Axar Patel Wide Ball Controversy: अक्षरने पंचांना 'वाईड बॉल'चा निर्णय मागे घ्यायला लावला; शेवटच्या षटकात कोणतं नाट्य घडलं?

रिव्हर्स स्वीप अन् स्वीच हीट खेळतानाचा काय आहे ७५ सेंटीमीटरचा वाईड बॉलचा नियम?
Axar Patel Wide Ball Controversy
Axar Patel Wide Ball Controversypudhari
Published on
Updated on

Axar Patel Wide Ball Controversy: भारताने जपानवर अवघ्या २ धावांनी विजय मिळवत एशियन गेम्सच्या क्वार्टर फायनलपूर्वीचा आपला सराव किती पक्का आहे हे दाखवून दिलं. नवख्या जपानने भारताला शेवटच्या षटकापर्यंत पर्यंत झुंजवलं. त्यात शेवटच्या षटकात एक वाद झाला. अक्षर पटेलने टाकलेला चेंडू पंचांनी वाईड दिला. मात्र अक्षर पटेलने पंचांशी वाद घालून तो निर्णय बदलायला लावला. यावरून आता अक्षर पटेलने असा पंचांचा निर्णय बदलवणे नियमात बसते का? रिव्हर्स स्वीप खेळतानाच्या वाईड बॉलचे नियम काय आहेत?

शेवटच्या षटकात काय झालं?

शेवटच्या षटकात जपानला ८ धावांची गरज असताना अलेक्झांडरने सिव्हर्स स्वीप मारण्याचा प्रयत्न केला. मात्र अक्षरचा चेंडू लेग साईडवरून विकेटकीपरकडे गेला. पंच ख्रिस यांनी पहिल्यांदा चेंडू वाईड असल्याचा सिग्नल दिला. त्यानंतर अक्षरने आश्चर्य व्यक्त करत पंचांशी हुज्जत घातली. संजूने देखील नाराजी व्यक्त केली.

वाईड बॉलने चित्रच पालटलं असतं

भारताचा कर्णधार श्रेयस अय्यरने देखील या दोघाना साथ देत या निर्णयाबाबत विचारणा केली. त्यानंतर ख्रिस यांनी स्क्वेअर लेग पंच ब्राऊन यांच्याशी चर्चा करून वाईड देण्याचा निर्णय मागे घेत अक्षर पटेलने टाकलेला चेंडू वैध ठरवला. याचा सामन्यावर देखील परिणाम झाला. जपानला ५ षटकात ३० च करता आल्या. भारताने जपानसमोर ३२ धावांचे आव्हान ठेवले होते. त्यामुळं पंचांनी वाईड बॉलचा निर्णय मागे घेतला नसता तर सामन्याचं चित्र काही वेगळंच असतं. जपानची एक धाव वाढली असती. एक अतिरिक्त चेंडू खेळायला मिळाला असता.

नियम काय सांगतो?

ज्यावेळी फलंदाज रिव्हर्स स्वीप, स्विच हीट खेळत असतो किंवा खेळण्याचा प्रयत्न करत असतो. त्यावेळी वाईड बॉलचे नियम पीचच्या दोन्ही बाजूला लागू होतात. ज्यावेळी रिव्हर्स स्वीप खेळण्याचा प्रयत्न केला जातो त्यावेळी वाईड बॉलचे नियम बदलतात.

यायाचा नेमका अर्थ काय?

ज्यावेळी रिव्हर्स स्वीप खेळण्याचा प्रयत्न केला जातो त्यावेळी लेग साईडला चेंडू फलंदाजाच्या आवाक्यात आहे असं गृहीत धरलं जातं. याचा अर्थ नेहमीचा लेग स्टम्प वाईडचा नियम लागू होत नाही.

काय आहे ७५ सेंटीमीटरचा रूल

वनडे आणि टी २० या मर्यादित षटकांच्या क्रिकेटमध्ये ज्यावेळी फलंदाज रिव्हर्स स्वीप किंवा स्विच हीट खेळण्याचा प्रयत्न करतो त्यावेळी ऑफ आणि लेग अशा दोन्ही बाजूंना ७५ सेंटीमीटर वाईड गाईडन लागू होते.

जाणकारांचे काय मत?

अक्षर पटेलने पंचांना आपला निर्णय मागे घ्यावा यासाठी अपील करणे योग्य असल्याचे जाणकार म्हणतात. पंचांनी आपला निर्णय मागे घेतला तो देखील योग्य निर्णय असल्याचे जाणकार म्हणतात. आयसीसीचे माजी आंतरराष्ट्रीय पंच अनिल चौधरी यांनी घेतलेला निर्णय योग्य असल्याचं सांगितलं.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news