Asia Cup 2025 : गिलच्या पुनरागमनाची चर्चा, पण यशस्वी जैस्वालही शर्यतीत; कोणाची आकडेवारी दमदार?

Shubman Gill vs Yashasvi Jaiswal : गिलचा अनुभव आणि सध्याचा फॉर्म त्याला पसंती मिळवून देऊ शकतो, तर जैस्वालची आक्रमक शैली त्याला एक मजबूत पर्याय बनवते.
asia cup 2025 shubman gill comeback talks but yashasvi jaiswal also in race whose stats are better
Published on
Updated on
Summary

ठळक मुद्दे :

  • गिलला उपकर्णधारपदाची जबाबदारी मिळण्याचीही चर्चा.

  • IPLमध्ये प्रभावी कामगिरी करणारा जैस्वालही या जागेसाठी प्रबळ दावेदार.

  • दोन्ही खेळाडूंच्या टी-२० आंतरराष्ट्रीय आकडेवारीचा सविस्तर आढावा.

asia cup 2025 shubman gill may be comeback yashasvi jaiswal also in race

भारतीय कसोटी संघाचा कर्णधार शुभमन गिल सध्या त्याच्या कारकिर्दीतील सर्वोत्तम फॉर्मात आहे. नुकत्याच पार पडलेल्या इंग्लंड दौऱ्यातील त्याच्या नेत्रदीपक कामगिरीमुळे, आशिया चषक २०२५ च्या ट्वेन्टी-२० स्वरूपातील संघात त्याच्या पुनरागमनाची शक्यता दाट झाली आहे. त्याला उपकर्णधारपदाची जबाबदारी मिळण्याचीही चर्चा आहे. मात्र, दुसरीकडे आयपीएल गाजवलेला युवा फलंदाज यशस्वी जैस्वालही या जागेसाठी प्रबळ दावेदार मानला जात आहे. या पार्श्वभूमीवर, ट्वेन्टी-२० आंतरराष्ट्रीय सामन्यांमध्ये या दोघांपैकी कोणाची आकडेवारी अधिक प्रभावी आहे, याचा घेतलेला हा आढावा.

गिलचा दमदार फॉर्म आणि पुनरागमनाची शक्यता

भारतीय कसोटी कर्णधार शुभमन गिलने इंग्लंड दौऱ्यावर अत्यंत प्रभावी कामगिरी केली. त्याने पाच सामन्यांच्या कसोटी मालिकेतील १० डावांमध्ये ७५.४० च्या उत्कृष्ट सरासरीने एकूण ७५४ धावा केल्या. या दरम्यान त्याने चार शतके झळकावली. २५ वर्षीय गिलने बर्मिंगहॅम येथे इंग्लंडविरुद्ध आपल्या कारकिर्दीतील सर्वोत्तम २६९ धावांची खेळी केली आणि त्याच सामन्याच्या दुसऱ्या डावात १६१ धावांची खेळी साकारली.

asia cup 2025 shubman gill comeback talks but yashasvi jaiswal also in race whose stats are better
Asia Cup 2025 : टीम इंडियाच्या भीतीने पाकिस्तानला फुटला घाम! माजी क्रिकेटपटू म्हणाला; ‘भारताने आशिया चषकातून माघार घ्यावी’

त्याच्या या कसोटीतील सातत्यपूर्ण कामगिरीनंतर, अगामी आशिया चषक स्पर्धेसाठी टी-२० संघात त्याचे पुनरागमन निश्चित मानले जात आहे. 'रेव्हस्पोर्ट्स'च्या वृत्तानुसार, गिलची भारतीय संघात निवड होऊ शकते आणि त्याला उपकर्णधारपदाची जबाबदारीही दिली जाण्याची शक्यता आहे.

टी-२० आंतरराष्ट्रीय कारकीर्द: कोण आहे सरस?

शुभमन गिलने २०२३ मध्ये टी-२० आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये पदार्पण केले. आतापर्यंत त्याने एकूण २१ सामने खेळले असून, २१ डावांमध्ये ३०.४२ च्या सरासरीने ५७८ धावा केल्या आहेत. झिम्बाब्वेविरुद्ध पाच डावांमध्ये ४२ च्या सरासरीने १७० धावा केल्या होत्या. न्यूझीलंडविरुद्ध तीन सामन्यांमध्ये त्याने ७२ च्या प्रभावी सरासरीने १४४ धावा केल्या, तर श्रीलंकेविरुद्ध पाच डावांमध्ये २६.२० च्या सरासरीने १३१ धावा केल्या.

asia cup 2025 shubman gill comeback talks but yashasvi jaiswal also in race whose stats are better
Team India Asia Cup : ‘आशिया कप’साठी टीम इंडियात मोठे बदल अटळ! बुमराह-गिल 'इन', 'या' खेळाडूंना डच्चू?

दुसरीकडे, यशस्वी जैस्वालने ऑगस्ट २०२३ मध्ये टी-२० आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये पदार्पण केले. त्याने आतापर्यंत ३६.१५ च्या प्रभावी सरासरीने एकूण ७२३ धावा केल्या आहेत. ऑस्ट्रेलियाविरुद्ध त्याने २७.६० च्या सरासरीने १३८ धावा केल्या आहेत, तर झिम्बाब्वेविरुद्ध १४१ धावा केल्या. नेपाळविरुद्ध एकाच डावात त्याने १०० धावांची शतकी खेळी केली होती.

स्ट्राइक रेटमध्ये कोण आघाडीवर?

शुभमन गिलने २१ ट्वेन्टी-२० आंतरराष्ट्रीय सामन्यांमध्ये १३९.६१ च्या स्ट्राइक रेटने धावा केल्या आहेत. झिम्बाब्वेविरुद्ध तीन डावांमध्ये त्याचा स्ट्राइक रेट १८४.२१ इतका होता, तर श्रीलंकेविरुद्ध पाच डावांमध्ये तो १३५.०५ होता. वेस्ट इंडिजविरुद्ध पाच डावांमध्ये त्याने १२०.३१ च्या स्ट्राइक रेटने धावा केल्या.

asia cup 2025 shubman gill comeback talks but yashasvi jaiswal also in race whose stats are better
Rohit-Virat ODI Future : ‘उशीर होण्यापूर्वी रोहित-विराटला संघातून बाहेर करा’ : ‘BCCI’ला माजी निवडकर्त्याचा सल्ला

५० पेक्षा अधिक धावा : गिलचे वर्चस्व

टी-२० आंतरराष्ट्रीय सामन्यांमध्ये गिलच्या नावावर चार वेळा ५० पेक्षा अधिक धावांची नोंद आहे. यामध्ये एक शतक आणि तीन अर्धशतकांचा समावेश आहे.

  • नाबाद १२६ (६३ चेंडू) : २०२३ मध्ये न्यूझीलंडविरुद्ध.

  • ७७ धावा (४७ चेंडू) : २०२३ मध्ये वेस्ट इंडिजविरुद्ध.

  • ६६ धावा (४९ चेंडू) : जुलै २०२४ मध्ये झिम्बाब्वेविरुद्ध.

एकंदरीत, दोन्ही खेळाडूंची कामगिरी प्रभावी असली तरी, निवड समिती कोणाच्या नावावर शिक्कामोर्तब करते हे पाहणे महत्त्वाचे ठरेल. गिलचा अनुभव आणि सध्याचा फॉर्म त्याला पसंती मिळवून देऊ शकतो, तर जैस्वालची आक्रमक शैली त्याला एक मजबूत पर्याय बनवते.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news