FIFA World Cup मधून अर्जेंटिनाला वगळण्‍याची मागणी! 'त्या' याचिकेने मोडला असता 'गिनीज वर्ल्ड रेकॉर्ड'!; नेमकं प्रकरण काय?

Argentina FIFA World Cup petition :२.३ कोटींहून अधिक लोकांनी केली ऑनलाईन स्वाक्षरी
FIFA World Cup
FIFA World Cup File Photo
Published on
Updated on

Argentina FIFA World Cup petition : फिफा विश्वचषकात (FIFA World Cup) आपल्या उत्कृष्ट खेळाने चाहत्यांची मने जिंकण्यात लिओनेल मेस्सीच्या अर्जेंटिना संघाला यश आले नाही. मेस्सीच्या नेतृत्वाखालील अर्जेंटिनाने अंतिम फेरीत धडक नक्की मारली; परंतु या प्रवासात अनेक वाद निर्माण झाले. तसेच आंतरराष्ट्रीय फुटबॉल महासंघाने (FIFA) अर्जेंटिनाचीच बाजू घेतल्याचे गंभीर आरोपही करण्यात आले.

अर्जेंटिनाला स्पर्धेतून वगळण्यासाठी ऑनलाईन मोहीम

विश्वचषकाच्या अंतिम सामन्यापूर्वीच अर्जेंटिनाला या स्पर्धेतून वगळण्यासाठी एक ऑनलाईन मोहीम वेगाने सुरू झाली होती. अंतिम सामना संपल्याची पंचांनी घोषणा केल्यानंतर दोन्ही संघांतील खेळाडूंमध्ये जोरदार बाचाबाची झाली. या घटनेमुळे अर्जेंटिनाच्या प्रतिमेला आणखी धक्का बसला. ही याचिका बंद होण्यापूर्वी तब्बल २ कोटी ३० लाखांहून अधिक (२३ मिलियन) लोकांनी त्यावर स्वाक्षरी केली होती. यामुळे 'गिनीज वर्ल्ड रेकॉर्ड' मोडला जाण्याची परिस्थिती निर्माण झाली होती.

FIFA World Cup
FIFA World Cup 2026 Winner : विश्वचषक विजेत्या फेरान टोरेसचे काय आहे ‘भारताशी कनेक्शन’? जाणून घ्या स्पेनच्या 'गोल्डन बॉय'चा प्रवास

अंतिम सामन्यातील राड्यामुळे अर्जेंटिना ठरला 'व्हिलन'

या स्पर्धेच्या अंतिम सामन्‍यानंतर अर्जेंटिनाच्‍या लिअँड्रो परेडेसने केलेल्या हिंसक वर्तनामुळे अर्जेंटिनाचा संघ वादाच्‍या भोवर्‍यात अडकला. परेडेसने स्पेनचा बचावपटू एरिक गॅलिशयाला मुक्का मारला आणि गावी (Gavi) याला जमिनीवर फेकले. सामन्यादरम्यान पॉव कुबार्सीवर केलेल्या फाऊलमुळे एन्झो फर्नांडिसला रेड कार्ड दाखवून मैदानाबाहेर काढण्यात आले, जो 'ला अल्बिसेलेस्टे'च्या (अर्जेंटिना) पराभवातील मुख्य टर्निंग पॉईंट ठरला.

२.३ कोटींहून अधिक लोकांचा पाठिंबा

अंतिम सामन्यातील या गदारोळानंतर अर्जेंटिनावर कायमस्वरूपी बंदी घालण्याच्या मागणीला अभूतपूर्व पाठिंबा मिळाला. जगभरातून २,३३,१६,१०८ लोकांनी यावर स्वाक्षऱ्या केल्या, ज्यामुळे ही इतिहासातील सर्वात वेगाने पसरणारी याचिका ठरली. युरोपियन माध्यमांनी दिलेल्या रिपोर्टनुसार, "अर्जेंटिना आऊट" (Argentina Out) या नावाने ही मोहीम चालवण्यात आली होती. सुमारे १७० देशांतील फुटबॉल चाहत्यांनी यात सहभाग नोंदवला. या याचिकेसाठी सुरुवातीला ५० लाखांचे लक्ष्य ठेवण्यात आले होते, परंतु त्याला मिळालेला प्रतिसाद उद्दिष्टापेक्षा कित्येक पटीने जास्त होता.

FIFA World Cup
FIFA World Cup 2026 Final: फिफा विश्वचषक फायनलनंतर मैदानावर राडा; अर्जेंटिना आणि स्पेनच्या खेळाडूंमध्ये जोरदार हाणामारी

'पंचांच्या पक्षपातीपणाचा आरोप'

स्पर्धेदरम्यान पंचांनी अर्जेंटिनाच्या बाजूने पक्षपाती निर्णय दिल्याचा आरोप करत ही याचिका सुरू करण्यात आली होती. "जर विजेता कोण हे आधीच ठरले असेल, तर उर्वरित संघांनी खेळायचे तरी कशासाठी? अर्जेंटिनाला विश्वचषकातून बाहेर करा आणि सर्वांना समान संधी द्या," असा मजकूर या याचिकेत लिहीण्यात आला होता.अंतिम सामन्यात स्पेनने अर्जेंटिनाचा १-० असा पराभव केल्यानंतर याचिकाकर्त्यांनी, "फिफाने आमच्याकडे दुर्लक्ष केले, पण स्पेनने आपले वचन पाळले... थँक्यू स्पेन!" असा संदेश देत ही मोहीम बंद केली.

FIFA World Cup
Eng vs France FIFA World Cup : एम्‍बापेचा विश्वविक्रम; पण बुकायोच्या हॅट्ट्रिकच्या जोरावर इंग्लंडने मारली बाजी

'गिनीज वर्ल्ड रेकॉर्ड'च्या अगदी जवळ

जगातील सर्वात जास्त स्वाक्षऱ्या झालेल्या याचिकेचा अधिकृत विक्रम 'ज्युबली २०००' (Jubilee 2000) या चळवळीच्या नावे आहे, ज्यावर २,४३,१९,१८१ लोकांनी स्वाक्षऱ्या केल्या होत्या. ही याचिका जर आणखी दोन-तीन दिवस सुरू राहिली असती, तर 'गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्ड्स'चा हा ऐतिहासिक विक्रम मोडला गेला असता!

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news