Arjun Tendulkar : अर्जुन तेंडुलकर मुंबई इंडियन्स सोडणार? संघ बदलाची चर्चा

शार्दुल ठाकूर आणि अर्जुन तेंडुलकर यांच्यात अदलाबदलीची शक्‍यता
Arjun Tendulkar : अर्जुन तेंडुलकर मुंबई इंडियन्स सोडणार? संघ बदलाची चर्चा
Published on
Updated on

IPL2026 player swap : इंडियन प्रिमियर लीगमध्‍ये चेन्नई सुपर किंग्ज (CSK) आणि राजस्थान रॉयल्स (RR) यांच्यात रवींद्र जडेजा-सॅम करनच्या बदल्यात संजू सॅमसनचा संभाव्य 'ट्रेड' (खेळाडूंची अदलाबदल) चर्चेत असतानाच आणखी दोन खेळाडूंच्‍या अदलाबदलीची चर्चा सुरु आहे. लखनौ सुपर जायंट्स (LSG) आणि मुंबई इंडियन्स (MI) यांच्‍यात शार्दुल ठाकूर आणि अर्जुन तेंडुलकर यांच्या देवाणघेवाणीसंदर्भात चर्चा सुरु आहे, असे वृत्त क्रिकबझने दिले आहे.

आयपीएलची रिटेन्शन डेडलाइन जवळ

इंडियन प्रीमियर लीग (आयपीएल) २०२६ ची रिटेन्शन डेडलाइन जवळ येत आहे. सर्व फ्रँचायझी त्यांच्या रोस्टरला अंतिम रूप देण्यास व्यस्त आहेत. संघांना १५ नोव्हेंबरपर्यंत त्यांचे रिटेन्शन केलेले आणि रिलीज केलेले खेळाडू सादर करावे लागणार आहेत. दरम्यान, चेन्नई सुपर किंग्ज (सीएसके) आणि राजस्थान रॉयल्स (आरआर) यांच्यात रवींद्र जडेजा-संजू सॅमसन यांच्यातील व्यवहाराची चर्चा जोरात सुरू असताना, शार्दुल ठाकूर आणि अर्जुन तेंडुलकर यांच्या देवाणघेवाणीसंदर्भात चर्चा सुरु असल्‍याचे वृत्त आहे.

Arjun Tendulkar : अर्जुन तेंडुलकर मुंबई इंडियन्स सोडणार? संघ बदलाची चर्चा
Haris Rauf : "माणसं आहेत, रोबोट नाही..." : भारतीय फलंदाजांनी 'धुलाई' केलेल्‍या हरिस रौफच्‍या भावनांचा बांध फुटला

अर्जुन तेंडुलकर मुंबई इंडियन्‍स सोडणार?

क्रिकबझच्या रिपोर्टनुसार, शार्दुल ठाकूर आणि अर्जुन तेंडुलकर हे दोघेही त्यांच्या सध्याच्या संघांना सोडण्याची शक्यता आहे. मुंबई इंडियन्स आणि लखनऊ सुपर जायंट्स (एलएसजी) यांच्यात अर्जुन तेंडुलकर आणि शार्दुल ठाकूर यांच्याबाबत चर्चा सुरू आहे. मात्र हे देवाणघेवाण नसून संपूर्णपणे रोख रक्कम आधारित हस्तांतरण असू शकतात. दोन्ही खेळाडूंसाठी स्वतंत्र रोख व्यवहार असेल. अर्जुनने २०२३ मध्ये आयपीएलमध्ये पदार्पण केले आणि त्याने मुंबई इंडियन्सकडून पाच सामने खेळले आहेत, तीन विकेट्स घेतल्या आहेत. २०२५ च्या मेगा लिलावात, मुंबईने त्याला त्याच्या मूळ किमतीत ₹३० लाखात पुन्हा खरेदी केले होते. , २०२५ च्या लिलावात कोणत्याही संघाने शार्दुल ठाकूरला खरेदी केले नाही. नंतर, लखनौ सुपर जायंट्सने मोहसिन खानच्या दुखापतीमुळे त्याला बदली खेळाडू म्हणून समाविष्ट केले. शार्दुलने लखनौ सुपर जायंट्ससाठी १० सामने खेळले, १३ विकेट्स घेतल्या, परंतु फलंदाजीमध्‍ये त्‍याच्‍या कामगिरी तितकी प्रभावी राहिली नाही.

नियम काय सांगतो?

इंडियन प्रीमियर लीग (IPL) च्या नियमांनुसार, कोणताही करार किंवा अदलाबदल झाल्यास त्याची अधिकृत घोषणा भारतीय क्रिकेट नियामक मंडळाकडून (BCCI) होणे बंधनकारक आहे. तथापि, मुंबई क्रिकेट वर्तुळातील सूत्रांनी क्रिकबझला या संभाव्य खेळाडू अदलाबदलीला दुजोरा दिला आहे. खेळाडू रिटेन्शन आणि रिलीझ च्या यादीसोबतच १५ नोव्हेंबर रोजी पुढील काही दिवसांत याची घोषणा होऊ शकते. हा व्यवहार सुरू करण्याचा नेमका कोणाचा पुढाकार आहे हे स्पष्ट झालेले नाही, परंतु दोन्ही फ्रँचायझींमध्ये यावर चर्चा सुरू असल्याची माहिती आहे.

Arjun Tendulkar : अर्जुन तेंडुलकर मुंबई इंडियन्स सोडणार? संघ बदलाची चर्चा
Sourav Ganguly : 'कारण नसतानाच...' ; टीम इंडियातून शमीला वगळल्‍याने सौरव गांगुली भडकले

संघात स्‍थान मिळवणे अर्जुन तेंडुलकरसाठी नेहमीच आव्‍हानात्‍मक

दोन वर्षांपूर्वी अर्जुन तेंडुलकरने देशांतर्गत क्रिकेटमध्ये मुंबईहून गोवा संघाकडे स्थलांतर केले होते. तेव्हापासून त्याने २१ प्रथम-श्रेणी (First-class) सामने खेळले आहेत. देशांतर्गत असो वा आयपीएल, मुंबईच्या मजबूत संघात प्लेइंग इलेव्हनमध्ये स्थान मिळवणे नेहमीच एक आव्हान राहिले आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news