Asian Games: 4x400 मीटर रिले शर्यतीत भारतीय रणरागिणींची ‘सुवर्णदौड’! अखेरच्या क्षणी बहरीनला धूळ चारत जिंकले ऐतिहासिक गोल्ड मेडल

ॲथलेटिक्सच्या अखेरच्या दिवशी भारताच्या पदकतालिकेत सुवर्णपदकाचा षटकार
Asian Games: 4x400 मीटर रिले शर्यतीत भारतीय रणरागिणींची ‘सुवर्णदौड’! अखेरच्या क्षणी बहरीनला धूळ चारत जिंकले ऐतिहासिक गोल्ड मेडल
Published on: 
Updated on: 

नागोया : 'आयची-नागोया आशियाई क्रीडा स्पर्धा २०२६' च्या ॲथलेटिक्स ट्रॅकवर अखेरच्या दिवशी भारतीय महिलांनी ऐतिहासिक कामगिरी नोंदवली. महिलांच्या ४x४०० मीटर रिले शर्यतीत भारतीय चौकडीने अप्रतिम समन्वय व कौशल्याचे प्रदर्शन करत सुवर्णपदकाला गवसणी घातली. चालू आशियाई क्रीडा स्पर्धेत भारताचे हे एकंदर सहावे सुवर्णपदक ठरले असून, यंदाच्या ॲथलेटिक्स मोहिमेतील भारताचे हे पहिले आणि एकमेव सुवर्णपदक आहे.

अटीतटीच्या लढतीत भारतीय चौकडीचा थरार

किरण पाहल, मचेतिरा पूवम्मा (एम. आर. पूवम्मा), प्राची आणि विथ्या रामराज या भारतीय चौकडीने ३ मिनिटे २९.६९ सेकंद अशी सर्वोत्तम वेळ नोंदवत भारताला सुवर्णपदक मिळवून दिले. या शर्यतीत भारताने बहरीन आणि चीनच्या कडव्या आव्हानावर मात केली.

  • भारत (सुवर्णपदक): ३ मिनिटे २९.६९ सेकंद

  • बहरीन (रौप्यपदक): ३ मिनिटे ३०.२१ सेकंद

  • चीन (कांस्यपदक): ३ मिनिटे ३१.०२ सेकंद

Asian Games: 4x400 मीटर रिले शर्यतीत भारतीय रणरागिणींची ‘सुवर्णदौड’! अखेरच्या क्षणी बहरीनला धूळ चारत जिंकले ऐतिहासिक गोल्ड मेडल
Asian Games 2026 : गुलवीर सिंगचा ‘ट्रिपल धमाका’! साधली पदकांची हॅटट्रिक, एकाच ‘आशियाई’ स्पर्धेत ३ वैयक्तिक पदकांवर मोहोर

संथ सुरुवातीनंतर अनुभवी पूवम्मा आणि विथ्याची मुसंडी

शर्यतीची सुरुवात भारतासाठी काहीशी सावध आणि संथ झाली. पहिल्या टप्प्यात किरण पाहल धावताना पिछाडीवर पडल्याने बॅटन हस्तांतरित करताना भारतीय संघ तिसऱ्या स्थानावर फेकला गेला होता. मात्र, दुसऱ्या टप्प्यात अनुभवी धावपटू मचेतिरा पूवम्माने उत्कृष्ट वेग पकडत भारताला आघाडीच्या शर्यतीत पुन्हा आणून ठेवले. तिसऱ्या टप्प्यात प्राचीने ही आघाडी टिकवून ठेवत शेवटच्या टप्प्यासाठी विथ्या रामराजकडे बॅटन सोपवले.

अंतिम टप्प्यात रोमांच शिगेला पोहोचला होता. बहरीनची जागतिक कीर्तीची स्टार धावपटू सलवा ईद नासेर अत्यंत वेगाने भारताचा पाठलाग करत जवळ पोहोचली होती. परंतु, अखेरच्या १०० मीटरमध्ये विथ्या रामराजने आपली सर्व शक्ती पणाला लावली, वेग कायम राखला आणि अवघ्या ०.५२ सेकंदांच्या फरकाने बहरीनला मागे टाकत भारताच्या विजयावर शिक्कामोर्तब केले.

