

Andre Russell Creates T20 History: टी–20 क्रिकेटमध्ये जे अशक्य मानलं जात होतं, ते वेस्ट इंडिजच्या तडफदार ऑलराऊंडर आंद्रे रसेलने करून दाखवलं आहे. रसेलने टी–20 क्रिकेटमध्ये असा विक्रम केला आहे जो जगातील एकाही क्रिकेटपटूने केला नाही.
शारजाहमध्ये झालेल्या ILT20 सामन्यात अबू धाबी नाईट रायडर्सकडून खेळताना रसेलने त्याचा 500वी टी–20 विकेट घेताच, तो टी–20 इतिहासातील पहिला क्रिकेटपटू ठरला, ज्याच्या नावावर एकाच वेळी—
5,000+ रन्स
500 विकेट्स
500+ सिक्स आहेत
असा ‘ट्रिपल 500’चा विश्वविक्रम अजून तरी कोणी केला नाही.
रसेलने जुलै 2025 मध्ये आंतरराष्ट्रीय क्रिकेटला आणि नोव्हेंबर 2025 मध्ये IPL चा निरोप घेतला. पण ILT20 मध्ये खेळताना त्याने नवीन विक्रम केला आहे.
रसेलने आतापर्यंत खेळलेल्या 576 टी–20 सामन्यांतून—
9496 धावा (2 शतके, 33 अर्धशतके)
500 विकेट्स
772 सिक्स अशी अविश्वसनीय कामगिरी केली आहे.
ड्वेन ब्रावो, शाकिब अल हसन यांनी टी–20 मध्ये 5000+ धावा आणि 500 विकेट्स घेतल्या असल्या, तरी 500 सिक्सचा टप्पा मात्र कोणीच गाठू शकले नाही. तो विक्रम रसेलच्याच नावावर आहे.
डेजर्ट वायपर्सविरुद्धच्या ILT20 सामन्यात रसेल सहाव्या क्रमांकावर खेळायला आला आणि फक्त 23 चेंडूंमध्ये 36 धावा ठोकत नाबाद राहिला. त्याच्या फलंदाजीमुळे अबू धाबी नाइट रायडर्सने 171 धावांचा स्कोअर केला.
पण हा स्कोअर विजयसाठी पुरेसा ठरला नाही. शिमरॉन हेटमायरच्या 25 चेंडूंवरील 48 धावांच्या खेळीमुळे वायपर्सने 19.3 षटकांत हे लक्ष्य गाठले. रसेलने हेटमायरला बाद करत महत्त्वाची विकेट घेतली, मात्र संघाचा पराभव टाळता आला नाही.
टी–20 क्रिकेटच्या इतिहासात जगभरातील कोणत्याही खेळाडूने रसेलसारखी धमाकेदार ‘ट्रिपल 500’ची किमया केली नाही. त्यामुळे त्याचा हा विक्रम पुढील अनेक वर्षे मोडणे जवळपास अशक्य मानला जात आहे.