Commonwealth Games 2026: राष्ट्रकुलमध्ये भारताचा दबदबा कायम; श्रीशंकरची 'रौप्य'उडी, तर दिलीप गावितचा विक्रमी 'सुवर्ण'वेध

कॉमनवेल्थ क्रीडा स्पर्धेत लांब उडीत मुरली श्रीशंकरने सलग दुसरे रौप्य पदक पटकावले, तर पॅरा ॲथलेटिक्समध्ये दिलीप महादू गावितने सुवर्णपदकावर आपले नाव कोरले.
Dilip Mahadu Gavit, Murali Sreeshankar
Dilip Mahadu Gavit, Murali Sreeshankar file photo
Published on
Updated on

Commonwealth Games 2026

नवी दिल्ली: कॉमनवेल्थ क्रीडा स्पर्धेत भारतीय खेळाडूंचा दबदबा कायम आहे. बुधवारी लांब उडीत ॲथलीट मुरली श्रीशंकरने सलग दुसरे रौप्य पदक पटकावले, तर पॅरा ॲथलेटिक्समध्ये दिलीप महादू गावितने सुवर्णपदकावर आपले नाव कोरले. याशिवाय, भारतीय बॉक्सर्सनी उपांत्य फेरीत धडक मारत देशासाठी तब्बल १० पदके निश्चित केली.

बुधवारी आणखी तीन पदकांची भर पडल्याने भारताची एकूण पदकांची संख्या १५ (तीन सुवर्ण, नऊ रौप्य आणि तीन कांस्य) झाली असून, भारत गुणतालिकेत आठव्या स्थानावर कायम आहे.

Dilip Mahadu Gavit, Murali Sreeshankar
Gulveer Singh Create History: गुलवीर सिंगने इतिहास रचला! राष्ट्रकुलच्या ट्रॅकवर भारताची पहिल्यांदाच 'रूपेरी' कामगिरी

श्रीशंकरची आणखी एका रौप्यपदकावर मोहोर

श्रीशंकरने पुरुषांच्या लांब उडी प्रकारात ८.०९ मीटरच्या सर्वोत्तम कामगिरीसह रौप्यपदक जिंकून आपली उत्कृष्ट लय कायम राखली. २०२२ मध्येही तो दुसऱ्या स्थानावर राहिला होता; या प्रकारात सलग दोनदा कॉमनवेल्थ गेम्सची पदके जिंकणारा तो पहिला भारतीय ठरला आहे. त्याच्या ८.०३ मीटरच्या पहिल्या उडीमुळे तो स्कॉटलंडचा स्टीफन मॅकेन्झी आणि जमैकाचा ताजे गेल (ज्यांनी प्रत्येकी ८.०८ मीटरची उडी मारली होती) यांच्या मागे तिसऱ्या स्थानावर होता.

८.०९ मीटरच्या उडीसह श्रीशंकर काही काळासाठी आघाडीवर आला होता, परंतु गेलने ८.१५ मीटरची विजयी उडी मारून सुवर्णपदक आपल्या नावे केले. मॅकेन्झी ८.०८ मीटरसह कांस्यपदकावर समाधान मानले, तर भारताच्या लोकेश सत्यनाथनने ७.९७ मीटरच्या सर्वोत्तम उडीसह पाचवे स्थान मिळवले.

पॅरा-ॲथलेटिक्समध्ये दिलीप आणि बासिल यांची ऐतिहासिक कामगिरी

हातांचे दोष असलेल्या ॲथलीट्ससाठीच्या पुरुषांच्या १०० मीटर टी ४७ प्रकारात पहिले आणि दुसरे स्थान पटकावत भारताने पॅरा-ॲथलेटिक्समध्ये इतिहास रचला. गावितने १०.७१ सेकंदांची वेळ नोंदवून 'गेम्स रेकॉर्ड'सह सुवर्णपदक जिंकले. मोहम्मद बासिल मोर्सिंगनाकाथीने १०.८३ सेकंदांची नोंद करत दुसरे स्थान मिळवले आणि रौप्यपदक पटकावले.

मीराबाई चानूने महिलांच्या ४८ किलो वजनी गटातील वेटलिफ्टिंगचे विजेतेपद आणि शर्मिला धनकरने महिलांच्या शॉट पुट F57 प्रकारात सुवर्णपदक जिंकल्यानंतर, भारताचे या गेम्समधील हे तिसरे सुवर्णपदक ठरले.

Dilip Mahadu Gavit, Murali Sreeshankar
Hardik Pandya Trade : हार्दिक पंड्या सोडणार मुंबई इंडियन्सची साथ, IPL 2027 पूर्वीच्या ‘डील’च्या चर्चांनी वेधले लक्ष

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news