BCCI Reward Announcement |टी २० विश्वविजेत्या टीम इंडियाची छप्परफाड कमाई! BCCIने मोडला स्वतःचाच विक्रम!

2024च्‍या विश्‍वचषक विजेता संघापेक्षाही अधिक बंपर बक्षीसाची केली घोषणा
BCCI Reward Announcement |टी २० विश्वविजेत्या टीम इंडियाची छप्परफाड कमाई! BCCIने मोडला स्वतःचाच विक्रम!
Published on
Updated on

BCCI Reward Announcement

अहमदाबाद: भारतीय क्रिकेट नियामक मंडळाने (BCCI) आपलाच जुना विक्रम मोडीत काढत, टी-२० विश्वचषक २०२६ चे जेतेपद पटकावणाऱ्या भारतीय संघासाठी १३१ कोटी रुपयांच्या भरघोस बक्षीसाची घोषणा केली आहे. २०२४ मध्ये रोहित शर्माच्या नेतृत्वाखाली बार्बाडोस येथे विश्वचषक जिंकला तेव्हा मंडळाने १२५ कोटी रुपये दिले होते.

१३१ कोटी रुपयांचे रोख बक्षीस जाहीर

सूर्यकुमार यादवच्या नेतृत्वाखाली अहमदाबादमध्ये इतिहास रचत भारताने सलग दुसऱ्यांदा विजेतेपद राखले आणि बीसीसीआयनेही आपल्या बक्षीसाचा आकडा वाढवून नवा विक्रम प्रस्थापित केला. बीसीसीआयने प्रसिद्धीपत्रकात म्हटले आहे की, "आयसीसी पुरुष टी-२० विश्वचषक २०२६ मधील भारतीय संघाच्या देदीप्यमान विजयाबद्दल मंडळाने १३१ कोटी रुपयांचे रोख बक्षीस जाहीर केले आहे."

भारतीय क्रिकेट संघाने आपले वर्चस्व सिद्ध केले

अहमदाबादच्या नरेंद्र मोदी स्टेडियमवर झालेल्या अंतिम सामन्यात न्यूझीलंडचा पराभव करून भारताने प्रतिष्ठेचा करंडक उंचावला. या विजयासह भारत टी-२० विश्वचषकाचे जेतेपद राखणारा जगातील पहिला संघ ठरला आहे, तसेच तीन वेळा हा विश्वचषक जिंकणारा एकमेव संघ म्हणूनही भारताने आपले वर्चस्व सिद्ध केले आहे, असेही बीसीसीआयने प्रसिद्धीपत्रकात म्हटले आहे. मंडळाने खेळाडू, साहाय्यक कर्मचारी आणि निवड समितीचे या ऐतिहासिक कामगिरीबद्दल अभिनंदन केले असून भविष्यातील यशासाठी शुभेच्छा दिल्या आहेत.

BCCI Reward Announcement |टी २० विश्वविजेत्या टीम इंडियाची छप्परफाड कमाई! BCCIने मोडला स्वतःचाच विक्रम!
Shoaib Akhtar India Win|भारत विश्‍वविजयी होताच पाकिस्‍तानच्‍या शोएब अख्‍तरचा थयथयाट; म्‍हणे, "भारताने क्रिकेटचा..."

आयसीसीकडूनही भारतीय संघावर कोट्यवधींची उधळण

सूर्याकुमार यादवच्या नेतृत्वाखालील भारतीय संघाला केवळ बीसीसीआयकडूनच नव्हे, तर आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेकडूनही (आयसीसी ) मोठे बक्षीस मिळाले आहे. विश्वविजेत्या भारताला आयसीसीकडून ३ दशलक्ष डॉलर्स (सुमारे २७.४८ कोटी रुपये) मिळाले आहेत.

BCCI Reward Announcement |टी २० विश्वविजेत्या टीम इंडियाची छप्परफाड कमाई! BCCIने मोडला स्वतःचाच विक्रम!
BCCI Annual Contract : बीसीसीआयकडून वार्षिक करार जाहीर, रोहित-विराटला फटका; दोन्ही दिग्गजांचा ‌‘बी‌’ कॅटेगरीत समावेश

आयसीसीने ठेवला होता १३.५ दशलक्ष डॉलर्सचा विक्रमी बक्षीस निधी

यावेळच्या विश्वचषकासाठी आयसीसीने एकूण १३.५ दशलक्ष डॉलर्सचा विक्रमी बक्षीस निधी ठेवला होता, जो मागील आवृत्तीच्या तुलनेत २० टक्क्यांनी अधिक आहे. दरम्‍यान, अंतिम फेरीतील विजयाच्या रकमेव्यतिरिक्त, भारतीय संघाला ग्रुप स्टेज आणि 'सुपर ८' फेरीतील प्रत्येक विजयासाठी प्रत्येकी ३१,१५४ डॉलर्स (सुमारे २८.६ लाख रुपये) बोनस म्हणून मिळाले आहेत.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news