AFC Asian Cup 2023 : आशिया चषक स्पर्धेतील भारताचे आव्हान संपुष्टात; सीरियाकडूनही पराभव

AFC Asian Cup 2023 : आशिया चषक स्पर्धेतील भारताचे आव्हान संपुष्टात; सीरियाकडूनही पराभव

अल खोर (कतार); वृत्तसंस्था : सुनील छेत्रीच्या नेतृत्वाखाली खेळणार्‍या भारतीय फुटबॉल संघाला आशिया चषक फुटबॉल स्पर्धेत सलग तिसर्‍या पराभवाला सामोरे जावे लागले. मंगळवारी झालेल्या 'ब' गटातील अखेरच्या साखळी सामन्यात सीरियाने भारताचा 1-0 असा पराभव केला. या पराभवामुळे भारताचे स्पर्धेतील आव्हान संपुष्टात आले. उमर खरिबीनने 76व्या मिनिटाला लढतीतील एकमेव गोल नोंदवला आणि हाच गोल निर्णायक ठरला. (AFC Asian Cup 2023)

पाचव्यांदा या स्पर्धेत खेळणार्‍या भारताने 1964 मध्ये आशिया चषकाचे उपविजेतेपद मिळवले होते. मात्र त्यानंतर त्यांना एकदाही (1984, 2011, 2019, 2024) बाद फेरी गाठता आलेली नाही. आता फेब्रुवारी महिन्यात फिफा विश्वचषक पात्रता फेरीतील दुसर्‍या टप्प्यात भारतीय संघ चमकदार कामगिरी करेल, अशी आशा आहे. 2023 मध्ये भारताने सॅफ चषक तसेच आंतरखंडीय चषक फुटबॉल स्पर्धा जिंकली होती. मात्र, आशिया चषकात ऑस्ट्रेलिया, उझबेकिस्तान, सीरियापुढे त्यांचा निभाव लागला नाही. भारताला या स्पर्धेत एकही गोल करता आला नाही. ही देखील चिंतेची बाब ठरली आहे. (AFC Asian Cup 2023)

हेही वाचा :

logo
Pudhari News
pudhari.news