Abhishek Sharma Bad Record : अभिषेकच्या नावे लाजिरवाण्या विक्रमाची नोंद; कोहली-गिल-धवनलाही मागे टाकत नकोशा पदी विराजमान

ind vs nz t20 series : 'असा' नकोसा विक्रम करणारा तो पहिला भारतीय सलामीवीर ठरला
Abhishek Sharma Bad Record : अभिषेकच्या नावे लाजिरवाण्या विक्रमाची नोंद; कोहली-गिल-धवनलाही मागे टाकत नकोशा पदी विराजमान
Published on
Updated on

मुंबई : भारतीय संघाचा धडाकेबाज सलामीवीर अभिषेक शर्मा याच्यासाठी न्यूझीलंडविरुद्धची मालिका अत्यंत खराब ठरली आहे. या मालिकेतील चार सामन्यांपैकी दोन वेळा तो 'गोल्डन डक'वर (पहिल्याच चेंडूवर बाद) बाद झाला असून, असा नकोसा विक्रम करणारा तो पहिला भारतीय सलामीवीर ठरला आहे. या कामगिरीमुळे त्याने विराट कोहली, शुभमन गिल, शिखर धवन आणि पृथ्वी शॉ यांसारख्या दिग्गज खेळाडूंनाही मागे टाकले आहे.

न्यूझीलंडविरुद्ध सपशेल अपयश

न्यूझीलंडविरुद्धच्या चौथ्या टी-२० सामन्यात अभिषेक शर्मा शून्यावर बाद झाला आणि भारताच्या पदरी ५० धावांनी पराभव पडला. या सामन्यात भारतीय फलंदाजी पूर्णपणे कोलमडली, तसेच मर्यादित फलंदाजांसह मैदानात उतरण्याचा निर्णय टीम इंडियाला महागात पडला. भारताचा पराभव करून न्यूझीलंडने सलग तीन पराभवांनंतर या मालिकेत पहिला विजय नोंदवला.

Abhishek Sharma Bad Record : अभिषेकच्या नावे लाजिरवाण्या विक्रमाची नोंद; कोहली-गिल-धवनलाही मागे टाकत नकोशा पदी विराजमान
Yuvraj Singh चा खळबळजनक खुलासा; ‘ना आदर.. ना पाठिंबा’, निवृत्तीच्या ५ वर्षांनंतर टीम इंडियातील 'त्या' वागणुकीवर स्पष्टच बोलला

असा पराक्रम करणारा पहिलाच भारतीय सलामीवीर

अभिषेक शर्माने न्यूझीलंडविरुद्धच्या ५ सामन्यांच्या टी-२० मालिकेतील पहिल्या ४ सामन्यांपैकी २ सामन्यांत 'गोल्डन डक'ची नोंद केली. मालिकेतील दुसऱ्या आणि चौथ्या सामन्यात तो पहिल्याच चेंडूवर बाद झाला. एकाच आंतरराष्ट्रीय टी-२० मालिकेत दोन वेळा 'गोल्डन डक'वर बाद होणारा अभिषेक हा पहिला भारतीय सलामीवीर ठरला आहे. यापूर्वी कोणत्याही भारतीय सलामीवीराच्या नावे अशा प्रकारच्या कामगिरीची नोंद नव्हती.

Abhishek Sharma Bad Record : अभिषेकच्या नावे लाजिरवाण्या विक्रमाची नोंद; कोहली-गिल-धवनलाही मागे टाकत नकोशा पदी विराजमान
T20 World Cup 2026 : टीम इंडिया अडचणीत; टी-२० विश्वचषक स्पर्धेपूर्वी संघासाठी उद्भवला मोठा धोका

कोहली-गिलसह ६ फलंदाजांना टाकले मागे

आंतरराष्ट्रीय टी-२० क्रिकेटमध्ये सलामीवीर म्हणून दोन वेळा 'गोल्डन डक'वर बाद होणाऱ्या खेळाडूंच्या यादीत आता अभिषेक शर्माने रोहित शर्मा, केएल राहुल आणि संजू सॅमसन यांची बरोबरी केली आहे. मात्र, एकाच मालिकेत दोन वेळा शून्यावर बाद झाल्यामुळे त्याने विराट कोहली, शुभमन गिल, शिखर धवन, पृथ्वी शॉ, मुरली विजय आणि अजिंक्य रहाणे यांना मागे टाकले आहे. हे सर्व खेळाडू सलामीवीर म्हणून टी-२० मध्ये प्रत्येकी एकदाच 'गोल्डन डक'चे बळी ठरले होते.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news