Aaqib Nabi: टीम इंडियाच्या कॅम्पमध्ये आकिब नबीची एन्ट्री; ट्रोलिंगनंतर BCCIचा मोठा निर्णय, अफगाणिस्तानविरुद्ध मिळणार संधी?

Aaqib Nabi Joins Team India Camp: जम्मू-काश्मीरचा वेगवान गोलंदाज आकिब नबी भारतीय संघाच्या कॅम्पमध्ये दाखल झाला आहे.
Aaqib Nabi
Aaqib NabiPudhari
Published on
Updated on

Aaqib Nabi Joins Team India Camp: अफगाणिस्तानविरुद्ध 6 जूनपासून मुल्लांपूर येथे होणाऱ्या एकमेव कसोटी सामन्यापूर्वी भारतीय क्रिकेटमध्ये एक महत्त्वाची घडामोड घडली आहे. जम्मू-काश्मीरचा युवा वेगवान गोलंदाज आकिब नबी भारतीय संघाच्या कॅम्पमध्ये दाखल झाला आहे. त्याचा अधिकृत कसोटी संघात समावेश करण्यात आलेला नसला, तरी तो सध्या बॅकअप खेळाडू म्हणून शुभमन गिलच्या नेतृत्वाखालील संघासोबत सराव करत आहे.

आकिब नबीच्या या एंट्रीकडे केवळ सरावासाठी आलेला खेळाडू म्हणून पाहिले जात नाही. कारण कसोटी संघाची घोषणा झाल्यानंतर त्याला संधी न दिल्याबद्दल बीसीसीआयच्या निवड समितीवर मोठ्या प्रमाणात टीका झाली होती. जसप्रीत बुमराहला विश्रांती देण्यात आल्यानंतर अनेकांना आकिबला संधी मिळेल अशी अपेक्षा होती. मात्र निवड समितीने त्याऐवजी गुरनूर बरारची निवड केली. त्यामुळे क्रिकेटप्रेमी आणि अनेक तज्ज्ञांनी सोशल मीडियावर नाराजी व्यक्त केली होती.

आता मात्र आकिब नबी संघाच्या कॅम्पमध्ये दाखल झाल्याने भारतीय संघ व्यवस्थापन त्याच्यावर गंभीरपणे विचार करत असल्याचे संकेत मिळत आहेत. अफगाणिस्तानविरुद्धच्या सामन्यात त्याला अंतिम अकरामध्ये स्थान मिळेल की नाही, हे अद्याप स्पष्ट झालेले नाही.

आकिब नबीने मागील रणजी ट्रॉफी हंगामात दमदार कामगिरी केली होती. जम्मू-काश्मीरच्या ऐतिहासिक यशामध्ये त्याचा मोठा वाटा होता. त्याने 10 सामन्यांत तब्बल 60 विकेट्स घेतल्या. त्याचा गोलंदाजी सरासरी 12.56 इतकी होती. याशिवाय सात वेळा एका डावात पाच किंवा अधिक विकेट्स घेण्याचा पराक्रमही त्याने केला.

रणजीतील याच शानदार कामगिरीमुळे आयपीएल 2026 च्या मिनी लिलावात दिल्ली कॅपिटल्सने त्याच्यावर मोठी बोली लावली होती. दिल्लीने त्याला 8.40 कोटी रुपयांना आपल्या संघात सामील केले. तो त्या हंगामातील सर्वात महागड्या भारतीय खेळाडूंमध्ये गणला गेला. मात्र आयपीएलमध्ये त्याला अपेक्षित यश मिळाले नाही. त्याने पाच सामने खेळले, पण एकही विकेट मिळवू शकला नाही.

तरीही भारतीय क्रिकेटमधील त्याची प्रगती आणि सातत्यपूर्ण कामगिरी लक्षात घेता निवडकर्त्यांनी त्याच्यावर विश्वास कायम ठेवला आहे. आगामी श्रीलंका दौऱ्यासाठी त्याची शक्यता कमी मानली जात असली, तरी ऑक्टोबरमध्ये होणाऱ्या न्यूझीलंड दौऱ्यात वेगवान गोलंदाजांना मदत करणाऱ्या परिस्थितीत आकिब नबीला संधी मिळू शकते, असे क्रिकेट वर्तुळात बोलले जात आहे.

Aaqib Nabi
Sunil Gavaskar Controversy : गुजरात टायटन्सच्या पराभवानंतर गावसकरांचे वादग्रस्त विधान; म्हणाले; ‘अंतिम सामना पुढे ढकलायला..’

सध्या भारतीय संघ अफगाणिस्तानविरुद्धच्या कसोटी सामन्याच्या तयारीत व्यस्त आहे. शुभमन गिलच्या नेतृत्वाखाली यशस्वी जैस्वाल, केएल राहुल, ऋषभ पंत, साई सुदर्शन, देवदत्त पडिक्कल, वॉशिंग्टन सुंदर, कुलदीप यादव, मोहम्मद सिराज आणि प्रसिद्ध कृष्णा यांसारखे खेळाडू सराव करत आहेत.

Aaqib Nabi
Test Cricket Rules Update | बॅड लाईटमुळे व्यत्यय आल्यास कसोटीत गुलाबी चेंडू वापरता येणार

आकिब नबीला अद्याप भारतीय कसोटी कॅप मिळालेली नसली, तरी राष्ट्रीय संघाच्या कॅम्पमध्ये त्याची उपस्थिती ही त्याच्या कारकिर्दीतील मोठी पायरी मानली जात आहे. आता जम्मू-काश्मीरचा हा युवा वेगवान गोलंदाज भारतीय संघात कायमस्वरूपी स्थान मिळवण्यात यशस्वी ठरतो का, याकडे सर्व क्रिकेटप्रेमींचे लक्ष लागले आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news