Lovlina Borgohain : "ही गोष्ट आम्हाला खूप वेदना देणारी!"; ग्लासगोतील रेस्टॉरंट मॅनेजमेंटला बॉक्सर लव्हलिनाने का सुनावले?

तक्रारीनंतर रेस्टॉरंटकडून भारतीय नकाशातील चूक सुधारण्याचे आश्वासन
Lovlina Borgohain
Lovlina BorgohainFile Photo
Published on
Updated on

Lovlina Borgohain on India map controversy : ग्लासगो येथील एका प्रसिद्ध भारतीय हॉटेलात वापरल्या गेलेल्या भारताच्या नकाशात ईशान्य भारतातील राज्येच दाखवण्यात आलेली नसल्याचे समोर आल्यानंतर, भारताची स्टार बॉक्सर लव्हलिना बोरगोहेन हिने तीव्र नाराजी व्यक्त केली आहे.

ग्‍लासगोमधील लोकप्रिय भारतीय हॉटेलमधील नकाशा चुकीचा

राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेत भारतीय बॉक्सिंग संघाने १० पदके (७ सुवर्ण आणि ३ रौप्य) जिंकत ऐतिहासिक कामगिरी केली. या घवघवीत यशाचा आनंद साजरा करण्यासाठी संपूर्ण भारतीय बॉक्सिंग संघ ग्लासगोमधील एका लोकप्रिय भारतीय हॉटेलात गेला होता. या वेळी रौप्य पदक विजेत्या २८ वर्षीय लव्हलिनाच्या ही बाब लक्षात आली. हॉटेलातील नॅपकिनवर आणि बाहेर लावण्यात आलेल्या भारताच्या नकाशातून ईशान्य भारत पूर्णपणे गायब होता. लव्हलिनाने ही बाब तात्काळ हॉटेल व्यवस्थापनाच्या निदर्शनास आणून दिली.

Lovlina Borgohain
Commonwealth Games 2026 | अरुंधती, प्रिया, साक्षीला सुवर्ण; भारताच्या खात्यात आणखी तीन सुवर्णपदकांची भर

मला मनापासून दुःख झाले

लव्हलिनाने व्यवस्थापनाशी संवाद साधताना सांगितले, "कृपया माझे बोलणे चुकीच्या अर्थाने घेऊ नका, पण यामुळे मला मनापासून दुःख झाले आहे. नकाशात आमचा ईशान्य भारत दाखवलेलाच नाही. बाहेर लावलेल्या नकाशातही ईशान्येचा भाग कापण्यात आला आहे. ईशान्य भारतातील नागरिक म्हणून ही गोष्ट आम्हाला खूप वेदना देणारी आहे. मला फक्त इतकेच सांगायचे होते, पुढील वेळी ही गोष्ट नक्की लक्षात ठेवा. धन्यवाद!"

हॉटेल व्यवस्थापनाकडून चूक मान्य

या प्रसंगी उपस्थित असलेले 'बॉक्सिंग फेडरेशन ऑफ इंडिया'चे अध्यक्ष अजय सिंह यांनी परिस्थिती अतिशय शांततेने हाताळली गेल्याचे सांगितले. हॉटेलात कोणताही वाद झाला नाही; हॉटेल चालकांनी आपली चूक मान्य केली असून ती दुरुस्त करण्याचे आश्वासन दिले आहे.

Lovlina Borgohain
Neeraj Chopra : "मी प्रचंड घाबरलो होतो..."; राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेत रौप्यपदक जिंकल्यानंतर नीरज चोप्राचा मोठा खुलासा

सुधारणा करण्याचे आश्वासन

अजय सिंह पीटीआयशी बोलताना म्हणाले, "तिथे कोणताही वाद झाला नाही. नकाशातील ती एक मोठी चूक होती आणि मी व लव्हलिनाने ती हॉटेल चालकांच्या निदर्शनास आणून दिली. त्यांनी आपली चूक स्वीकारली असून ती त्वरित सुधारण्याचे आश्वासन दिले आहे."दरम्यान, ग्लासगोमधील हे हॉटेल भारतीय खाद्यपदार्थांसाठी अत्यंत लोकप्रिय असून, यापूर्वीही अनेक नामांकित क्रीडापटू आणि मान्यवरांनी येथे भेट दिली आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news