Badminton Japan Masters : लक्ष्य सेनने अवघ्या ३९ मिनिटांत सामना संपवला! जपान मास्टर्सच्या उपांत्यपूर्व फेरीत शानदार धडक

Badminton Tournament Updates : सिंगापूरच्या जिया हेंग जेसन तेहचा सहज पराभव
Lakshya Sen Japan Masters 2025 badminton news
Published on
Updated on

भारताचा स्टार बॅडमिंटनपटू लक्ष्य सेन याने कुममातो मास्टर्स जपान बॅडमिंटन स्पर्धेच्या उपांत्यपूर्व फेरीत धडक मारली आहे. त्याने गुरुवारी (दि. १३) झालेल्या सामन्यात सिंगापूरच्या जिया हेंग जेसन तेहचा सरळ गेममध्ये पराभव करून आपले स्थान निश्चित केले. मात्र, दुसरीकडे भारताचा अनुभवी खेळाडू एच.एस. प्रणॉय याचा प्रवास दुसऱ्या फेरीतच संपुष्टात आला. प्रणॉयला ४६ मिनिटे चाललेल्या या दुसऱ्या फेरीच्या सामन्यात डेन्मार्कच्या रासमस गेम्केकडून १८-२१, १५-२१ अशा फरकाने पराभवाला सामोरे जावे लागले.

लक्ष्यचा ३९ मिनिटांत विजय

सन २०२१ च्या जागतिक अजिंक्यपद स्पर्धेचा कांस्यपदक विजेता असलेल्या लक्ष्य सेनने जगातील २०व्या क्रमांकाच्या तेहवर ३९ मिनिटांत २१-१३, २१-११ असा सहज विजय मिळवला. संपूर्ण सामन्यात लक्ष्यचेच वर्चस्व पाहायला मिळाले. त्याने सिंगापूरच्या खेळाडूला पुनरागमन करण्याची कोणतीही संधी दिली नाही. आता उपांत्यपूर्व फेरीत लक्ष्य सेनची लढत जागतिक क्रमवारीत १५व्या स्थानी असलेल्या सिंगापूरच्या माजी विश्वविजेत्या लोह कीन यू याच्याशी होणार आहे.

Lakshya Sen Japan Masters 2025 badminton news
Shubman Gill Statements on Mohammed Shami : ‘शमीचा अस्त’! शुभमन गिलच्या ‘त्या’ विधानामुळे क्रिकेट वर्तुळात खळबळ

लक्ष्यने प्रतिस्पर्ध्याला दिली नाही संधी

प्री-क्वार्टर फायनलमध्ये लक्ष्यने पहिल्या गेममध्ये ८-५ अशी आघाडी घेतली होती. त्यानंतर तेहने थोड्या वेळासाठी १०-९ अशी नाममात्र आघाडी घेतली असली तरी, ब्रेकपर्यंत भारतीय खेळाडूने पुन्हा आघाडी मिळवली. १४-१३ अशा स्कोअरपर्यंत दोन्ही खेळाडूंमध्ये चुरशीची लढत झाली, पण यानंतर लक्ष्यने सलग सात गुण मिळवून पहिला गेम आपल्या नावावर केला.

दुसऱ्या गेममध्येही लक्ष्यने सुरुवातीपासूनच उत्कृष्ट खेळ दाखवला आणि लवकरच ५-० अशी आघाडी घेतली. इंटरव्हलपर्यंत त्याने ११-३ अशी मोठी आघाडी घेऊन आपल्या प्रतिस्पर्धकाच्या आशा धुळीस मिळवल्या. यानंतरही भारतीय खेळाडूने आपली लय कायम ठेवली आणि सहजपणे सामना जिंकला.

Lakshya Sen Japan Masters 2025 badminton news
Ronaldo Retirement : रोनाल्डोची निवृत्तीची घोषणा, 2026 वर्ल्डकपनंतर गोलमशीन थंडावणार

लक्ष्यचा आतापर्यंतचा प्रवास

यापूर्वी, लक्ष्य सेनने जपानच्या कोकी वतानबेचा सरळ गेममध्ये पराभव करून दुसऱ्या फेरीत प्रवेश केला होता. जपानच्या जागतिक क्रमवारीत २६व्या स्थानी असलेल्या वतानबेला याचाही लक्ष्यने केवळ ३९ मिनिटांत २१-१२, २१-१६ अशा फरकाने पराभव केला होता.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news