T20 World Cup : भारत सेमीफायनलमध्ये कसा पोहोचू शकतो?

T20 World Cup : भारत सेमीफायनलमध्ये कसा पोहोचू शकतो?
T20 World Cup : भारत सेमीफायनलमध्ये कसा पोहोचू शकतो?
T20 World Cup : भारत सेमीफायनलमध्ये कसा पोहोचू शकतो?Virat Kohli

टी-20 वर्ल्डकपमध्ये (T20 World Cup) दोन सामने आणि दोन्ही सामन्यांत दारुण या शब्दापेक्षाही अपमानास्पद पराभव. ज्या भारतीय क्रिकेट संघाला जगातील सर्वोत्तम संघांपैकी एक संघ आणि स्पर्धेच्या विजेतेपदाचा दावेदार समजले जात होते. त्यांना संयुक्त अरब अमिरातमध्ये खेळवल्या जात असलेल्या टी-20 वर्ल्डकपमधून साखळी फेरीतच स्पर्धेबाहेर होण्याचा धोका निर्माण झाला आहे. पाकिस्तानविरुद्ध 10 विकेटस्नी आणि न्यूझीलंडविरुद्ध 8 विकेटस्नी पराभवामुळे गुणतालिकेत भारत नामिबियासारख्या नवख्या संघाच्याही मागे राहिला आहे.

गट क्रमांक दोनमधून दोन संघ उपांत्य फेरीत जातील. त्यापैकी पाकिस्तान सेमीफायनलमध्ये पोहोचणार हे आता जवळपास नक्की झाले आहे. त्यामुळे उरलेल्या संघांमध्ये दुसर्‍या जागेसाठी लढाई होणार आहे. या लढाईत न्यूझीलंड आणि अफगाणिस्तान पुढे आहे. भारताचे अजूनही तीन सामने व्हायचे आहेत. त्यामुळे त्यांना जास्तीत जास्त सहा गुण मिळू शकतात. या सहा गुणांच्या आधारावर भारत उपांत्य फेरीत जाऊ शकतो. परंतु, त्यासाठी अनेक 'जर-तर'ची गणिते जुळून यावी लागतील.

भारत सेमीफायनलमध्ये कसा पोहोचू शकतो?

  • भारत, पाकिस्तान आणि न्यूझीलंड यांनी स्कॉटलंड आणि नामिबिया या दोन्ही संघांना हरवावे लागेल.

  • यामुळे पाकिस्तान गटात अव्वल स्थानावर राहील, ते दहा गुणांसह उपांत्य फेरीत पोहोचतील.

  • यानंतर उरलेल्या एका स्थानासाठी भारत, न्यूझीलंड आणि अफगाणिस्तानमध्ये लढाई होईल.

  • जर भारतीय संघ अफगाणिस्तानकडून हरला तर त्याच दिवशी भारतीय संघाचे पॅकअप होईल.

  • अफगाणिस्तान आणि न्यूझीलंड यांच्यातील विजेता गट क्र. 2 मधून दुसरा संघ म्हणून उपांत्य फेरीत जाईल.

  • जर भारताने अफगाणिस्तानला हरवले, तर भारताचे सहा गुण होतील आणि ते उपांत्य फेरीत जाऊ शकतील; पण त्यासाठी न्यूझीलंडने अफगाणिस्तानला हरवावे लागेल.

  • जर अफगाणनने न्यूझीलंडला आणि भारताने अफगाणला हरवले तर भारत, न्यूझीलंड, अफगाणचे 6 गुण होतील.

  • यावेळी सगळी गणिते नेट रनरेटवर येऊन थांबतील. सध्या भारताचा रनरेट (-1.609) इतका खाली आहे.

  • रनरेटमध्ये या गटात अफगाणिस्तान सर्वात पुढे आहे. त्यांचा रनरेट 3.097 असा स्ट्राँग आहे.

  • पाकिस्तान गुणांमुळे अव्वल आहे; पण रनरेटमध्ये ते दुसर्‍या स्थानावर आहेत. न्यूझीलंड तिसरा आहे.

  • भारताला अफगाणिस्तान आणि न्यूझीलंडच्या पुढे जाण्यासाठी तिन्ही सामने फरकाने जिंकावे लागतील.

  • भारताला अफगाणिस्तान, स्कॉटलंड आणि नामिबिया यांच्याविरुद्ध अनुक्रमे 80+, 100+ आणि 100+ धावांच्या फरकाने विजय मिळवावा लागेल.

भारताचे पुढील सामने (T20 World Cup)

3 नोव्हेंबर अफगाणिस्तान

5 नोव्हेंबर स्कॉटलंड

8 नोव्हेंबर नामिबिया

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news