‘वनडे’मध्ये दोन द्विशतक करणारा हिटमॅन रोहित म्हणतो ‘या’ दोन गोलंदाजांची भिती वाटते!

Published on
Updated on

नवी दिल्ली: पुढारी ऑनलाईन

भारताचा वेगवान गोलंदाज मोहम्मद शमी आणि वन डे संघाचा उपकर्णधार रोहित शर्मा हे दोघे सोशल मीडियाद्वारे एकमेकांसोबत संवाद साधत होते. दरम्यान, रोहितने कारकिर्दीच्या सुरूवातीच्या काळात क्रिकेट जगातत कोणाची भिती वाटायची याचा खुलासा केला. 

शमी आणि रोहितचे इन्स्टाग्रामवर लाईव्ह चाटिंग सुरू होते. दरम्यान, शमीने रोहितला कोणता गोलंदाज आवडतो असे असा प्रश्न केला. त्यावेळी रोहित म्हणाला मला अनेक गोलंदाज आवडतात. रोहित शर्माने प्रथम दक्षिण आफ्रिकेचा वेगवान गोलंदाज कागिसो रबाडा, तर दुसर्‍या क्रमांकावर ऑस्ट्रेलियन वेगवान गोलंदाज जोश हेजलवुड असे नाव सांगितले. हे सांगत असतानाच रोहितने ऑस्ट्रेलिया संघाचा वेगवान गोलंदाज  ब्रेट ली आणि दक्षिण अफ्रिकेचा वेगवान गोलंदाज  डेल स्टेनबद्दल मत व्यक्त केली. 

ज्यावेळी मी संघात आलो तेव्हा तेव्हा ब्रेट ली हा त्यावेळी जगातील सर्वात वेगवान गोलंदाज होता. माझ्या पहिल्या एकदिवसीय मालिकेत मी दक्षिण आफ्रिकेचा सामना करण्यासाठी आयर्लंडला गेलो होतो आणि त्यावेळी डेल स्टेन या वेगवान गोलंदाजाचादेखील सामना करावा लागला होता. ज्यावेळी मी खेळायाला सुरूवात केली होती. त्यावेळी मला ब्रेट ली आणि डेल स्टेन आवडायचे. पंरतु, त्या दोघांचा सामना करणे माझ्यासाठी अवघड होते. त्यांना सामोरे जाण्यासा खूप अडचणी आल्या असल्याचे रोहितने यावेळी म्हटले . 

रोहित शर्माने २००७ मध्ये आंतरराष्ट्रीय एक दिवसीय सामन्यात पदार्पण केले होते. आयर्लंड आणि दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या तिरंगी मालिका खेळवण्यात आली होती. तेव्हपासून रोहित २०१३ पर्यंत मध्यला फळीत खेळला. त्यानंतर संघासाठी संघाचा नियमित सलामीवीर ठरला. आता ३३ वर्षीय हिटमॅन रोहित शर्मा एकदिवसीय आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये तीन द्विशतक ठोकणारा जगातील एकमेव फलंदाज आहे. एकदिवसीय सामन्यात सर्वाधिक २६४ धावांची वैयक्तिक नोंद करण्याचा विक्रम त्याच्या नावावर आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news