Amanpreet Singh Gill passes away : क्रिकेट विश्वावर शोककळा! विराट कोहलीचा माजी सहकारी अमनप्रीत सिंगचे आकस्मिक निधन

Amanpreet Singh Gill passes away | अमनप्रीतसोबतच्या आठवणींना उजाळा देत युवराज सिंगने वाहिली श्रद्धांजली
Amanpreet Singh Gill passes away
विराट कोहलीचा माजी सहकारी अमनप्रीत सिंगचे अवघ्या ३६ व्या वर्षी आकस्मिक निधन झाले. अमनप्रीतसोबतच्या आठवणींना उजाळा देत युवराज सिंगने वाहिली श्रद्धांजली वाहली आहे.Pudhari
Published on
Updated on

Amanpreet Singh Gill passes away

चंदीगड : पंजाबचा माजी क्रिकेटपटू अमनप्रीत सिंग गिल याचे वयाच्या ३६ व्या वर्षी अचानक निधन झाले आहे. त्याच्या निधनावर शोक व्यक्त करताना, माजी क्रिकेटपटू युवराज सिंगने अमनप्रीतच्या आठवणींना उजाळा दिला.

विराट, जडेजासोबत अमनप्रीत सिंग होता Under-19 संघात

अमनप्रीत सिंग हा विराट कोहली आणि रवींद्र जडेजा यांच्यासोबत भारताच्या १९ वर्षांखालील (Under-19) संघात होता. त्याने प्रथम श्रेणी क्रिकेटमध्ये पंजाबचे प्रतिनिधित्व केले होते. आयपीएलच्या सुरुवातीच्या काळात तो किंग्स इलेव्हन पंजाब (आताचा पंजाब किंग्स) संघात होता. त्यानंतर त्याने वरिष्ठ निवडकर्ता म्हणूनही काम पाहिले होते. पंजाब क्रिकेट असोसिएशनने (PCA) अमनप्रीतच्या निधनाबद्दल शोक व्यक्त केला आहे. दरम्यान, माजी अष्टपैलू खेळाडू युवराज सिंगने त्याच्यासोबतचे ड्रेसिंग रूममधील क्षण आठवत भावूक पोस्ट शेअर केली आहे.

Amanpreet Singh Gill passes away
Hardik Pandya | "हार्दिकला कुणाचाच सपोर्ट नाही"; मुंबईच्या ड्रेसिंग रूमबद्दल माजी क्रिकेटपटूचा खळबळजनक दावा!

क्रिकेटवर मनापासून प्रेम करणारा खेळाडू: युवराज सिंग

युवराज सिंगने बुधवारी रात्री पीसीएची पोस्ट टॅग करत लिहिले की, "अमनप्रीत सिंग गिलच्या निधनाची बातमी ऐकून खूप दुःख झाले. आमच्या सुरुवातीच्या दिवसांत आम्ही ड्रेसिंग रूम शेअर केली होती. तो एक अत्यंत शांत आणि मेहनती क्रिकेटपटू होता, ज्याचे खेळावर मनापासून प्रेम होते. त्याच्या कुटुंबाप्रती आणि प्रियजनांप्रती माझ्या संवेदना आहेत. त्याच्या आत्म्यास शांती लाभो. ओम शांती."

Amanpreet Singh Gill passes away
Hardik Pandya Angry MIvsPBKS: आता निर्णय घ्यावाच लागेल... कर्णधार पांड्या भडकला, तीन दिग्गजांपैकी कोण हार्दिकच्या रडारवर?

श्रीलंका मालिकेत घेतल्या ९ विकेट्स

१६ सप्टेंबर १९८९ रोजी चंदीगडमध्ये जन्मलेला अमनप्रीत मध्यमगती गोलंदाज आणि फलंदाज होता. तो विराट कोहली, मनीष पांडे आणि सौरभ तिवारी यांच्या पिढीतील खेळाडू होता. २००७ मध्ये श्रीलंकेत झालेल्या त्रिकोणी मालिकेत अमनप्रीत भारताच्या अंडर-19 संघाकडून खेळला होता. ही मालिका त्याच्यासाठी गोलंदाजीच्या दृष्टीने खूप यशस्वी ठरली होती. त्याने पाच डावात ९.४४ च्या सरासरीने ९ विकेट्स घेतल्या होत्या. कोलंबोमध्ये बांगलादेश विरुद्धच्या फायनलमध्ये भारताने १२९ धावांनी विजय मिळवला होता, ज्यामध्ये अमनप्रीतने ६ षटकात १४ धावा देत २ बळी टिपले होते.

Amanpreet Singh Gill passes away
Virat Kohli IPL 2026: किंग थकलाय.. विराट कोहलीचा 'इम्पॅक्ट' आता Impact Player पुरताच मर्यादित होणार?

पंजाबसाठी ६ प्रथम श्रेणी सामने खेळले

अमनप्रीतने पंजाबसाठी ६ प्रथम श्रेणी सामने खेळले असून त्यात ११ विकेट्स घेतल्या. ७२ धावांत ४ बळी ही त्याची सर्वोत्तम कामगिरी होती. आयपीएलच्या सुरुवातीच्या काळात तो किंग्स इलेव्हन पंजाबच्या ताफ्यात होता. प्लेइंग इलेव्हनमध्ये नियमित स्थान मिळाले नाही, तरीही संघ सेटअपचा तो महत्त्वाचा भाग होता.

Amanpreet Singh Gill passes away
Jasprit Bumrah IPL 2026 | यंदाच्‍या IPLमध्‍ये जसप्रीत बुमराहची पाटी अद्याप कोरीच; सलग चार सामन्यांत एकही विकेट नाही!

पंजाब किंग्सच्या खेळाडूंनी वाहली अमनप्रीतला श्रद्धांजली

अमनप्रीतला श्रद्धांजली वाहण्याकरिता सनरायझर्स हैदराबाद विरुद्धच्या आयपीएल २०२६ मधील सामन्यात पंजाब किंग्सच्या खेळाडूंनी हाताला काळी पट्टी बांधली होती.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news