MS Dhoni ने पाक गोलंदाजाला दिले ‘गिफ्ट’! | पुढारी

MS Dhoni ने पाक गोलंदाजाला दिले ‘गिफ्ट’!

पुढारी ऑनलईन डेस्क : भारतीय क्रिकेट संघाचा माजी कर्णधार महेंद्रसिंह धोनी (MS Dhoni) याने भले आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती घेतली असेल, पण तरीही तो अनेकदा चर्चेत असतो. यावेळी धोनी पुन्हा चर्चेत आला आहे. याचे कारण पाकिस्तानीचा एक गोलंदाज आहे, ज्याला धोनीने गिफ्ट दिले आहे.

वास्तविक धोनीने (MS Dhoni) त्याची स्वाक्षरी केलेली चेन्नई सुपर किंग्ज (CSK) जर्सी पाकिस्तानचा युवा वेगवान गोलंदाज हरिस रौफला भेट दिली आहे. खुद्द हारिस रौफने सोशल मीडियावर एका पोस्टद्वारे ही माहिती दिली.

गिफ्ट मिळाल्यानंतर हारिस रौफने सोशल मीडियावर धोनीसाठी एक पोस्ट लिहिली आणि धोनीच्या (MS Dhoni)जर्सीचे फोटोही शेअर केले. हारिस रौफने ट्विटरवर लिहिले- “लेजेंड आणि कॅप्टन कूल एमएस धोनीने मला त्याची 7 नंबरची जर्सी भेट देऊन सन्मानित केले आहे. तो अजूनही त्याच्या वागण्याने आणि उदारतेने मन जिंकत आहे.’

हे गिफ्ट पाठवल्याबद्दल रौफने चेन्नई सुपर किंग्जचे मॅनेजर रसेल राधाकृष्णन यांचेही आभार मानले आहेत. हारिसने लिहिले, मला पाठिंबा दिल्याबद्दल रसेल राधाकृष्णन यांचेही आभार. हारिस सध्या ऑस्ट्रेलियातील बिग बॅश लीगमध्ये खेळत आहे. त्यानंतर तो पाकिस्तान क्रिकेटसाठी उपलब्ध होईल. मार्चमध्ये पाकिस्तान ऑस्ट्रेलियाचे यजमानपद भूषवणार आहे.

IPL 2022 मध्ये धोनी (M S Dhoni) अॅक्शनमध्ये…

धोनीने आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती घेतली असली तरीही तो इंडियन प्रीमियर लीगमध्ये खेळत आहे. आयपीएलच्या मागच्या मोसमात त्याने चेन्नई सुपर किंग्जला पुन्हा एकदा चॅम्पियन बनवले. धोनी आयपीएल 2022 मध्ये खेळताना दिसणार आहे. तो आयपीएलच्या 15 व्या मोसमात चेन्नई सुपर किंग्जचे प्रतिनिधित्व करताना दिसेल. CSK ने 12 कोटी रुपयांमध्ये धोनीला दुसरी पसंती म्हणून कायम ठेवले. एप्रिलमध्ये ही स्पर्धा सुरू होऊ शकते.

Back to top button