Mustafizur Rahman | IPL मधून हकालपट्टी झालेला बांगलादेशचा मुस्तफिजुर पाकिस्तानच्या PSL मध्ये खेळणार, कितीची लागली बोली?

Mustafizur Rahman : कोलकाता नाईट रायडर्सने मुस्तफिजुरला ८ कोटी रुपयांहून अधिक किंमत देऊन खरेदी केले होते
Mustafizur Rahman
बांगलादेशचा स्टार वेगवान गोलंदाज मुस्तफिजुर रहमान.File Photo
Published on
Updated on

Mustafizur Rahman PSL

लाहोर : भारतीय क्रिकेट नियामक मंडळाने (BCCI) आयपीएलमधून बाहेरचा रस्ता दाखवल्यानंतर, बांगलादेशचा स्टार वेगवान गोलंदाज मुस्तफिजुर रहमान आता पाकिस्तान सुपर लीगमध्ये (PSL) खेळताना दिसणार आहे. मुस्तफिजुरला लाहोर कलंदर्स या संघाने २.३ लाख डॉलर्स (सुमारे २ कोटी रुपये) खर्चून आपल्या ताफ्यात सामील केले आहे. ११ फेब्रुवारी रोजी होणाऱ्या मुख्य लिलावापूर्वी खेळाडू निवडण्याच्या विशेष अधिकारांतर्गत लाहोरने ही निवड केली आहे.

कोलकाता नाईट रायडर्सने मोजले होते आठ कोटी

मुस्तफिजुर रहमानला आयपीएलमध्ये कोलकाता नाईट रायडर्सने (KKR) ८ कोटी रुपयांहून अधिक ($1 million) किंमत देऊन खरेदी केले होते. मात्र, ३ जानेवारी रोजी बीसीसीआयने कोणतेही अधिकृत कारण न देता कोलकाता संघाला त्याला मुक्त करण्याचे आदेश दिले.

Mustafizur Rahman
Mustafizur Rahman IPL: मुस्तफिजुरला आयपीएलमधून वगळल्यानंतर बांगलादेशची भारतावर आगपाखड; आयसीसीकडे धाव!

टी-२० विश्वचषकावर सावट

बीसीसीआयच्या या निर्णयामुळे बांगलादेश क्रिकेट बोर्ड आदळआपट केली. 'सुरक्षेचे कारण' पुढे करत विश्वचषकातील आपले सामने भारतातून श्रीलंकेत हलवण्याची मागणी केली होती. मात्र, आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेने (ICC) ही मागणी फेटाळून लावत बांगलादेशला स्पर्धेतूनच बाहेर केले. या वादात पाकिस्तानने बांगलादेशची पाठराखण केली असून आयसीसीवर दुटप्पी भूमिकेचा आरोप केला आहे. परिणामी, पाकिस्तान सरकारनेही आपल्या संघाला भारताविरुद्ध सामना न खेळण्याचे आदेश दिले आहेत. शनिवारपासून सुरू होणाऱ्या विश्वचषकावर या वादाचे सावट असून, भारत-पाक सामन्यातून मिळणाऱ्या मोठ्या महसुलावर आता प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.

Mustafizur Rahman
Bangladesh Ban IPL Broadcast: मुस्तफिजूर प्रकरणाच्या मिरच्या बांगलादेशला चांगल्याच झोंबल्या.... IPL प्रसारणाबाबत घेतला थेट निर्णय

मुस्तफिजुर तिसऱ्यांदा लाहोर संघात

२०१६ मध्ये पीएसएल सुरू झाल्यापासून मुस्तफिजुर तिसऱ्यांदा लाहोर संघाशी जोडला गेला आहे. या निवडीवर भाष्य करताना लाहोर कलंदर्सचे मालक समीन राणा म्हणाले, "मुस्तफिजुर हा आमच्यासाठी केवळ खेळाडू नसून आमच्या कुटुंबाचा एक अविभाज्य भाग आहे. त्याचे कौशल्य आणि अनुभव आम्हाला जेतेपद टिकवून ठेवण्यासाठी मोलाचा ठरेल."

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news