RCB vs DC IPL 2026
बंगळूरु : केएल राहुल आणि ट्रिस्टन स्टब्स यांच्या अर्धशतकांच्या जोरावर दिल्ली कॅपिटल्सने आरसीबीचा दिल्ली कॅपिटल्सला (DC) शेवटच्या षटकात १५ धावांची आवश्यकता होती. डेव्हिड मिलरने सलग दोन षटकार आणि एक चौकार ठोकत, एक चेंडू बाकी असतानाच संघाचा विजय निश्चित केला. आरसीबीने प्रथम फलंदाजी करताना २० षटकांत ८ बाद १७५ धावा केल्या होत्या. प्रत्युत्तरात दिल्लीने ४ गडी गमावून १७९ धावा करत विजयावर शिक्कामोर्तब केले.
दिल्लीच्या या विजयात केएल राहुल, ट्रिस्टन स्टब्स आणि डेव्हिड मिलर विजयाचे शिल्पकार ठरले.ट्रिस्टन स्टब्स: ४७ चेंडूत ४ चौकार आणि १ षटकारासह नाबाद ६० धावा केल्या. तर केएल राहुल ३४ चेंडूत ६ चौकार आणि २ षटकारांसह ५७ धावा फटकावल्या. डेव्हिड मिलर १० चेंडूत १ चौकार आणि २ षटकारांच्या मदतीने २२ धावांवर नाबाद राहिला. आरसीबीकडून गोलंदाजी करताना भुवनेश्वर कुमारने ३ गडी बाद केले, तर कृणाल पांड्याला १ विकेट मिळाली.
दिल्ली कॅपिटल्सचा कर्णधार अक्षर पटेल 'रिटायर्ड हर्ट' होऊन मैदाबाहेर गेला. अक्षर आणि स्टब्स यांच्यात पाचव्या विकेटसाठी चांगली भागीदारी होत होती, मात्र स्नायूंच्या ओढीमुळे (खिंचाव) त्याला मैदान सोडावे लागले. अक्षरने १९ चेंडूत २६ धावा केल्या होत्या.
नाणेफेक हारल्यानंतर प्रथम फलंदाजीला उतरलेल्या आरसीबीने दिल्लीसमोर १७६ धावांचे आव्हान ठेवले होते. दिल्लीने टॉस जिंकून प्रथम गोलंदाजीचा निर्णय घेतला होता. आरसीबीसाठी फिल सॉल्टने सर्वाधिक ६३ धावा केल्या, तर टिम डेव्हिडने २६ धावांचे योगदान दिले. इतर फलंदाजांमध्ये विराट कोहली (१९), देवदत्त पडिक्कल (१८) आणि जितेश शर्मा (१४) यांनी धावा केल्या. दिल्लीच्या गोलंदाजांनीही शिस्तबद्ध मारा केला. लुंगी एनगिडी, कुलदीप यादव आणि अक्षर पटेल यांनी प्रत्येकी २ बळी घेतले, तर मुकेश कुमारला १ विकेट मिळाली.