RCB vs RR : जैस्वाल-सूर्यवंशी विरुद्ध कोहली-पडिक्कल टशन!, राजस्थान-आरसीबी गुवाहाटीत आमनेसामने

IPL 2026 : उभय संघांकडून धावांची आतषबाजी अपेक्षित
RCB vs RR : जैस्वाल-सूर्यवंशी विरुद्ध कोहली-पडिक्कल टशन!, राजस्थान-आरसीबी गुवाहाटीत आमनेसामने
Published on
Updated on

गुवाहाटी : यंदाच्या आयपीएल हंगामात उत्तम बहरात असलेले राजस्थान रॉयल्स व आरसीबीचे संघ आज (शुक्रवार, दि. 10) गुवाहाटीत आमनेसामने भिडणार असून यानिमित्ताने राजस्थान रॉयल्सचे सलामीवीर यशस्वी जैस्वाल आणि वैभव सूर्यवंशी तसेच आरसीबीचे देवदत्त पडिक्कल-विराट कोहली यांच्यात कोण बाजी मारणार, याची उत्सुकता असेल.

विराट कोहलीच्या सातत्यपूर्ण कामगिरीमुळे आरसीबीची वरची फळी अधिक मजबूत झाली आहे. त्यात फिल सॉल्टच्या आक्रमकतेची भर पडल्याने प्रतिस्पर्धी गोलंदाजांवर दडपण येत आहे. गेल्या हंगामात विजेतेपदात मोलाचा वाटा उचलणाऱ्या देवदत्त पडिक्कलने चेन्नई व हैदराबादविरुद्ध सलग दोन अर्धशतके झळकावत आपले आक्रमक इरादे अधोरेखित केले आहे. आरसीबीची गोलंदाजी धुरा जोश हेझलवूडच्या अनुपस्थितीत जेकब डफीने समर्थपणे पेलली आहे.

राजस्थानची युवा शक्ती

राजस्थान रॉयल्सकडे यंदाच्या हंगामातील सर्वात स्फोटक फलंदाजी आहे. जैस्वाल आणि अवघ्या 15 वर्षांच्या वैभव सूर्यवंशीने संघाला सातत्याने वेगवान सुरुवात करून दिली आहे. विशेषतः सूर्यवंशीने जसप्रीत बुमराहसारख्या दिग्गज गोलंदाजाला पहिल्याच चेंडूवर षटकार मारून सर्वांचे लक्ष वेधून घेतले आहे. जैस्वालने देखील मुंबई इंडियन्स विरुद्ध नाबाद 77 धावांची खेळी करत आपली प्रगल्भता सिद्ध केली आहे. राजस्थानची गोलंदाजीदेखील शिस्तबद्ध असून हा संघ सध्या अत्यंत संतुलित दिसत आहे. सायंकाळी 7.30 वाजता सुरू होणाऱ्या या सामन्यात गुवाहाटीच्या खेळपट्टीवर धावांची टांकसाळ उघडण्याची दाट शŠयता आहे.

हेड टू हेड

एकूण सामने : 34

आरसीबी विजयी : 17

राजस्थान विजयी : 14

निकाल नाही : 3

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news