Australian Open : २२ वर्षीय अल्कराजचं 'करिअर ग्रँड स्लॅम' फत्ते..! जोकोविचचं स्वप्न धुळीस

Alcaraz vs Djokovic final : अल्कराजने नदालचा ऐतिहासिक रेकॉर्ड मोडल
Australian Open : २२ वर्षीय अल्कराजचं 'करिअर ग्रँड स्लॅम' फत्ते..! जोकोविचचं स्वप्न धुळीस
Published on
Updated on

मेलबर्न : स्पेनच्या कार्लोस अल्कराजने जागतिक टेनिसमधील दिग्गज खेळाडू नोवाक जोकोविचला पराभूत करून 'ऑस्ट्रेलियन ओपन २०२६' च्या किताबावर आपले नाव कोरले आहे. रॉड लेव्हर एरिना येथे रंगलेल्या या चित्तथरारक अंतिम सामन्यात अल्कराजने २-६, ६-२, ६-३, ७-५ अशा फरकाने विजय मिळवून आपले 'करिअर ग्रँड स्लॅम' पूर्ण केले. वयाच्या अवघ्या २२ व्या वर्षी चारही ग्रँड स्लॅम जेतेपदे जिंकणारा तो जगातील सर्वात तरुण खेळाडू ठरला आहे. या कामगिरीसह त्याने स्पेनचाच माजी टेनिस स्टार राफेल नादालचा विक्रम मोडीत काढला.

अनुभव आणि युवा जोशातील चुरस

२४ ग्रँड स्लॅम विजेतेपदे नावावर असलेल्या जोकोविचविरुद्ध अल्कराजने रविवारी (दि. १) आपल्या खेळाचा दर्जा उंचावला. सामन्याच्या सुरुवातीला जोकोविचने आपला दांडगा अनुभव पणाला लावत पहिला सेट ६-२ असा सहज जिंकून वर्चस्व गाजवले. मात्र, दुसऱ्या सेटपासून अल्कराजने जोरदार मुसंडी मारली. त्याने जोकोविचची सर्व्हिस मोडीत काढत दुसरा सेट ६-२ आणि तिसरा सेट ६-३ ने जिंकून सामन्यात २-१ अशी आघाडी घेतली.

निर्णायक चौथ्या सेटमध्ये दोन्ही खेळाडूंनी प्रत्येक गुणासाठी प्रचंड घाम गाळला. १० वेळा ऑस्ट्रेलियन ओपन जिंकणाऱ्या जोकोविचने हार न मानता झुंज दिली, परंतु अल्कराजच्या चपळाईसमोर त्याचे प्रयत्न तोकडे पडले. अल्कराजने हा सेट ७-५ ने जिंकत ऐतिहासिक विजयावर शिक्कामोर्तब केले.

विक्रमादित्य अल्कराज: नदालला टाकले मागे

चारही मोठी जेतेपदे (विम्बल्डन, यूएस ओपन, फ्रेंच ओपन आणि ऑस्ट्रेलियन ओपन) जिंकणाऱ्या अल्कराजने नडालचा २४ व्या वर्षी हा कारनामा करण्याचा विक्रम मोडला आहे. विशेष म्हणजे, जोकोविचने आजवर कधीही ऑस्ट्रेलियन ओपनची अंतिम फेरी गमावली नव्हती, मात्र अल्कराजने आपल्या पहिल्याच मेलबर्न फायनलमध्ये हा करिष्मा करून दाखवला.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news