T20 World Cup : ऑस्ट्रेलियाला मोठा झटका; 2 वेगवान गोलंदाज वर्ल्डकपमधून बाहेर

Australia Major Blow : ११ फेब्रुवारी रोजी आयर्लंडविरुद्धच्या पहिला सामना
Australia T20 World Cup 2026 news
Published on
Updated on

सिडनी : टी-२० विश्वचषक २०२६ च्या रणसंग्रामापूर्वी ऑस्ट्रेलियन संघाच्या अडचणीत वाढ झाली आहे. कर्णधार पॅट कमिन्स दुखापतीमुळे आधीच स्पर्धेबाहेर गेलेला असताना, आता अनुभवी वेगवान गोलंदाज जोश हेझलवूड याच्या रूपाने कांगारूंना आणखी एक मोठा धक्का बसला आहे.

हेझलवूडची दुखापत ठरली अडथळा

मिळालेल्या माहितीनुसार, जोश हेझलवूड टाचेच्या दुखापतीमुळे त्रस्त असून तो सध्या सिडनीमध्येच राहून उपचार घेणार आहे. त्यामुळे विश्वचषकाच्या सुरुवातीच्या सामन्यांना तो मुकण्याची शक्यता आहे. हेझलवूडच्या जागी खबरदारीचा उपाय म्हणून सीन एबॉट याचा 'ट्रॅव्हलिंग रिझर्व्ह' (राखीव खेळाडू) म्हणून संघात समावेश करण्यात आला आहे.

Australia T20 World Cup 2026 news
T20 World Cup : पाकिस्तान घाबरला..! मैदानात उतरण्यापूर्वीच भारताविरुद्ध टेकले गुडघे, १५ फेब्रुवारीच्या महामुकाबल्यातून माघार

यासंदर्भात ऑस्ट्रेलियन निवड समितीचे सदस्य टोनी डोडमेडे म्हणाले, ‘‘जोशने ऑस्ट्रेलियात ओळखीच्या वातावरणात पुनर्वसन (रिहॅब) प्रक्रिया पूर्ण करणे अधिक फायद्याचे ठरेल, असे आम्हाला वाटते. तो श्रीलंकेतील सामन्यावेळी संघात कधी सामील होईल, हे सध्या निश्चित सांगता येणार नाही.’’

५ फेब्रुवारीला सराव सामना

दुसरीकडे, पाकिस्तान दौऱ्यातून विश्रांती घेतलेले ग्लेन मॅक्सवेल, नॅथन एलिस आणि टिम डेव्हिड ३ फेब्रुवारीला कोलंबोमध्ये संघाशी जोडले जातील. विश्वचषकात ११ फेब्रुवारी रोजी आयर्लंडविरुद्धच्या पहिल्या सामन्यापूर्वी, ५ फेब्रुवारीला ऑस्ट्रेलिया नेदरलँड्सविरुद्ध सराव सामना खेळणार आहे.

Australia T20 World Cup 2026 news
Sunil Gavaskar : गावस्कर पुन्हा संतापले..! म्हणाले, ‘वर्ल्डकपमध्ये प्रयोग नकोत’; इशान विरुद्ध सॅमसन वादात उडी

संघात मोठे बदल

पॅट कमिन्सच्या पाठीच्या दुखापतीमुळे बेन ड्वार्शुइस याला १५ सदस्यीय मुख्य संघात स्थान मिळाले आहे. तसेच, मॅथ्यू शॉर्टला संघातून वगळण्यात आले असून त्याच्या जागी मॅट रेनशॉ याचा समावेश करण्यात आला आहे. वारंवार होणाऱ्या या दुखापतींमुळे ऑस्ट्रेलियन संघ व्यवस्थापनाची चिंता वाढली आहे.

टी-२० विश्वचषक २०२६ साठी सुधारित ऑस्ट्रेलियन संघ :

मिचेल मार्श (कर्णधार), झेवियर बार्टलेट, कूपर कॉनली, टिम डेव्हिड, बेन ड्वार्शुइस, कॅमरून ग्रीन, नॅथन एलिस, जोश हेझलवूड, ट्रॅव्हिस हेड, जोश इंग्लिस, मॅट कुह्नमन, ग्लेन मॅक्सवेल, मॅट रेनशॉ, मार्कस स्टॉइनिस, ॲडम झम्पा.

राखीव खेळाडू : सीन एबॉट.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news