Cricket: "प्रायव्हेट पार्टला स्पर्श करून अश्लील..." महिला क्रिकेट संघाच्या माजी कर्णधाराचे लैंगिक शोषण; बोर्डाची मोठी कारवाई

Bangladesh Cricket Board Jahanara Alam sexual harassment: बांगलादेश क्रिकेटमध्ये खळबळ उडवून देणाऱ्या एका लैंगिक छळाच्या प्रकरणात बांगलादेश क्रिकेट बोर्डाने अखेर कठोर पाऊल उचलले आहे.
Bangladesh Cricket Board Jahanara Alam sexual harassment
Bangladesh Cricket Board Jahanara Alam sexual harassmentfile photo
Published on
Updated on

Bangladesh Cricket Board

ढाका: बांगलादेश क्रिकेटमध्ये खळबळ उडवून देणाऱ्या एका लैंगिक छळाच्या प्रकरणात बांगलादेश क्रिकेट बोर्डाने अखेर कठोर पाऊल उचलले आहे. महिला क्रिकेट संघाची माजी कर्णधार जहाँआरा आलम हिने केलेल्या गंभीर आरोपांची दखल घेत, बोर्डाने महिला संघाचे माजी मुख्य निवडकर्ते आणि माजी क्रिकेटपटू मोंजुरुल इस्लाम याच्यावर सर्व प्रकारच्या क्रिकेट क्रियाकलापांपासून आजीवन बंदी घातली आहे.

Bangladesh Cricket Board Jahanara Alam sexual harassment
IPL 2026 MS Dhoni: एमएस धोनी सर्व सामने खेळणार का? चेन्नई सुपर किंग्सकडून मोठी अपडेट!

नेमके प्रकरण काय?

जहाँआरा आलमने गेल्या वर्षी एका मुलाखतीत मोंजुरुल इस्लाम याच्यावर गंभीर आरोप केले होते. मोंजुरुल हा संघाचा मुख्य निवडकर्ता असताना त्याने अनेकदा आपल्याला चुकीच्या पद्धतीने स्पर्श केला, अस्वस्थ करणारे हावभाव केले आणि वैयक्तिक आयुष्याबद्दल (मासिक पाळीच्या चक्राबद्दल) आक्षेपार्ह प्रश्न विचारले, असा आरोप जहाँआराने केला होता. या प्रकारामुळे त्रस्त होऊन तिने डिसेंबर २०२४ पासून क्रिकेटमधून ब्रेक घेतला होता.

बोर्डाच्या भूमिकेवर प्रश्नचिन्ह

जहाँआराच्या दाव्यानुसार, तिने सुरुवातीला बीसीबीचे वरिष्ठ अधिकारी नाडेल चौधरी आणि मुख्य कार्यकारी अधिकारी निजामुद्दीन चौधरी यांच्याकडे रीतसर तक्रार केली होती. मात्र, त्यावेळी तिच्या तक्रारीकडे पूर्णपणे दुर्लक्ष करण्यात आले. तक्रार करूनही इस्लाम यांने जून २०२५ पर्यंत आपला कार्यकाळ आरामात पूर्ण केला, ज्यामुळे बोर्डाच्या कार्यपद्धतीवर टीका होत होती.

तपास समितीचा अहवाल आणि कारवाई

वाढत्या दबावानंतर बीसीबीने या प्रकरणाच्या चौकशीसाठी एक स्वतंत्र समिती स्थापन केली होती. या समितीने नुकताच आपला अहवाल बोर्डाला सादर केला. रविवारी ढाका येथे झालेल्या बीसीबीच्या बैठकीत या अहवालावर चर्चा झाली आणि त्यानंतर मोंजुरुल इस्लाम यांच्यावर बंदी घालण्याचा निर्णय घेण्यात आला.

बीसीबीने आपल्या अधिकृत निवेदनात म्हटले आहे की, "स्वतंत्र चौकशी समितीच्या निष्कर्षांच्या आधारे, माजी राष्ट्रीय क्रिकेटपटू मोंजुरुल इस्लाम यांना बीसीबीच्या अंतर्गत कोणत्याही प्रत्यक्ष किंवा अप्रत्यक्ष क्रिकेट उपक्रमात सहभागी होण्यापासून प्रतिबंधित करण्यात आले आहे. त्यांना भविष्यातील सर्व भूमिकांसाठी बंदी घालण्यात येत आहे."

आणखी कारवाईचे संकेत

बीसीबीने हेदेखील स्पष्ट केले आहे की ही केवळ सुरुवात आहे. बोर्ड सध्या समितीच्या इतर शिफारशींचे पुनरावलोकन करत असून, गरज पडल्यास इस्लाम यांच्यावर कायदेशीर किंवा इतर कठोर कारवाई केली जाऊ शकते.

Bangladesh Cricket Board Jahanara Alam sexual harassment
Surya Kumar Yadav Video: सूर्याचा सपोर्ट स्टाफसोबत झाला वाद.... डग आऊटमधला व्हिडिओ व्हायरल

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news