Pant Goenka Video: पराभवानंतर LSGच्या गोटात खळबळ... गोएंका आणि ऋषभ पंत यांच्यात शाब्दिक चकमक

LSG vs DC IPL 2026: दिल्ली कॅपिटल्सने 26/4 अशा स्थितीतून कमबॅक करत LSG ला पराभूत केलं. सामन्यानंतर पंत आणि गोयंका यांच्यातील चर्चेचा व्हिडिओ व्हायरल झाला आहे.
Pant Goenka Video
Pant Goenka VideoPudhari
Published on
Updated on

LSG vs DC IPL 2026: इंडियन प्रीमियर लीग (IPL) 2026 मध्ये लखनऊ सुपर जायंट्सला मोठा धक्का बसला आहे. 1 एप्रिल रोजी झालेल्या सामन्यात Lucknow Super Giants (LSG) ला Delhi Capitals (DC) कडून 6 विकेट्सनी पराभव स्वीकारावा लागला.

लखनऊच्या भारतरत्न श्री अटलबिहारी वाजपेयी एकना क्रिकेट स्टेडियम येथे झालेल्या या सामन्यात LSG ने दिलेलं 142 धावांचं टार्गेट दिल्लीने अगदी सहज गाठलं.

दिल्लीची खराब सुरुवात, पण नंतर कमबॅक

दिल्ली कॅपिटल्सची सुरुवात अत्यंत खराब झाली. अवघ्या 26 धावांवर 4 विकेट्स गेल्यानं सामना LSG च्या बाजूने झुकल्यासारखा वाटत होतं. मात्र यानंतर समीर रिजवी आणि ट्रिस्टन स्टब्स यांनी जबरदस्त खेळी करत सामना फिरवला. दोघांनी मिळून 119 धावांची नाबाद भागीदारी करत LSG च्या गोलंदाजांवर जोरदार पलटवार केला.

रिजवी-स्टब्सची मॅच-विनिंग भागीदारी

‘इम्पॅक्ट सब’ समीर रिजवीने 47 चेंडूत नाबाद 70 धावा केल्या, तर ट्रिस्टन स्टब्सने 32 चेंडूत नाबाद 39 धावांची महत्त्वपूर्ण खेळी केली. या जोरावर दिल्लीने 17.1 षटकांत सहज लक्ष्य गाठलं आणि शानदार विजय मिळवला.

Pant Goenka Video
Adam Zampa PSL | IPL सोडून पाकिस्तानचे PSL का निवडले? ऑस्ट्रेलियन फिरकीपटूने दिले उत्तर

सामन्यानंतर LSG कॅम्पमध्ये तणाव?

सामना संपल्यानंतर मैदानावर एक वेगळंच दृश्य पाहायला मिळालं. LSG चे मालक संजीव गोएंका, कर्णधार ऋषभ पंत आणि कोच जस्टिन लँगर यांच्यात मैदानावरच गंभीर चर्चा झाल्याचं दिसलं.

सोशल मीडियावर व्हायरल झालेल्या व्हिडिओमध्ये गोयंका काहीतरी बोलताना दिसतात, तर पंतही आपलं मत मांडताना दिसतो. या चर्चेमुळे चाहत्यांमध्ये अनेक तर्क-वितर्क सुरू झाले आहेत.

LSG च्या पराभवाचं कारण काय?

LSG ची सुरुवात गोलंदाजीत दमदार झाली होती. मोहम्मद शमीने आपल्या डेब्यू सामन्यात पहिल्याच चेंडूवर केएल राहुलला बाद केलं. यानंतरही काही विकेट्स मिळाल्या, पण मधल्या षटकांमध्ये LSG च्या गोलंदाजांनी पकड सैल झाली. याचाच फायदा घेत दिल्लीने सामना आपल्या बाजूने फिरवला.

Pant Goenka Video
LSG vs DC | दिल्ली कॅपिटल्सचा लखनौवर दमदार विजय

दिल्ली कॅपिटल्सचा पुढील सामना 4 एप्रिल रोजी मुंबई इंडियन्सविरुद्ध होणार आहे. तर लखनऊ सुपर जायंट्स 5 एप्रिलला सनरायझर्स हैदराबादविरुद्ध मैदानात उतरणार आहे.

26/4 अशा खराब स्थितीतून दिल्लीने मिळवलेला विजय हा या हंगामातील मोठ्या कमबॅकपैकी एक ठरला आहे. तर LSG साठी हा पराभव अनेक प्रश्न निर्माण करणारा ठरला असून, पुढील सामन्यात ते कसे खेळतात याकडे सर्वांचं लक्ष असेल.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news