Asian Games Cricket Schedule: एशियन गेम्सचे वेळापत्र जाहीर, जाणून घ्या कधी आहेत भारतीय पुरूष अन् महिला क्रिकेट संघाचे सामने

Asian Games Cricket Schedule
Asian Games Cricket Schedulepudhari
Published on
Updated on

Asian Games Cricket Schedule: एशियन गेम्सचे आयोजन यावेळी जपानमध्ये केले जाणार आहे. जपानमध्ये होणाऱ्या एशियन्स गेम्समध्ये भारतीय खेळाडू सहभागी होणार असून यावेळी एशियन गेम्समध्ये क्रिकेट देखील खेळलं जाणार आहे. एशियन गेम्ससाठीच्या क्रिकेट सामन्यांचे अधिकृत वेळापत्रक प्रसिद्ध करण्यात आलं आहे. एशियन गेम्समधील सर्व क्रिकेट सामने हे एथलेटिक्स पार्कमध्ये खेळले जाणार आहेत. यामध्ये भारताचे दोन संघ सहभागी होणार असून पुरूष आणि महिला दोन्ही संघ पदकाचे दावेदार आहेत. त्यामुळे चाहत्यांमध्ये याबाबत मोठा उत्सुकता आहे.

Asian Games Cricket Schedule
Asian Youth Games 2025 | शौर्या अंबुरेला 100 मीटर अडथळा शर्यतीत रौप्यपदक

भारतीय महिला क्रिकेट संघाचे वेळापत्रक

भारतीय महिला क्रिकेट संघ आपली मोहीम १७ सप्टेंबर पासून सुरू करणार आहे. भारतीय महिला संघ श्रीलंका, मलेशिया, बांगलादेश, पाकिस्तान, चीन आणि थायलंडसारख्या संघांविरूद्ध खेळणार आहे. भारताचा पहिला सामना हा १८ सप्टेंबरला जपानविरूद्ध होणार आहे.

महिला क्रिकेट संघाचे शेड्युल

१८ सप्टेंबर - भारत विरूद्ध जपान

२० सप्टेंबर - सेमी फायनल सामने

२२ सप्टेंबर - ब्राँझ मेडल सामना किंवा फायनल सामना

Asian Games Cricket Schedule
Asian Youth Games | कबड्डीचा किंग भारत! आशियाई युवा क्रीडा स्पर्धेत मुला-मुलींचे 'दुहेरी सुवर्ण'

भारतीय पुरूष क्रिकेट संघ वेळापत्रक

पुरूष क्रिकेट स्पर्धेत भारत, पाकिस्तान, बांगलादेश आणि श्रीलंका हे संघ थेट क्वार्टर फायनलमध्ये प्रवेश मिळवला आहे. ग्रुप A मध्ये अफगाणिस्तान, जपान, नेपाळ तर ग्रुप B मध्ये हाँगकाँग, मलेशिया, ओमान हे संघ आधी ग्रुप स्टेजचे सामने खेळणार आहेत. भारतीय संघ आपला क्वार्टर फायनल सामना २८ सप्टेंबर रोजी ग्रुप A च्या दुसऱ्या नंबरवरील संघासोबत खेळणार आहे.

२८ सप्टेंबर - क्वार्टर फायनल (भारत विरूद्ध ग्रुप A उपविजेता)

१ ऑक्टोबर - सेमीफायनल २

३ ऑक्टोबर - ब्राँझ मेडल, फायनल सामना

Asian Games Cricket Schedule
Cricket in Asian Games 2026 : ‘एशियन गेम्स’मध्ये पुन्हा एकदा क्रिकेटचा तडका! टीम इंडियाची 2 सुवर्णपदके पक्की

एशियन गेम्स क्रिकेट संपूर्ण वेळापत्रक

महिला सामने

१७ सप्टेंबर: बांगलादेश विरुद्ध चीन | पाकिस्तान विरुद्ध थायलंड

१८ सप्टेंबर: श्रीलंका विरुद्ध मलेशिया | भारत विरुद्ध जपान

२० सप्टेंबर: उपांत्य सामना १ (सेमीफायनल १) | उपांत्य सामना २ (सेमीफायनल २)

२२ सप्टेंबर: कांस्य पदक सामना (ब्रॉन्ज मेडल मॅच) | अंतिम सामना (फायनल)

पुरुष सामने

४ ते २६ सप्टेंबर (ग्रुप स्टेज): अफगाणिस्तान, जपान, नेपाळ, हाँगकाँग, मलेशिया आणि ओमान यांचे सामने

२८ सप्टेंबर:

उपांत्यपूर्व सामना १ (QF1): पाकिस्तान विरुद्ध ग्रुप-बी ची उपविजेती

उपांत्यपूर्व सामना २ (QF2): भारत विरुद्ध ग्रुप-ए ची उपविजेती

२९ सप्टेंबर:

उपांत्यपूर्व सामना ३ (QF3): श्रीलंका विरुद्ध ग्रुप-ए ची विजेता

उपांत्यपूर्व सामना ४ (QF4): बांगलादेश विरुद्ध ग्रुप-बी ची विजेता

१ ऑक्टोबर: उपांत्य सामना १ (सेमीफायनल १) | उपांत्य सामना २ (सेमीफायनल २)

३ ऑक्टोबर: कांस्य पदक सामना (ब्रॉन्ज मेडल मॅच) | अंतिम सामना (फायनल)

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news