Avani Lekhara : अपघाताने आयुष्य बदलले; पण प्रयत्नाने नशीब घडवले

अवनी गोल्ड जिंकली तो क्षण
Avani Lekhara
पॅरिस ऑलिम्पिक 2024 मध्ये भारताच्या खात्यात सुवर्ण पदकाचा दुष्काळ पाहायला मिळाला. File Photo
Published on
Updated on

नवी दिल्ली : पॅरिस ऑलिम्पिक 2024 मध्ये भारताच्या खात्यात सुवर्ण पदकाचा दुष्काळ पाहायला मिळाला. मात्र, पॅरिस पॅरालिम्पिकमध्ये भारताच्या अवनी लेखराने नेमबाजीत सुवर्णपदक जिंकून इतिहास रचला. अवनीने महिलांच्या 10 मीटर एअर रायफल स्पर्धेत सुवर्ण पदकाला गवसणी घातली. पॅरिस पॅरालिम्पिकमधले भारताचे हे पहिले पदक ठरले आणि तेही सुवर्णपदकच.

सलग दुसर्‍यांदा पदक जिंकताच अवनी प्रसिद्धीच्या झोतात आली. मात्र, तिचा इथपर्यंतचा प्रवास खूप संघर्षमय आहे. 2012 मध्ये वयाच्या अवघ्या 12 व्या वर्षी अवनीच्या वाटेत मोठा अडथळा आला. एका अपघातामुळे तिला अर्धांगवायू झाला आणि तिला चालण्यासाठी व्हीलचेअरची मदत घ्यावी लागली; पण अवनीने हार न मानता पुढे जाण्याचा निर्णय घेतला. अपघातानंतर अवघ्या तीन वर्षांनी अवनीने शूटिंगला आपले आयुष्य बनवले. अवघ्या काही वर्षांत तिने ‘गोल्डन’ कामगिरी करून दाखवली.

अवनीचे वडील प्रवीण सांगतात की, अपघातानंतर ती खूप शांत होऊ लागली. ती कोणाशीही बोलली नाही आणि पूर्ण तणावात गेली. या भीषण अपघातामुळे तिला खूपच त्रास सहन करावा लागला. ती इतकी अशक्त झाली होती की, ती काहीच करू शकत नव्हती. हलकी वस्तू उचलणेही तिच्यासाठी कठीण होत होते. तसेच अवनीला वयाच्या 12 व्या वर्षी अर्धांगवायू झाला, त्यामुळे ती खचली होती. त्यावेळी आम्ही तिच्या भविष्याचा विचार करत असे. मग खूप विचार केल्यानंतर तिला नेमबाजीत हात आजमावायला सांगितले, असे अवनीच्या पालकांनी सांगितले.

अपघातानंतर अवनीला अस्वस्थ वाटू लागले तेव्हा आम्ही तिला मनोरंजनासाठी शूटिंग पाहायला घेऊन जायचो. इथूनच अवनीला या खेळाबद्दल आवड निर्माण झाली. तिने यासाठी खूप मेहनत घेतली आणि आता फळ मिळत आहे, असेही अवनीच्या वडिलांनी सांगितले. अवनीचे वडील पुढे म्हणाले की, शूटिंगमध्ये पहिल्यांदा ती बंदूकही उचलू शकली नाही; पण आज यामुळे पॅरिस पॅरालिम्पिकच्या व्यासपीठावर राष्ट्रगीत ऐकू आले. खेळासोबतच अवनी अभ्यासातही हुशार आहे. याशिवाय इतर उपक्रमांमध्येही अवनी अव्वल राहते.

Avani Lekhara
Jasprit Bumrah : प्रतिस्पर्ध्यापेक्षा माझे स्वतःवरच जास्त लक्ष : जसप्रीत बुमराह

अवनी गोल्ड जिंकली तो क्षण

  • सुवर्ण पदकासाठी काही वेळ भारताच्या दोन खेळाडूंमध्ये चुरस झाली.

  • मोना अग्रवाल काही वेळ अव्वल स्थानी राहिली.

  • यानंतर कोरियन नेमबाजने पहिला क्रमांक पटकावला.

  • अवनी तिसर्‍या क्रमांकावर घसरली होती. मात्र, अवनीने जबरदस्त पुनरागमन केले.

  • मोनाचा प्रवास 22 शॉटस्नंतर तिसर्‍या क्रमांकावर संपला.

  • शेवटच्या शॉटमध्ये अवनीने 10.5 असा स्कोअर केला.

  • दक्षिण कोरियाच्या युनरीने 6.8 असा स्कोअर केला. अशाप्रकारे अवनीने सुवर्णपदक जिंकले.

Avani Lekhara
Weather Update : गुजरातच्या किनारपट्टीवर 'असना'ची निर्मिती!

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news