Ajinkya Rahane Retirement: सुरूवात आहे तिथं अंतही आहे... हेच वास्तव म्हणत अजिंक्य रहाणेनं अखेर बॅट केली म्यान

Ajinkya Rahane Retirement
Ajinkya Rahane Retirementpudhari
Published on
Updated on

Ajinkya Rahane Retirement: अजिंक्य रहाणे याने आज सोशल मीडियावर एक पोस्ट करत आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती जाहीर केली. त्याने मला टायमिंगचं महत्व कळतं आणि आता टाईम झाला आहे असं म्हणत आपली बॅट म्यान केली. त्याने आपल्या पोस्टमध्ये कॅप नंबर २७८ सायनिंग ऑफ म्हणत निवृत्तीची घोषणा केली. त्याने आपल्या व्हिडिओत या कारकिर्दीत ज्यांनी सपोर्ट केला आणि चाहत्यांनी दिलेल्या प्रेमाबद्दल कृतज्ञता व्यक्त केली.

Ajinkya Rahane Retirement
Commonwealth Games 2026: राष्ट्रकुलमध्ये भारताचा दबदबा कायम; श्रीशंकरची 'रौप्य'उडी, तर दिलीप गावितचा विक्रमी 'सुवर्ण'वेध

अजिंक्य रहाणे आपल्या सोशल मीडियावर शेअर केलेल्या व्हिडिओत म्हणतो की, जिथं सुरूवात आहे तिथं अंतही आहे हेच वास्तव आहे. ज्यावेळी वेळ येते त्यावेळी तुम्ही त्याचा आदर करावा आणि पुढं जावं. मी फलंदाजी करत असताना कायम टायमिंगवर भरोसा ठेवत होतो. मला कायम माहित होतं की टायमिंग हे खूप महत्वाचं असतं.'

रहाणे पुढे म्हणाले, 'आज मला वाटतंय की हीच योग्य वेळ आहे पुढे जाण्याची. मी आज सर्व आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून आणि सर्व फॉरमॅटमधून माझी निवृत्ती जाहीर करत आहे.'

Ajinkya Rahane Retirement
Commonwealth Games: शर्मिला धनकरचा ऐतिहासिक पराक्रम; 'पॅरा-ॲथलेटिक्स'मध्ये भारताला मिळाले पहिले सुवर्णपदक

रहाणेने त्याच्या डोंबिवली पासून सुरू झालेल्या क्रिकेट प्रवासात आपण आपल्या परीने सर्वस्व दिल्याचं सांगितलं. ज्यावेळी मला संधी मिळाली त्यात्यावेळी मी फक्त एकच स्वप्न पाहिलं भारताची कॅप डोक्यावर असावी... मी फक्त एकच नियम पाळला तो म्हणजे माझा देश आणि माझा संघ मी माझ्यापेक्षा महत्वाचा मानला.

अजिंक्यने मी हा खेळ खूप प्रामाणिकपणे खेळल्याचं सांगितलं. ज्यावेळी तुमचा हेतू हा चांगला असतो त्यावेळी हा खेळ तुम्हाला बरंच काही देऊन जातो. अजिंक्यने जेव्हापासून त्याने प्रथमश्रेणी पदार्पण केलं आहे तेव्हापासून क्रिकेट हा खेळ बदलत राहिला आहे. आणि या बदलाचे आपण साक्षीदार असल्याचा अभिमान आहे असं सांगितलं.

Ajinkya Rahane Retirement
Ajinkya Rahane Fined: रहाणेचं म्हणजे 'खाया पिया कुछ नही, खाली गिलास तोडा १२ लाख का'... KKR कर्णधारावर BCCI ने केली कारवाई?

तसेच त्याने जरी खेळाडू म्हणून माझी कारकीर्द संपुष्टात येत असली तरी मी खेळापासून दूर जाणार नाहीये. मी खेळातून शिकलेल्या गोष्टी आणि मुल्य ही पुढच्या पिढीला देणार आहे असं सांगत आता आपण मार्गदर्शकाच्या भूमिकेतून या खेळासाठी योगदान देणार असल्याचे संकेत दिले.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news