Asian Games: 4x400 मीटर रिले शर्यतीत भारतीय रणरागिणींची ‘सुवर्णदौड’! अखेरच्या क्षणी बहरीनला धूळ चारत जिंकले ऐतिहासिक गोल्ड मेडल
Neeru Dhanda Wins Gold: आशियाई क्रीडा स्पर्धेत नीरू धांडाने रचला इतिहास; ट्रॅप शूटिंगमध्ये भारताला सुवर्णपदक

विथ्या रामराजची स्वप्नवत कामगिरी

विथ्या रामराजसाठी ही स्पर्धा अत्यंत संस्मरणीय ठरली आहे. तिने याआधी पी. टी. उषा यांचा ४०० मीटर अडथळा शर्यतीचा (Hurdles) प्रदीर्घ विक्रम मोडून क्रीडा जगताचे लक्ष वेधून घेतले होते. आता ४x४०० मीटर रिलेमधील या सुवर्णपदकासह तिने चालू स्पर्धेत आपले तिसरे वैयक्तिक/सांघिक पदक निश्चित केले आहे.

रिले शर्यतीत भारताचे ऐतिहासिक वर्चस्व

महिलांच्या ४x४०० मीटर रिले प्रकारात आशियाई स्तरावर भारताचा ऐतिहासिक दबदबा राहिला आहे. २००२ च्या बुसान स्पर्धेपासून आतापर्यंत झालेल्या सलग ७ आशियाई क्रीडा स्पर्धांमध्ये भारताचे हे सहावे सुवर्णपदक ठरले आहे. मागील हांगझोऊ स्पर्धेत बहरीनने बाजी मारल्याने भारताला रौप्यपदकावर समाधान मानावे लागले होते; मात्र नागोयामध्ये भारतीय महिलांनी गत पराभवाची परतफेड करत पुन्हा एकदा आशियाई चॅम्पियन होण्याचा मान मिळवला.

Asian Games: 4x400 मीटर रिले शर्यतीत भारतीय रणरागिणींची ‘सुवर्णदौड’! अखेरच्या क्षणी बहरीनला धूळ चारत जिंकले ऐतिहासिक गोल्ड मेडल
Asian Games : 1500 मीटर ट्रॅकवर गुलवीरचा झंझावात, शूटिंग रेंजवर ईशाचा दबदबा! भारताची 'रौप्य' भरारी

ॲथलेटिक्स मोहिमेचा समारोप: १ सुवर्ण, २४ पदके

ॲथलेटिक्स प्रकारातील भारताची २०२६ मधील मोहीम १ सुवर्ण, ९ रौप्य आणि १४ कांस्य अशा एकूण २४ पदकांसह समाप्त झाली. मागील हांगझोऊ स्पर्धेतील ६ सुवर्णपदकांच्या तुलनेत यंदा सुवर्णाची संख्या घटली असली, तरी महिला रिले संघाने शेवटच्या दिवशी भारताची सुवर्णपदकाची प्रतीक्षा संपुष्टात आणली.

पुरुष व मिश्र रिले संघाला कांस्यपदक

महिलांच्या सुवर्णयशाव्यतिरिक्त रिले ट्रॅकवर भारताला इतर दोन स्पर्धांमध्येही पदके मिळाली.

  • पुरुष ४x४०० मीटर रिले: भारतीय संघाने चुरशीच्या लढतीत कांस्यपदक पटकावले. या संघात मनू टी. आणि विशाल टी. के. यांनी शानदार कामगिरी केली. या शर्यतीत जपानने सुवर्ण तर कतारने रौप्यपदक पटकावले.

  • ४x४०० मीटर मिश्र (मिक्स्ड) रिले: भारतीय संघाने तिसऱ्या स्थानी फिनिश करत कांस्यपदकाची कमाई केली.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

पुणे शहरातील सर्व अपडेट्स आता WhatsApp वर; आत्ताच जॉईन करा
logo
Pudhari News
pudhari.news