India vs Pakistan Final : पाकिस्तानला नमवून 'भारत' बनला विश्व 'चॅम्पियन'

वर्ल्ड चॅम्पियनशिप ऑफ लेजेंड्स 2024 पाकिस्तानचा 5 गडी राखून पराभव
After defeating Pakistan, 'India' became world 'champion'
पाकिस्तानला नमवून 'भारत' बनला विश्व 'चॅम्पियन'WCL India Champions Twitter

पुढारी ऑनलाईन डेस्क : वर्ल्ड चॅम्पियनशिप ऑफ लेजेंड्स 2024 च्या विजेतेपदाच्या सामन्यात भारताने पाकिस्तानचा 5 गडी राखून पराभव केला आहे. तसेच पुन्हा एकदा भारत विश्वविजेता बनला आहे. हा सामन्या शेवटच्या षटकापर्यंत रंगला होता. बर्मिंगहॅम येथे शनिवारी झालेल्या सामन्यात पाकिस्तानने प्रथम फलंदाजी करताना 20 षटकांत 6 गडी गमावून 156 धावा केल्या. प्रत्युत्तरात भारतीय संघाने 19.1 षटकात 5 विकेट गमावत 159 धावा करत सामना जिंकला. भारताकडून अंबाती रायडूने सर्वाधिक 50 धावा केल्या. शेवटच्या षटकाच्या पहिल्या चेंडूवर चौकार ठोकत इरफान पठानने वर्ल्ड चॅम्पियनशिप ऑफ लेजेंड्स चषकावर भारताचे नाव कोरले.

157 धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करण्यासाठी उतरलेल्या भारतीय संघाची सुरुवात चांगली झाली. उथप्पा आणि अंबाती यांच्यात पहिल्या विकेटसाठी 34 धावांची भागीदारी झाली. सुरेश रैनाला केवळ 4 धावा करता आल्या. आमिर यामीनने एकाच षटकात दोन्ही खेळाडूंना पॅव्हेलियनचा रस्ता दाखवला. अंबाती रायडूने 30 चेंडूत 5 चौकार आणि 2 षटकारांच्या मदतीने 50 धावा केल्या. गुरकीरत सिंगने 33 चेंडूत 34 धावांची खेळी केली. यानंतर युसूफ पठाणने 16 चेंडूत 30 धावांची स्फोटक खेळी केली. या खेळीत त्याने तीन षटकार आणि एक चौकार लगावला. कर्णधार युवराज सिंगने 22 चेंडूत 15 धावा केल्या. इरफान पाच धावा करून नाबाद राहिला. पाकिस्तानकडून आमिरने 2, अजमल, रियाझ आणि शोएबने प्रत्येकी 1 बळी घेतला.

After defeating Pakistan, 'India' became world 'champion'
T20 World Cup : भारत सेमीफायनलमध्ये कसा पोहोचू शकतो?

प्रथम फलंदाजी करताना पाकिस्तानने 20 षटकांत 6 गडी गमावून 156 धावा केल्या. पाकिस्तानकडून शोएब मलिकने सर्वाधिक 41 धावा केल्या. भारताकडून अनुरीत सिंगने तीन बळी घेतले. नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजीला आलेल्या पाकिस्तान संघाची सुरुवात चांगली झाली नाही. संघाचा सलामीवीर शरजील खान 10 चेंडूत 12 धावा करून बाद झाला. दुसऱ्या षटकातच पॅव्हेलियनमध्ये परतला. मकसूदने 12 चेंडूत 21 धावा केल्या. कामरान अकमल 19 चेंडूत 24 धावा करून बाद झाला. कर्णधार युनूस खानला 11 चेंडूत केवळ सात धावा करता आल्या.

After defeating Pakistan, 'India' became world 'champion'
Champions Trophy : टीम इंडियाचे वेळापत्रक आले समोर, ‘या’ दिवशी भारत-पाक सामन्याचा थरार

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news