

भारतीय क्रिकेट संघाचे मुख्य प्रशिक्षक गौतम गंभीर यांनी एका कार्यक्रमात आपल्या खास शैलीत भारतीय खेळाडूंना नवीन टोपणनावे (निकनेम) दिली आहेत. दिल्ली प्रीमियर लीगच्या अंतिम सामन्यात बोलताना गंभीरने विराट कोहलीला 'देसी बॉय' असे संबोधले. या नावाची सोशल मीडियावर जोरदार चर्चा सुरू आहे.
गंभीरने केवळ कोहलीलाच नाही, तर इतर अनेक क्रिकेटपटूंनाही आकर्षक नावे दिली. त्याने सचिन तेंडुलकरला 'क्लच', जसप्रीत बुमराहला 'स्पीड' आणि शुभमन गिलला 'मोस्ट स्टायलिश' म्हटले.
जहीर खान : 'डेथ ओव्हर स्पेशलिस्ट'
व्हीव्हीएस लक्ष्मण : 'रन मशीन'
ऋषभ पंत: 'मोस्ट फनी'
राहुल द्रविड: 'मिस्टर कन्सिसटंट'
नितीश राणा: 'गोल्डन आर्म'
या कार्यक्रमात गंभीरने सांगितले की, गेल्या काही दिवसांत तो क्रिकेटपासून दूर आहे. कारण भारतीय संघही एका महिन्याच्या सुट्टीवर होता. गंभीरने दिल्ली प्रीमियर लीगचे कौतुक केले आणि म्हटले की दिल्लीच्या खेळाडूंना आपली प्रतिभा दाखवण्यासाठी हे एक उत्तम व्यासपीठ आहे. दिल्लीमध्ये प्रतिभेची कमतरता नाही आणि इथल्या स्थानिक स्पर्धा खूप चुरशीने खेळल्या जातात, त्यामुळे भविष्यात भारताला इथूनच सर्वोत्तम खेळाडू मिळत राहतील, असेही तो म्हणाला.
सूर्यकुमार यादव (कर्णधार), शुभमन गिल (उपकर्णधार), तिलक वर्मा, रिंकू सिंग, शिवम दुबे, हार्दिक पांड्या, अभिषेक शर्मा, अक्षर पटेल, संजू सॅमसन (विकेटकीपर), जितेश शर्मा (विकेटकीपर), जसप्रीत बुमराह, अर्शदीप सिंग, कुलदीप यादव, वरुण चक्रवर्ती, हर्षित राणा.