Arshdeep Singh Samreen Kaur : अर्शदीप सिंग प्रेमाच्या खेळात 'क्लीन बोल्ड'! समरीन कौरसोबत उरकला साखरपुडा; म्हणाली, 'Hi Fiancé'

अर्शदीप सिंग झाला 'एंगेज्ड'! होणारी पत्नी समरीन कौरची भावनिक पोस्ट सोशल मीडियावर तुफान व्हायरल
Arshdeep Singh Samreen Kaur : अर्शदीप सिंग प्रेमाच्या खेळात 'क्लीन बोल्ड'! समरीन कौरसोबत उरकला साखरपुडा; म्हणाली, 'Hi Fiancé'
Published on: 
Updated on: 

नवी दिल्ली : भारतीय क्रिकेट संघाचा प्रमुख वेगवान गोलंदाज अर्शदीप सिंग याने आपल्या आयुष्याची नवी इनिंग सुरू केली आहे. मैदानावर अचूक यॉर्कर्सने फलंदाजांच्या दांड्या उडवणारा अर्शदीप आता प्रेमाच्या खेळात 'क्लीन बोल्ड' झाला आहे. अर्शदीप आणि त्याची दीर्घकाळाची मैत्रीण समरीन कौर यांचा साखरपुडा (Engaged) संपन्न झाला असून, समरीनने सोशल मीडियावर खास फोटो शेअर करत ही आनंदाची बातमी चाहत्यांसोबत शेअर केली आहे.

समरीनने तिच्या अधिकृत इन्स्टाग्राम अकाउंटवर या खास क्षणाचे अत्यंत रोमँटिक फोटो पोस्ट केले आहेत. या फोटोंमध्ये दोघांची केमिस्ट्री आणि चेहऱ्यावरील आनंद स्पष्टपणे दिसून येत आहे. हे फोटो शेअर करताना तिने लिहिलेले भावनिक कॅप्शन सध्या चाहत्यांचे लक्ष वेधून घेत आहे.

समरीनने कॅप्शनमध्ये लिहिले आहे:

"आयुष्याने आम्हाला ज्या काही गोष्टी दिल्या, त्यापैकी सर्वात मोठा आनंद मला याचा आहे की आयुष्याने आम्हाला एकमेकांची साथ दिली. संपूर्ण आयुष्य एकत्र घालवण्यासाठी सज्ज... ११.११.२०२६ 💍♾️ (Hi Fiancé 🤭)"

तिच्या या पोस्टनंतर क्रिकेट वर्तुळातून आणि बॉलिवूडमधून या जोडप्यावर शुभेच्छांचा वर्षाव होत आहे. टीम इंडियातील अनेक सहकाऱ्यांसह क्रीडा जगतातील नामांकित खेळाडूंनी आणि चाहत्यांनी दोघांचे अभिनंदन केले आहे.

टी-२० क्रिकेटमध्ये भारताच्या अनेक विजयांचा शिल्पकार ठरलेला डावखुरा वेगवान गोलंदाज अर्शदीप आपल्या वैयक्तिक आयुष्याबद्दल कायमच शांत राहणे पसंत करतो. मात्र, ११ नोव्हेंबर २०२६ या खास तारखेला साखरपुड्याची अंगठी दाखवत या जोडप्याने आपल्या नात्यावर अखेर अधिकृत मोहर लावली आहे. आता चाहत्यांना या दोघांच्या लग्नाच्या शाही सोहळ्याची प्रतीक्षा लागली आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.