Gulveer Singh Create History: गुलवीर सिंगने इतिहास रचला! राष्ट्रकुलच्या ट्रॅकवर भारताची पहिल्यांदाच 'रूपेरी' कामगिरी

Gulveer Singh Create History
Gulveer Singh Create Historypudhari
Published on
Updated on

Gulveer Singh Creat History: भारताच्या लाँग डिस्टन्स स्टार गुलवीर सिंगने राष्ट्रकुल स्पर्धेत इतिहास रचला. तो राष्ट्रकुल स्पर्धेत १०००० मीटर धावण्याच्या स्पर्धेत रौप्य पदक जिंकणारा पहिला भारतीय खेळाडू ठरला आहे. ग्लासग्लो इथं सुरू असलेल्या राष्ट्रकुल २०२६ स्पर्धेत त्याने ही ऐतिहासिक कामगिरी केली आहे.

Gulveer Singh Create History
Commonwealth Games: शर्मिला धनकरचा ऐतिहासिक पराक्रम; 'पॅरा-ॲथलेटिक्स'मध्ये भारताला मिळाले पहिले सुवर्णपदक

केनिया अन् युगांडाच्या खेळाडूंनाही टाकलं मागं

२७ वर्षाच्या भारताच्या सर्वात चांगल्या डिस्टन्स रनरने मोठ्या स्तरावर आपलं नाणं खणखणीत वाजवून दाखवलं. त्याने 27:49.78 अशी वेळ नोंदवत दुसरा क्रमांक पटकावला. ऑस्ट्रेलियाच्या काय रॉबिन्सनने सुवर्णपदक पटकावलं. तर डेव्हिड मुलरकीने कांस्य पदक पटकावलं. लाँग डिस्टन्समध्ये दमदार कामगिरी करणाऱ्या केनिया आणि युगांडाच्या खेळाडूंना पदकापासून वंचित रहावं लागलं.

Gulveer Singh Create History
Commonwealth Game 2026 | वेटलिफ्टिंगमध्ये ‘चांदी’! मुथुपंडी राजा, ज्ञानेश्वरी यादवला रौप्यपदक

खडतर परिस्थितीतून पदकाची कमाई

गुलवीरनं सुरूवातीपासूनच रेसमध्ये आघाडी घेतली होती. त्याने एशियन्स गेममध्ये देखील कांस्य पदकाची कमाई केली होती. ग्लासगोच्या स्टेडियमवर मोठा पाऊस पडत होता. त्यामुळं त्याला कठिण परिस्थितीत धावावं लागत होतं. मात्र असं असलं तरी गुलवीरने शेवटच्या राऊंडमध्ये आपला सगळा जोर लावला. त्याने दुसऱ्या स्थानावर रेस पूर्ण केली. त्यानंतर त्याने चांगलाच जल्लोष केला. भारताने या स्पर्धेत पहिल्यांदाच पदकाला गवसणी घातली.

Gulveer Singh Create History
Commonwealth Games 2026 : नीरज चोप्रा दुसऱ्या सुवर्णपदकासाठी सज्ज, ऑलिम्पिक विजेता अर्शद नदीम-पाथिरागेचे तगडे आव्हान

भारताची पदक संख्या किती?

भारताने सहाव्या दिवशी जिंकलेले हे दुसरे मेडल होतं. त्यापूर्वी हरजींदर कौरने महिला वेटलिफ्टिंग ६९ किलो वजनी गटात दुसरे स्थान पटकावत रौप्य पदकाची कमाई केली होती. भारताची आता एकूण पदकांची संख्या ही १२ झाली आहे. बॉक्सिंगमध्ये प्रिती पवार, प्रियांका घनघास आणि जदुमनी सिंग यांनी पदक निश्चित केले आहेत. त्यांनी सेमी फायनलमध्ये धडक मारली आहे.

Gulveer Singh Create History
2030 Commonwealth Games | भारताकडे 2030 राष्ट्रकुल स्पर्धेचे यजमानपद निश्चित

कोण आहे गुरवीर सिंग?

गुलवीर सिंगबाबत बोलायचं झालं तर तो उत्तर प्रदेशातील सिरसा मधील एका गावातून येतो. तो भारतीय लष्करात नायब सुभेदार या पोस्टवर आपली सेवा देत आहे. तो ग्रेनेडियर रेजिमेंटचा भाग असून तो २०१८ मध्ये सेनेत दाखल झाला आहे. तो भारताचा एक उद्योन्मुख लाँग डिस्टन्स रनर आहे.

गुलवीर सिंगने एशियन चॅम्पियनशिपमध्ये आणि एशियन्स गेममध्ये पदक जिंकले असून त्याने एशियन अॅथलेटिक्स चॅम्पियनशिपमध्ये ५००० आणि १०००० मीटरमध्ये सुवर्ण पदक जिंकून तो आशियातील सर्वोत्तम लाँग डिस्टन्स रनर असल्याचं सिद्ध करून दाखवलं आहे. त्याने भारतात अनेक रेकॉर्ड्स आपल्या नावावर केले आहेत.

तो चार मिनिटाच्या आत एक मैल रेस पूर्ण करणारा तसेत ६० मिनिटांच्या आत हाफ मॅरेथॉन संपवणारा पहिला भारतीय खेळाडू ठरला आहे. त्यामुळे तो देशाचा सर्वात महान डिस्टन्स रनर ठरला आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news