IPL Team Sale: IPLमध्ये मोठा भूकंप! RCB नंतर आणखी एक टीम विक्रीच्या तयारीत; मोठ्या उद्योगपतीचा खळबळजनक दावा

IPL Team Sale RCB RR: RCBच्या विक्रीची प्रक्रिया सुरू असतानाच उद्योगपती हर्ष गोयंका यांनी राजस्थान रॉयल्सही विक्रीसाठी उपलब्ध असल्याचा खळबळजनक दावा केला आहे.
IPL Team Sale RCB RR
IPL Team Sale RCB RRPudhari
Published on
Updated on

IPL RCB Rajasthan Royals sale news harsh goenka statement:

IPL 2026च्या आधीच मैदानाबाहेरील मोठ्या घडामोडींनी क्रिकेटविश्वात तणावाचे वातावरण तयार केले आहे. प्लेयर रिटेंशन संपले असून काही दिवसांत ऑक्शन होणार आहे. पण या सर्वांवर पाणी फिरवत सध्या सर्वात जास्त चर्चा होत आहे ती म्हणजे IPL फ्रँचायझी विक्रीची. पहिले नाव RCBचे समोर आले आणि आता आणखी एका टीमच्या विक्रीची चर्चा आहे ती म्हणजे राजस्थान रॉयल्स (RR).

मागील काही दिवसांपासून रॉयल चॅलेंजर्स बेंगलोर (RCB) विक्री प्रक्रियेत असल्याचे स्पष्ट झाले आहे. RCB चालवणाऱ्या Diageo Groupने स्वतःच खरेदीदार शोधण्यास सुरुवात केल्याचे मान्य केले.

  • कंपनीने सांगितले की त्यांनी RCBसाठी नवीन खरेदीदार शोधण्याची प्रक्रिया सुरू केली आहे.

  • RCBसाठी अनेक भारतीय आणि परदेशी गुंतवणूकदार रस दाखवत असल्याची माहिती आहे.

IPL Team Sale RCB RR
Ratan Tata: रतन टाटा यांचा सेशेल्समधील विला विक्रीसाठी; 85 लाखांच्या प्रॉपर्टीसाठी तब्बल 55 कोटींची ऑफर

आता प्रसिद्ध उद्योगपती हर्ष गोयंका यांनी असा दावा केला आहे की, RCBसोबतच राजस्थान रॉयल्सही विक्रीच्या तयारीत आहे. हर्ष गोयंका यांनी 27 नोव्हेंबरला ‘X’ वर केलेल्या पोस्टने सोशल मीडियावर खळबळ उडाली आहे. त्यांनी लिहिले की त्यांच्या माहितीनुसार फक्त एक नाही, तर दोन IPL टीम्स विक्रीसाठी आहेत. एक RCB आणि दुसरी Rajasthan Royals.

गोयंका यांनी पुढे लिहिले की, टीम मालकांना सध्या मिळणाऱ्या जास्त किंमतींचा फायदा घ्यायचा आहे आणि त्यामुळे खरेदीसाठी चार ते पाच मोठे संभाव्य गुंतवणूकदार उत्सुक आहेत. त्यांनी आणखी एक इशारा दिला की, या टीम्सची खरेदी पुणे, मुंबई, अहमदाबाद, बेंगळुरू येथून होईल की थेट अमेरिकेतून, हे पाहणे आता उत्सुकतेचे ठरणार आहे.

या दाव्यामुळे प्रश्न निर्माण झाला आहे की, राजस्थान रॉयल्स खरोखरच विक्रीसाठी उपलब्ध आहे का? टीमकडून अद्याप कोणतेही अधिकृत निवेदन आलेले नाही. RR च्या सर्वात मोठ्या हिस्सेदारीत ब्रिटनस्थित भारतीय उद्योगपती मनोज बदाले यांचा हक्क आहे.

त्यांच्यासोबत अमेरिकेची मोठी इन्व्हेस्टमेंट फर्म RedBird Capital देखील हिस्सेदार आहे. फ्रँचायझी खरोखर विक्रीसाठी निघाली असल्यास ती पूर्णपणे विकली जाणार की फक्त काही हिस्सा विकला जाणार याबाबत अजून काहीही स्पष्ट झालेले नाही. मात्र, उद्योगवर्तुळात गंभीर चर्चा सुरू असल्याची माहिती मिळत आहे.

IPL Team Sale RCB RR
Eknath Shinde: राज्याच्या राजकारणात खळबळ; एकनाथ शिंदे पुन्हा मुख्यमंत्री होणार? कोणी केला दावा?

आगामी काही आठवड्यांत फ्रँचायझी विक्रीसंबंधित मोठ्या घोषणा होऊ शकतात. कोणती टीम किती किंमतीला विकली जाणार, त्यांचे नवीन मालक कोण असतील, BCCI यामध्ये काय भूमिका घेईल आणि संघरचनेवर त्याचा काय परिणाम होईल. हे सर्व IPLचा हंगाम सुरू होण्याआधीच स्पष्ट होण्याची शक्यता आहे. पण एक गोष्ट नक्की, IPLच्या इतिहासात प्रथमच दोन मोठ्या टीम्स एकाच वेळी मालक बदलण्याच्या उंबरठ्यावर आहेत आणि यामुळे संपूर्ण लीगचा चेहरामोहरा बदलू शकतो.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news