Hyderabad Test : पहिल्या कसोटीसाठी इंग्लंडचा संघ जाहीर, ‘हा’ खेळाडू करणार पदार्पण

Hyderabad Test : पहिल्या कसोटीसाठी इंग्लंडचा संघ जाहीर, ‘हा’ खेळाडू करणार पदार्पण

पुढारी ऑनलाईन डेस्‍क : भारत आणि इंग्लंड यांच्यातील पाच कसोटी सामन्यांच्या मालिकेला गुरुवारपासून (२५ जानेवारी) प्रारंभ होत आहे. हैदराबादच्या राजीव गांधी आंतरराष्ट्रीय स्टेडियमवर होणार्‍या या सामन्‍यासाठी इंग्‍लंडने संघ जाहीर केला आहे. अनुभवी गोलंदाज जेम्‍स अँडरसन यांचा संघात समावेश नाही. तर इंग्‍लंडचा डावखुरा फिरकी गोलंदाज टॉम हार्टली हा या सामन्‍यात कसोटी क्रिकेटमध्‍ये पदार्पण करणार असल्‍याचे स्‍पष्‍ट झाले आहे. ( IND Vs ENG 1st Test England Announced Playing 11 )

<br />इंग्‍लंडचा अनुभवी वेगवान गोलंदाज जेम्‍स अँडरसन. दुसर्‍या छायाचित्रात कसोटी क्रिकेटमध्‍ये पदार्पण करणार टॉम हार्टली. ( संग्रहित छायाचित्र.)

इंग्‍लंडचा अनुभवी वेगवान गोलंदाज जेम्‍स अँडरसन. दुसर्‍या छायाचित्रात कसोटी क्रिकेटमध्‍ये पदार्पण करणार टॉम हार्टली. ( संग्रहित छायाचित्र.)

हैदराबादची खेळपट्टी फिरकीपटूंना मदत करेल, असे मानले जात आहे. त्‍यामुळे इंग्‍लंडने तीन फिरकीपटूंना संघात स्थान दिले आहे. हार्टलेशिवाय अनुभवी जॅक लीच आणि युवा रेहान अहमद यांचा संघात समावेश आहे. संघातील तीन प्रमुख फिरकीपटूंना स्‍थान मिळाल्‍याने अँडरसनला संघाबाहेर बसावे लागले आहे.लँकेशायर संघाचा खेळाडू हार्टले हा पहिला कसोटी सामना खेळणार आहे. त्‍याने आतापर्यंत प्रथम श्रेणी क्रिकेटमधील २० सामन्‍यात ४० बळी घेतले आहेत. ( IND Vs ENG 1st Test England Announced Playing 11 )

बेन फॉक्‍स सांभाळणार यष्‍टीरक्षणाची जबाबदारी

अनुभवी खेळाडू जॉनी बेअरस्टो विकेटकीपिंग करणार नसल्याचे इंग्लंडने स्पष्ट केले आहे. तो या कसोटी सामन्यात फलंदाज म्हणून खेळणार आहे. बेन फॉक्स यष्टिरक्षणाची जबाबदारी सांभाळणार आहे. ( IND Vs ENG 1st Test England Announced Playing 11 )

पहिल्या कसोटीसाठी इंग्लंडचा संघ : जॅक क्रॉल, बेन डकेट, ऑली पोप, जो रूट, जॉनी बेअरस्टो, बेन स्टोक्स (कर्णधार), बेन फोक्स (यष्‍टीरक्षक), रेहान अहमद, टॉम हार्टले, मार्क वुड आणि जॅक लीच.

भारतात इंग्लंडच्‍या संघाची कामगिरी

इंग्लंडच्‍या संघाने भारतात आतापर्यंत ६४ कसोटी सामने खेळले आहेत. यातील केवळ १४ सामने जिंकले आहेत. भारताने 22 सामने जिंकले आहेत. 28 कसोटी सामने अनिर्णित राहिले आहेत.

हेही वाचा : 

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news