किर्ती आझाद म्‍हणाले, विराटच्‍या तुलनेत ‘त्‍यांनी’ निम्‍मे सामनेही खेळलेले नाहीत | पुढारी

किर्ती आझाद म्‍हणाले, विराटच्‍या तुलनेत 'त्‍यांनी' निम्‍मे सामनेही खेळलेले नाहीत

नवी दिल्‍ली : पुढारी ऑनलाईन

विराट कोहली याला टी २० आणि वनडे कर्णधारपदावरुन हटविण्‍यतात आले आहे. याबाबत माजी क्रिकेटपटू किर्ती आझाद यांनी सडेतोड मत व्‍यक्‍त केले आहे. विराट कोहलीला ज्‍या पद्‍धतीने कर्णधारपदावरुन हटवले आले ते अत्‍यंत चुकीचे होते, असे किर्ती आझाद यांनी एका वृत्तवाहिनीनेला दिलेल्‍या मुलाखतीमध्‍ये म्‍हटलं आहे.

किर्ती आझाद यांनी म्‍हटलं आहे की, मी हे बोलायचं नाहीय; पण बोलावेच लागले. मला निवड समिती सदस्‍यांचा अवमान करायचा नाही. कारण त्‍यांनीही काही काळ क्रिकेट खेळले आहे. तेही एकेकाळी चांगले खेळाडू होते; पण विराट जेवढे सामने खेळाला आहे. त्‍यांच्‍या निम्‍मेही सामने त्‍यांनी खेळलेले नाहीत. यावरुनच विराटने भारतीय क्रिकेटसाठी दिलेल्‍या योगदान लक्षात येते.

कर्णधार काेण हाेणार हे ‘बीसीसीआय’ अध्‍यक्षांना महिती असतेच : किर्ती आझाद

तुम्‍ही क्रिकेटमधील कोणत्‍याहा फॉर्मटचा कर्णधार बदल केला तर याची माहिती ‘बीसीसीआय’ अध्‍यक्षांना असतेच. विराट याला कर्णधार पदावरुन बाजूला करणार आहेत, याची माहिती ‘बीसीसीआय’ अध्‍यक्ष सौरभ गांगुली यांना असेल तर त्‍यांनी विराटबरोबर चर्चा करणे गरजेचे होते.  काेणत्‍याही खेळाडूला कर्णधारपदावरुन बाजूला  करताना त्‍याच्‍याशी चर्चा हाेतेच. काेणतीही चर्चा न करता विराटला कर्णधारपदावरुन हटविणे हा त्‍याचा अपमानच आहे. या सर्व घडामाेडींवर  विराट कोहली नाराज नाही; पण त्‍याला ज्‍या पद्‍धतीने त्‍याला कर्णधार पदावरुन हटवले. याचा त्‍याला धक्‍का बसला आहे, असेही आझाद म्‍हणाले.

निवड समिती सदस्‍यांनी विराटच्‍या तुलनेत निम्‍मे सामनेही खेळलेले नाहीत

सध्‍या चेतन शर्मा हे भारतीय क्रिकेट संघाचे मुख्‍य निवडकर्ता आहेत. त्‍यांनी २३ कसोटी सामने तर ६५ वनडे सामने खेळले आहेत. तर निवड समितीचे सदस्‍य देवाशीष मोहंत यांनी भारतासाठी केवळ दोन कसोटी सामने आणि ४५ वनडे सामने खेळले आहे. अभय कुरुविला यांनी १० कसोटी आणि २५ वनडे सामने खेळले आहेत. विराट कोहलीच्‍या तुलनेत निवड समिती सदस्‍यांनी निम्‍मे सामनेही खेळलेले नाहीत, असेही आझाद म्‍हणाले.

काही दिवसांपूर्वीच एका वृत्तसंस्‍थेशी बोलताना आझाद म्‍हणाले होते की, रोहित आणि विराट भारतीय संघात नसतील तर संघापेक्षाही अधिक नुकसान या दोघांचे होईल.

हेही वाचलं का? 

पाहा व्‍हिडिओ 

 

 

 

 

 

 

Back to top button